शेतकरी मित्रांनो आपण व्यवसायासाठी किंवा एक शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे पाळतो त्या जनावरांना असंख्य आजार किंवा रोग हे होत असतात त्या संबंधीत माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की जनावरांना कोणकोणते रोग होतात व त्या रोगाचे लक्षणे काय आहेत व त्यावर उपाय कसा करावा या संबंधित आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे खालील लेख तुम्ही संपूर्ण वाचा.
आजारी जनावराची लक्षणे कोणती
मित्रांनो आपले जनावर आजारी आहे की नाही हे आपण खालील पद्धतीने ओळखू शकतो
- सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपले जनावर आजारी आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्या जनावराचे तापमान पाहणे गरजेचे आहे जर त्या जनावराचे शरीराचे तापमान हे वाढत किंवा घटत असेल तर तेव्हा आपण एक अंदाज लावू शकतो की या जनावराला कोणता तरी आजार हा झालेला आहे किंवा आपले जनावर आजारी आहे
- यानंतर दुसरी पद्धत म्हणजे जर जनावर हे जास्त दमत असेल म्हणजेच की जनावरला श्वास घेताना किंवा त्याच्या हृदयाची ठोके हे कमी जास्त पडत असतील तर तेव्हा देखील आपले जनावर हे आजारी आहे हे आपण समजू शकतो
- यानंतर तिसऱ्या पद्धतीमध्ये जर आपले जनावर हे दूध देणार असेल म्हणजेच गाय किंवा म्हैस असेल आणि जर आपल्याला नुकत्याच काही दिवसात त्या जनावराच्या दुधामध्ये घट दिसून येत असेल म्हणजेच की नेहमी देणाऱ्या दुधापेक्षा कमी दूध जर गाय म्हैस देत असेल तर तेव्हा देखील आपण समजू शकतो की आपले जनावर हे आजारी आहे
- यानंतर आजारी जनावराचे चौथे लक्षण म्हणजे त्या जनावराचे नाक हे जर सुकलेल असेल किंवा नाकातून थोडेफार रक्त येत असेल तर तेव्हा देखील आपले जणावर हे आजारी आहे असं आपण म्हणू शकतो
- यानंतर आजारी जनावराची लक्षणे ओळखण्याची पाचवी पद्धत म्हणजे जर आपले जनावर कमी चार खात असेल किंवा कमी पाणी पीत असेल तर तेव्हा देखील आपले जनावर हे आजारी आहे असे आपण समजू शकतो
- यानंतर आजारी जनावराचे शेण हे अति घट्ट किंवा पातळ स्वरूपाचे असते व त्या शेनाचा वास देखील घाण येत असतो हे पाहून देखील आपण ओळखू शकतो
- यानंतर त्या जनावराचे डोळे हे लाल किंवा डोळ्यातून सतत पाणी वाहत असते
- यानंतर आपले जनावर जर बसताना चारही पाय पोटाजवळ घेऊन बसत असेल तर तेव्हा आपण समजू शकतो की आपल्या जनावराला पोटाचा त्रास होत आहे
- अश्या वरील पद्धतीने आपण ओळखू शकतो की आपले जनावर हे आजारी आहे की नाही
जनावरांना होणारे आजार व उपाय
मित्रांनो खालील दिलेले आजार हे नेहमी जनावरांना होत असतात व त्यावर आपण काय उपाय केले पाहिजे याची माहिती खाली दिलेली आहे ती व्यवस्थितपणे वाचा
जंत आजार
जंत आजार हा एक असा आजार आहे जो प्रामुख्याने जनावरांना होत असतो हा आजार झालेल्या जनावराच्या शरीरावरील कातडी खरखरीत स्वरूपाची होतात, तसेच शरीरावरती केस उभे राहतात, गळ्याखाली सूज येते, जनावराला पातळ जुलाब होण्यास सुरुवात होते, त्याच्या शेना सोबत जंत पडण्यास सुरुवात होते.
जंत आजार उपाय
जर तुमच्या जनावराला जंत आजार झाला असेल तर तुम्ही तुमच्या गुराच्या वजनानुसार प्रति 50 किलो वजनामागे (Wormin) या गोळीचे औषध देऊ शकता
गोचिड आजार
मित्रांनो गोचिड हा एक आजार नाही परंतु या गोचीड मुळे जनावराला खूप त्रास होत असतो. जनावरांना गोचीड होण्याचे कारण म्हणजे गोठ्यातील अस्वच्छता ज्यामुळे जनावरांना गोचिड होते व हे गोचिड जनावरांचे रक्त शोषून घेते व ज्यामुळे जनावरांना रोगजंतू होतात
गोचिड वरती घरगुती उपाय
- मित्रांनो जर तुमच्या जनावराला गोचिड झाली असेल तर त्यासाठी सर्वप्रथम पहिला उपाय म्हणजे त्या जनावराला गोठ्यापासून दूर बांधावे इतर जनावरामध्ये त्याला मिसळून न देणे
- यानंतर दुसरा उपाय म्हणजे जनावराच्या अंगावर जर तुम्हाला गोचिड दिसले तर ते सर्वप्रथम काढून रॉकेल मध्ये टाकून नष्ट करावे
- यानंतर तिसरा उपाय म्हणजे जनावराच्या तोंडाला मुसक्या बांधून त्याच्या अंगावरती कडुलिंबाचा लेप लावावा किमान तासभर तू लेप तुम्ही त्याच्या अंगावर लावावा
पोट फुगी आजार
यानंतर जनावरांना होणारा तिसरा आजार म्हणजे पोटफुगी आजार पोटफुगी एक असा आजार आहे कि जेव्हा जनावर कोवळा चारा किंवा खराब धान्य जास्त प्रमाणात खातात तेव्हा त्यांचे पोट फुगते त्यामुळे जनावर इतर वैरण खात नाही व पोट फुगल्यामुळे त्याला श्वास देखील घेता येत नाही ज्यामुळे त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो
पोट फुगी आजार उपाय
- जर तुमच्या जनावराला पोटफुगी आजार झाला असेल तर त्यावर असा एक उपाय आहे की 590 मिली गोडेतेल, 30 मिली टरपेंटाईन तेल आणि एक ग्राम हिंग याचे मिश्रण करून जनावराला न ठसका लागता पाजावे
- तसेच तुम्ही हा देखील एक उपाय करू शकता की मोठ्या जनावराला 80 ग्रॅम आणि लहान जनावर ला 20 ग्रॅम या प्रमाणात टिम्पाल पावडर पाण्यात मिसळून पाजावे
अतिसार किंवा हगवण आजार
अतिसार किंवा हगवण हा जनावरांना होणारा एक आजार आहे हा आजार जनावरांना खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे होत असतो ज्यामुळे त्यांच्या आतड्यांमध्ये जंत होने किंवा आतड्यांना सूज येते ज्यामुळे जनावर सारखे सारखे शेण टाकते व ते शेण पातळ स्वरूपाचे असते
अतिसार किंवा हगवण आजार उपाय
- मित्रांनो जर तुमच्या जनावराला हगवण आजार झाला असेल तर त्यावर तुम्ही असा उपाय करू शकता की गाई म्हैस जनावरासाठी 30 ते 40 ग्राम नेबलॉन पावडर सोबत दही + पाणी किंवा भाताचा पेज करून तो गोळा दिवसातून तीन वेळा जनावराला भरवा.
- तसेच तुम्ही 50 ते 100 ग्रॅम खडूची भुकटी आणि 50 ते 20 ग्रॅम का एकत्र करून पाण्यात मिसळून तुम्ही जनावराला देऊ शकता