कांदा चाळ अनुदान | kanda chal anudan yojana

शेतकरी मित्रांनो कांदा चाळ योजना ही शेतकरी कांदे उत्पादकासाठी राबवली जाणारी एक सरकारी योजना आहे.राष्ट्रीय कृषी विभाग योजनेच्या अंतर्गत ही योजना महाराष्ट्रात राबविण्यात येते या योजनेमध्ये आपण जर पाहिलं तर बराखी/चाळ प्रकल्पाच्या ५०% किंवा त्याच्याहून अधिक जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये प्रति मेट्रिक टन इतके अनुदान हे या प्रकल्पासाठी उत्पादक शेतकऱ्याला दिले जाते आणि सरकार प्रत्येक वर्षी या योजनेचा लाभ खूप साऱ्या शेतकरी मित्रांना देत असते.राष्ट्रीय कृषी विभाग हा लहान कांदे साठवण्यासाठी हा चाळ प्रकल्प महाराष्ट्र मध्ये काही ठराविक २० ते २५ जिल्ह्यामध्येच राबवते.आणि या कांद्याच्या  प्रकल्पासाठी सरकार दरवर्षी ४० ते ५० कोटींच्या आसपास निधी खर्च करीत असते व हा प्रकल्प शासन निर्णयानुसार राबवला जातो त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घेता येतो.

कांदाचाळ ऑनलाईन अर्ज 2023

  • शेतकरी मित्रांनो या कांद्याचा योजनेसाठी सर्व शेतकऱ्यांना व कांदा उत्पादकांना महाडीबीटी फार्मर्स च्या माध्यमातून अर्ज हा भरावा लागतो.शेतकरी मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी महाराष्ट्र फार्मर या वेबसाईट वरती जायचं आहे यासाठी तुम्ही गुगलचा वापर करून मोबाईल वरती देखील या वेबसाईट वरती जाऊ शकता
  • या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला लाभार्थ्याच्या अर्जदार लॉगिन इथे जाऊन आपल्याला एक नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे जर आपण रजिस्ट्रेशन या अगोदर केला असेल तर आपल्याला लॉगिन बटनावरती क्लिक करून तिथे आपली लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून खाली दिलेला कॅपच्या भरून आपल्याला लॉगिन करायचं आहे.किंवा आपण आपला आधार नंबर टाकून त्यावर एक ओटीपी येईल तो टाकून सुद्धा आपण या संकेतस्थळावर लॉगिन करू शकतो.
  • लॉग इन केल्यानंतर आपण सर्वप्रथम आपल्याला आपली सर्व माहिती आपल्या प्रोफाईल मध्ये भरून घ्यायची आहे आणि आपण सर्व प्रोफाइल भरल्यानंतरच आपल्याला अर्ज करा अशी एक तिथे बाब दाखवण्यात येईल.त्या अर्ज करा बाब वरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक नवीन टॅब उघडून आपल्याला तिथे तीन बाबी दाखवण्यात येतील त्यामधील आपल्याला सर्वात शेवटी जी फुल उत्पादन ही बाब आहे त्याच्यापुढे पिवळ्या बटनावरती क्लिक करायचा आहे.तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक फुल उत्पादन असा एक अर्ज उघडेल त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम तालुका गाव जिल्हा अशा सर्व गोष्टी योग्य भरायचे आहेत.
