कडबा कुट्टी मशीन योजना 2023-24 अर्ज कसा करायचा

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये ग्रामीण भागात सर्वात जास्त चालणारा व्यवसाय म्हणजे पशुपालन व्यवसाय त्यामध्ये दूध व्यवसाय असेल शेळी पालन मेंढी पालन गाई किंवा म्हशी अशा अनेक जनावरांचा व्यवसाय ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात चालतो परंतु या जनावरांच्या खाद्यासाठी शेतकरी जो चारा वापरतो त्या चाऱ्याचे तुकडे करण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी त्यांचा त्यामध्ये खूप वेळ जातो व असंख्य प्रकारच्या अडचणी येतात त्यामुळे महाराष्ट्र सरकार कडबा कुट्टी योजना ही दरवर्षी प्रत्यक्ष शेतकऱ्यासाठी राबवते याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की या योजनेचा आपण कसा लाभ घेऊ शकतो.

kadba kutti machine yojana arj 2023

कडबा कुट्टी योजनेसाठी अर्ज कसा करायचा

शेतकरी मित्रांनो खालील दिलेल्या पद्धतीनुसार तुम्ही कडबा कुट्टी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

  • मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला (Mahadbt farmer) या पोर्टल वरती जायचं आहे हे तुम्ही गुगल क्रोम वरती जाऊन या (Mahadbt) संकेतस्थळावर जा तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे तुमचा युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. जर तुम्ही याआधी इथे रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही इथे खाली दिलेल्या नवीन अर्जदार नोंदणी बटनावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर एक रजिस्ट्रेशन साठी फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला अर्जदाराचे नाव आणि नंबर व पासवर्ड टाकून तिथे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला तिथे टाकून मोबाईल नंबर आपला व्हेरिफाय करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेला चार शब्दाचा कॅपच्या त्या रिकाम्या बॉक्समध्ये टाकून नोंदणी करा या बटणावर क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर आपलं तिथं रजिस्ट्रेशन हे होईल
  • यानंतर आपल्याला होम पेज वरती यायचं आहे. होम पेज वरती आल्यानंतर आपल्यासमोर आपल्याला दोन पर्याय दिसतील एक वापर करता आयडी आणि एक आधार नंबर आयडी. तर तिथे आपल्याला वापर करता आयडी यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तिथे आपल्याला आपण जे युजरनेम रजिस्ट्रेशन करताना टाकलं ते टाकायचा आहे, ते टाकल्यानंतर खाली पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर खाली दिलेला कॅपच्या भरून लॉगिन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे
  • लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज उघडेल आणि त्यानंतर तिथे खाली दिलेला ऑप्शन असेल अर्ज करा त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर एक पुन्हा नवीन पेज लोड होईल त्यामध्ये आपल्याला कृषी यंत्रणा पुढील बाबी  निवडा या बटनावर क्लिक करायचं आहे
  • त्यानंतर  पुढे एक अर्ज उघडेल त्यामध्ये पहिला पर्याय मध्ये आपल्याला ( कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य) हा पर्याय तिथे निवडायचा आहे. त्यानंतर पुढच्या पर्यायांमध्ये (मनुष्य चलित अवजारे) हा पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर पुढच्या पर्यायांमध्ये आपल्याला आपल्या यंत्राची निवड करायची आहे तर आपले यंत्र हे (कटर श्रेडर) हे निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला खाली मशीनचे प्रकार दिले जातील. त्यामध्ये आपल्याला किती एचपीची कडबा कुट्टी मशीन पाहिजे तसा पर्याय आपल्याला तिथे निवडायचा आहे.
  • त्यानंतर खाली एक सूचना असेल त्यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि त्यानंतर जतन करा या पर्याया वरती आपल्याला क्लिक करायचे आहे.
  • एवढं केल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या होम पेज वरती यायचं आहे आणि तिथे आल्यानंतर अर्ज सादर करा या पर्याया वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर पहा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपण अर्ज करताना ज्या बाबी तिथे निवडल्या त्या सर्व बाबी आपल्याला तिथे दिसून येतील. तिथे आपल्याला प्राधान्य क्रमांक द्यायचे आहेत आणि प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर खाली जतन करा या  पर्यायावरती ते आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर या अर्जासाठी आपल्याला 23 रुपये 60 पैशाचे ऑनलाईन पेमेंट करायचा आहे ते केल्यानंतर आपला अर्ज हा सबमिट होईल.
  • हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर काही दिवसांनी या योजनेची लॉटरी लागेल आणि या लॉटरीमध्ये आपलं नाव जर आलं तर आपण कागदपत्रे तपासून या योजनेचा लाभ घेऊ शकतो

