मोबाईलवर जमीन कशी मोजावी संपूर्ण माहिती

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमची जमीन मोजायची असेल तर तुम्हाला भूमी अभिलेखाकडे जावे लागते. त्यासाठी तुमचा वेळ व पैसा दोन्ही जातो परंतु आता या डिजिटल जगात तुम्ही तुमची जमीन अगदी काही वेळात मोबाईलद्वारे मोजू शकता. तर तुम्ही खालील माहिती व्यवस्थित वाचा तुम्हाला समजून जाईल की मोबाईलवर जमीन कशी मोजली जाते.

jamin mojani mobile in marathi

शेत जमीन मोबाईल वरून कशी मोजायची

  • शेतकरी मित्रांनो तुम्हाला जमीन मोजण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरती जायचं आहे आणि तिथून तुम्हाला (Jareeb-land measurement app) हे डाउनलोड करायचा आहे
  •   शेतकरी मित्रांनो हे ॲप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला ते उघडायचं आहे आणि सर्वप्रथम जे क्षेत्र तुम्हाला मोजायचे आहे त्या क्षेत्राच्या जवळ तुम्हाला जाऊन उभे राहायचे आहे. आणि मोबाईल मधील लोकेशन तुम्हाला चालू करायचा आहे
  • तुम्ही ॲप उघडल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दोन पर्याय दिसतील एक म्हणजे (Land measurement ) आणि दूसरा म्हणजे (Land Calculator ) तर इथे तुम्हाला जमीन मोजायची आहे त्यामुळे तुम्हाला सर्वात पहिला पर्याय निवडायचा आहे जो आहे (Land measurement)
  • त्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर दोन पर्याय उघडतील त्यामध्ये पहिला असेल (By Marking) आणि दुसरा पर्याय असेल (By walking) तर पहिल्या पर्यायांमध्ये आपण मार्किंग करून जमिनीचे क्षेत्र मोजू शकतो आणि दुसऱ्या पर्यायांमध्ये आपण चालत जमीन किंवा वावर मोजू शकतो तुम्हाला जर मार्किंग करून मोजायची असेल तर पहिल्या पर्यायावरती क्लिक करा आणि जर चालत मोजायची असेल तर दुसऱ्या पर्यायावरती क्लिक करा.
  • जसे समजा तुम्ही पहिल्या पर्यायावरती क्लिक केलं (By Marking) तर तुमच्यासमोर एक नकाशा उघडेल जिथे तुम्ही ज्या क्षेत्रात उभे आहात त्याचं तुमचे लोकेशन दाखवेल. ते तुम्ही हाताद्वारे कमी जास्त झूम करू शकता.
  • तर आपल्याला आता ज्या जमिनीची किंवा शेताची मोजणी करायची आहे तेव्हा वावर नकाशामध्ये काढायचं आहे आणि तिथे आपल्याला पॉईंट टाकून संपूर्ण शेताची मार्किंग करून घ्यायची आहे.
  • व्यवस्थितपणे मार्किंग करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली डाव्या कोपऱ्यात त्या क्षेत्राचे क्षेत्रफळ दाखवण्यास सुरुवात होईल.
  • आणि जेव्हा तुम्ही (UNITS) वरती क्लिक कराल तेव्हा जमिनी बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल

तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमची जमीन किंवा शिवार अगदी काही वेळात मोबाईल ॲप द्वारे मोजू शकता.

सरकारी मोजणी आणण्यासाठी किती पैसे लागतात

शेतकरी मित्रांनो बऱ्याचश्या शेतकऱ्यांना सरकारी मोजणी आणून त्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ मोजायचे असते परंतु त्यांना माहीत नसते की सरकारी मोजणी आणण्यासाठी किती खर्च येतो त्यामुळे सरकारी कार्यालयाकडून खूप वेळा त्यांची फसवणूक देखील होत असते त्यामुळे आपण ऑनलाइन पाहू शकतो की सरकारी मोजणी आणण्यासाठी किती पैसे लागतात

  •  सर्वप्रथम आपल्याला या संकेतस्थळावरती जायचं आहे (emojani.mahabhumi.gov. in)  इथे आल्यानंतर आपल्याला वरती एक मजकूर असेल तिथे नागरिकांसाठी असा पर्याय असेल त्यावरती क्लिक करायचं आहे
  • त्यानंतर नवीन एक पण उघडून तिथे पुन्हा एक वरती मजकूर असेल तिथे (मोजणी फी) या पर्यायावर क्लिक करायचं आहे
  • त्यानंतर पुन्हा एक नवीन पान उघडेल आणि तिथे एक संकलन हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून आपल्याला भूमापन निवडायचा आहे. त्यानंतर त्याच्याच पुढे एक पर्याय असेल जमिनीचे संकेतांक त्यावरती आपल्याला जमिनीचा गट नंबर निवडायचा आहे
  • त्यानंतर खाली एक तक्ता असेल तिथे तुम्हाला जमिनीबद्दल माहिती भरायची आहे. आपल्याला किती क्षेत्राची मोजणी करायची आहे ते क्षेत्र तिथे टाकायचे आहे. माहिती भरल्यानंतर आपल्याला त्याच्या साईडला Save पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून ती माहिती सेव करायची आहे
  • त्यानंतर खाली देखील अनेक पर्याय असतील ते पण आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचे आहे
  • संपूर्ण माहिती तिथे व्यवस्थितपणे भरल्यानंतर खाली एक मोजणी फी पर्याय असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे
  • त्यानंतर पुढे तुम्हाला तिथे खाली दाखवण्यास सुरुवात होईल की एवढं क्षेत्र मोजायला तुम्हाला किती फी लागणार आहे जर तुम्ही सरकारी मोजणी आणली तर

अस आपण घरूनच माहिती करू शकतो की सरकारी मोजणीसाठी किती पैसे लागतील.

FAQ

एक आर म्हणजे किती

शेतकरी मित्रांनो आर हे मॅट्रिक पद्धतीने मोजले जाणारे एक माप आहे. 1 आर म्हणजेच 100 चौरस मीटर.

एक गुंठा म्हणजे किती

मित्रांनो कोणत्याही जमिनीचे क्षेत्रफळ जर 33 फूट गुणिले 33 फूट असेल तर ती जमीन एक गुंठा म्हणून ओळखली जाते. एक गुंठा म्हणजेच 1089 चौरस फुट

एक एकर म्हणजे किती

मित्रांनो एक एकर म्हणजे 40 गुंठे म्हणजेच एक एकर हे 43,560 चौरस फुट इतके असते.

एक हेक्टर म्हणजे किती

मित्रांनो 1 हेक्टर म्हणजेच 100 मीटर गुणिले 100 मीटर. आणि 1 हेक्टर म्हणजेच 2.47 एकर,1 हेक्टर म्हणजेच 98.84 गुंठे इतके असते. 

Leave a Comment