  • त्यानंतर गट क्रमांक किंवा संरक्षण क्रमांक आपल्याला भरायचा आहे त्यानंतर पुढे आपल्याला घटक प्रकार निवडायचा आहे याच्यामध्ये आपण दोन नंबरचा इतर घटक हा घटक प्रकार निवडायचा आहेत्याच्यानंतर आपल्याला बाबी निवडा या बटणावर क्लिक करायचं आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन वरती म्हणजेच कांदा चाळ बॅग हाऊस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर आपल्याला उपघटक निवडा या बटणावर क्लिक करायचे आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला कांदा चाळ हा ऑप्शन निवडायचा आहे आणि इथे कांदा चाळ निवडल्यानंतर इतर जे बाकीचे ऑप्शन आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला भरायची गरज नाही 
  • यानंतर आपल्याला या पानावरची अजून एक शेवटची बाब निवडायची आहे ती म्हणजे सर्वात शेवटी असणारी कांदा चाळीची क्षमता त्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे आपल्याला हव्या असणाऱ्या टनाची संख्या तिथे तुम्हाला निवडायचे आहे.त्यानंतर पुढे याला जतन करा अशा खाली दिलेल्या हिरव्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे जतन
  • जतन केल्यानंतर आता आपण या योजनेसाठी फक्त एक बाब निवडली आहे आत्ता यानंतर आपण एक अर्ज भरणार आहोत तर जतन केल्यानंतर मागील आधीची टॅब पुन्हा तुम्हाला उघडलेली दिसेल त्यामध्ये आपल्याला निळ्या बटनामध्ये जतन करा ऑप्शन दिसेल त्यावर आपल्याला सर्वप्रथम आता क्लिक करायचं आहे 
  • तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन टॅब उघडेल त्यामध्ये आपल्याला पहा या निळ्या बटणावर क्लिक करायचे आहे पहा वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला अर्ज सादर करण्यासाठी आपण ज्या बाबी निवडल्या आहेत त्या सर्व आपल्याला तिथे दिसतील याच्यातील आपल्याला त्या सर्व बाबींना प्राधान्यक्रम द्यायचा आहे आपण ज्याप्रमाणे निवडल्या असतील त्याप्रमाणे आपण प्राधान्यक्रम देऊ शकता आणि तसेच खाली योजनेच्या अटी व शर्ती सर्व मला मान्य आहेत त्या लाईनच्या पुढे एक छोटा बॉक्स आहे त्यावर आपल्याला टिक करायची आहे आणि त्यानंतर खाली दिलेल्या हिरव्या बटनावरती म्हणजेच अर्ज सादर करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे अर्ज सादर करा या बटणावर क्लिक केल्यानंतर आपला हा अर्ज सादर हा होईल 
  • त्यानंतर या अर्जाची फी आपल्याला ऑनलाइन रित्या भरण्यासाठी एक नवीन पेमेंट टॅब उघडेल तिथे आपल्याला 23 रुपयाचं ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर आपल्याला हा अर्ज, हा अर्ज केलेल्या बाबींमध्ये आपल्याला दिसायला लागेल तिथे आपण सर्व जी माहिती भरली आहे ती आपल्याला तिथे पाहायला मिळेल आणि तिथे आपल्याला एक संदेश देखील दिसेल जिथे लिहिलं असेल की आपण या अर्जासाठी पात्र आहे 
  •  शेतकरी मित्रांनो या योजनेची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते. याची जेव्हा आपल्याला लॉटरी लागेल त्यानंतर आपल्याला कागदपत्रे ही अपलोड करायची आहेत आणि आपण ज्या ठिकाणचे रहिवासी आहोत. त्याच ठिकाणची आपण माहिती भरा अन्यथा हा अर्ज तुमचा पुढे जाऊन रद्द देखील होऊ शकतो.