कडबा टी योजना पात्रता

शेतकरी मित्रांनो कडबा कुट्टी योजना 2023 साठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कडबा कुट्टी मशीनचे वाटप येईल. परंतु या योजनेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहेत हे आता आपण जाणून घेऊया.

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही एक शेतकरी असायला पाहिजे
  • त्यानंतर तुमच्या शेतीचे क्षेत्र हे दहा एकर पेक्षा कमी असायला पाहिजे म्हणजेच तुमची शेतजमीन दहा एकर पेक्षा जास्त नाही पाहिजे
  • त्यानंतर तुमचे आधार कार्ड हे तुमच्या मोबाईल नंबर बरोबर लिंक असणे गरजेचे आहे
  • वयोमर्यादा 18 वर्षे पुढे पाहिजे
  • तुम्ही महाराष्ट्र मधील ग्रामीण जिल्ह्यातील रहिवासी असणे गरजेचे असणार आहे
  • लाभार्थ्यांचा व्यवसाय हा शेतीच असला पाहिजे
  • हा अर्ज करताना तुम्हाला लाईट बिल देखील लागणार आहे त्यामुळे तुमच्याकडे सिंगल फेज घरगुती वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे

वरील काही गोष्टी तुमच्याकडे असणे हे गरजेचे आहे अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन या संबंधित अधिक माहिती घेऊ शकता.

कडबा कुट्टी योजना फायदे

शेतकरी मित्रांनो या योजनेचे जर आपण फायदे पाहिले तर आपल्याला असंख्य प्रकारचे फायदे हे होणार आहेत ज्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ देखील होणार आहे. जसे की आपण पाहतो की जनावरे आपण टाकलेला चारा संपूर्ण खात नाहीत त्यामुळे त्याचे नुकसान आपल्याला चाऱ्यामध्ये होते व उत्पादनात देखील होते ते टाळण्यासाठी आपण जर कडबा कुट्टी यंत्रणेचा वापर केला तर तो चारा जनावरे संपूर्ण खातात. व त्या चाऱ्या च्या अन्नद्रव्यांचा उपयोग पुरेपूर जनावरांना मिळतो. आणि आणि या यंत्रणेमुळे आपल्याला अगदी कमी वेळेत जास्त चारा हा बारीक करून मिळतो. असे असंख्य फायदे आपल्याला या कडबा कुट्टी यंत्रणेतून मिळतात त्यामुळे आपण या योजनेचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे.

कडबा कुट्टी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला जर कडबा कुट्टी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा अर्ज करताना लागणार आहेत जमिनीचा सातबारा, आठ क आधार कार्ड, बँक खाते, विज बिल अशी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे.

कडबा कुट्टी योजनेमध्ये सरकार किती अनुदान देते

शेतकरी मित्रांनो कडबा कुट्टी योजनेसाठी सरकार आपल्याला 50 ते 75 टक्के सबसिडी देते म्हणजेच अनुदान देते म्हणजेच जर आपण कडबाव कुट्टी मशीन 20 हजार विकत घेतली तर त्यावर सरकार आपल्याला 10  हजार इतके जास्तीत जास्त रक्कम या योजनेमार्फत देते.

कडबा कुट्टी मशीन किंमत किती आहे

कडबा कुट्टी मशीन किंमत 15 हजार रुपयांपासून ते 20 हजार रुपयांपर्यंत कमीत कमी आपल्याला चांगली मशीन मिळून जाते

Leave a Comment