कांदा चाळ अनुदानासाठी कागदपत्रे 2023

  • शेतकरी मित्रांनो तुमची जर या योजनेसाठी लॉटरी लागली तर तुम्हाला कोणती कागदपत्रे ही लागणार आहेत हे आपण आता जाणून घेऊयासर्वप्रथम शेतकरी मित्रांनो जेव्हापण तुमची या कांदा चाळ प्रकल्पासाठी निवड केली जाते तेव्हा तुमच्या मोबाईल वरती एक मेसेज येतो ज्यामध्ये नमूद केले असते की तुमची कांद्याचा या प्रकल्पासाठी निवड ही झालेली आहे त्यामुळे आपण अर्ज भरल्यानंतर वेळोवेळी मोबाईल चे मेसेज वाचणे हे गरजेचे आहे आणि हा मेसेज आल्यानंतर आपल्याला कागदपत्रे ही सात दिवसाच्या आत अपलोड करावी लागतात अन्यथा आपला हा अर्ज रद्द केला जातो तर असा मेसेज आला नंतर खालील कागदपत्रे ही आपल्याला अपलोड करावी लागतात.
  • शेतकरी मित्रांना सर्वात प्रथम आपल्याला तलाठी यांच्या सहीचा किंवा डिजिटल सातबारा उतारा हा आपल्याला लागणार आहे त्यानंतर तलाठी यांच्या सही मध्ये डिजिटल आठ अ उतारा हा लागणार आहे.वरील दोन्ही उत्तरे एकतर डिजिटल असावेत किंवा तलाठीच्या सही सोबत असावेत
  • नंतर तुमच्या सातबारा उताऱ्यावर तुम्ही कांदे लागवड करता या बाबत नोंद असणे गरजेचे आहे पिकाची जर नोंद नसेल तर तुम्हाला स्वयंघोषणापत्र हे सादर करावे लागते जेणेकरून हे कळेल की तुम्ही या पिकाची लागवड ही केली आहे आणि या प्रकल्पाचा वापर तुम्ही कांदे साठवण्यासाठी करणार आहेत त्यामुळे स्वयंघोषणापत्र हे देणे गरजेचे आहे
  •  तसेच तुम्ही सातबारा उताऱ्यावर तलाठी यांच्याकडून या पिकाची नोंद ही करून घेणे गरजेचे आहे जर तुमच्या पिकाची नोंद सातबारा वरती असेल तर तुम्हाला स्वयंघोषणा पत्राची गरज नाही 
  • यानंतर तुम्हाला डी.पी.आर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट प्रकल्प हा देखील सादर करावा लागतो १० टन १५ टन २० टन २५ टन अशा प्रत्येक टना वाईस तुम्ही ज्या टनासाठी तुम्ही अर्ज केला आहे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला सादर करायचा आहे 
  • सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे mahadbt या पोर्टलवर आपल्याला आपला आधार क्रमांक हा अपडेट असल्याची खात्री करून घ्यायची आहे.हे सर्वप्रथम आपल्याला पाहिजे आहे अन्यथा आपला अर्ज देखील रद्द होऊ शकतो.आधार कार्ड अपडेट असल्यानंतरच तुम्हाला अनुदानाचे वितरण होणार पूर्ण सहमती मिळणार अशा सर्व गोष्टी तुमच्या आधार नंबर वरती आधारित आहेत.
  • महत्त्वाची सूचना शेतकरी मित्रांनो जर तुमचा आधार क्रमांक हा अपडेट नसेल तर तुमचं अनुदान हे जमा होणार नाही जरी तुम्ही हा तुम्ही प्रकल्प स्वखर्चाने उभारला असेल,त्त्यामुळे सर्व बाबी व्यवस्थित वाचा.
  • तसेच mahadbt  या संकेतस्थळावरती तुमचा आधार नंबर,मोबाईल नंबर,बँक अकाउंट डिटेल ही लिंक असणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला अनुदानाची रक्कम ही खात्यात मिळेल अन्यथा हे रद्द देखील होऊ शकते त्यामुळे या सर्व बाबी आपण तपासूनच अर्ज करा किंवा महाडीबीटी या संकेतस्थळावरती जाऊन या सर्व गोष्टी लिंक देखिल करू शकता.

अनुदान रक्कम खालील प्रमाणे

अ.क्र क्षमता मे.टन कांदा चाळ अनुदान 
०१ ०५ टन १७५००.
०२ १० टन ३५००० 
०३ १५ टन ५२५०० 
०४ २० टन ७०००० 
०५ २५ टन ८७५०० 

FAQ

सरकारकडून किती टनाची कांदाचाळ योजना मिळते

शेतकरी मित्रांनो ह्या कांदा बराखी प्रकल्पामध्ये पाच टना पासून ते पंचवीस टनानापर्यंतचे जे प्रकल्प असतात ते सर्व प्रकल्प या योजनेच्या अंतर्गत राबवले जातात ज्यामध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते.

कांदाचाळ योजना कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते

शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार,पुणे,अहमदनगर,सोलापूर संभाजीनगर,जालना,बीड,लातूर,नांदेड,परभणी,हिंगोली,उस्मानाबाद,अमरावती,अकोला,यवतमाळ बुलढाणा व वाशिम या महाराष्ट्रातील सर्वात जास्त कांदा उत्पादनाच्या ठिकाणी ही योजना दरवर्षी जास्त प्रमाणात राबवली जाते

कांदा चाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे

शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थ्यांना हा प्रकल्प स्वखर्चाने उभारावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाची नोंद सातबारा वरती करावी लागते.आणि लाभार्थ्यांची सातबारा वरती नोंद झाल्यानंतरच त्या लाभार्थ्याला या योजनेचे अनुदान हे दिले जाते

Leave a Comment