शेतकरी मित्रांनो वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचे वातावरण हे आता बदलत चालले आहे आणि त्यामुळे पाऊस केव्हाही पडत आहे ज्याचा परिणाम आता कुठे ना कुठेतरी शेतकऱ्याच्या प्रमुख कांदा पिकावर होत आहे त्यामुळे आज आपण याबद्दल माहिती घेणार आहोत की अवकाळी पावसामुळे किंवा गारपीटीमुळे आपण आपल्या कांदा पिकाचे नुकसान होण्यापासून आपण कसे वाचूवू शकतो.
- शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कांदा पीक घेतलं असेल आणि त्या पिकावर जर कमी स्वरूपाचा थोडाफार पाऊस झाला तर तुमच्या कांदा पिकाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की थोडाफार पाऊस झालेला आहे तर तुम्ही एम 45 या बुरशीनाशकाची फवारणी करू शकता.
- परंतु जर अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाली तर तेव्हा तुमच्या पिकाचं नुकसान हे होऊ शकत कारण की अवकाळी पाऊस व गारपीट ही खूप मोठ्या प्रमाणात होते तर शेतकरी मित्रांनो ते नुकसान टाळण्यासाठी आपल्याला लगेच आपल्याला लागवडी वरती एक फवारणी घ्यायची आहे औषध फवारणी मध्ये आपण सिस्टिमॅटिक बुरशीनाशक ची फवारणी आपण करणार. कारण की पाऊस पडल्यानंतर कांदा पिकावर अनेक प्रकारच्या बुरशीचा अटॅक होत असतो ज्यामुळे आपल्या कांद्याला करपा येतो त्यामुळे आपला कांदा पांढरा पडण्यास किंवा नासण्यास सुरुवात होते ते टाळण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बुरशीनाशक फवारणी करायची आहे, फवारणी ही आपल्याला पाऊस पडल्यानंतर जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करायची आहे जेणेकरून कांदे पिकावर अटॅक होण्याच्या आधीच आपली औषधे त्याला गेली असतात त्यामुळे पिकावर कोणताही परिणाम होत नाही.
- आणि जर समजा तुमच्या पिकावरती गारपीट झाली, तर खरं सांगायचं तर गारपीट जर झाली तर तुमचा कांदा हा तुमच्या शेतात राहत देखील नसतो असे असंख्य उदाहरणे आपण पाहिलीच असतील, तसे पाहिले तर जास्त करून गारपीटी मध्येच शेतकऱ्यांच्या कांद्याचे हे नुकसान होत असते,
- गारपीट मध्ये जास्त करून कांद्याच्या पाती ह्या तुटून जातात, तसेच जर गारपिटीचा जर कांद्यावर मारा बसला तर त्यामध्ये कांदा देखील खराब होतो, तर समजा गारपीट झाल्यानंतर तुमच्या कांद्यावर जर गारपिटीचा कमी प्रमाणात मारा बसला म्हणजेच तुमचा कांदा जर फुटला नाही, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या संपूर्ण पिकाला पाणी द्यायचे आहे जेणेकरून जेवढ्या पण गारा तुमच्या शेतात पडल्या आहेत त्या सर्व गारा त्या पाण्यामध्ये वितळून जातील व गारांपासून तुमच्या पिकाला कोणतेही नुकसान होणार नाही, पाणी द्यायचं कारण असंआहे की जेव्हा तुमच्या पिकांमध्ये त्या गारा पडतात तर त्या गारांचे प्रमाण हे खूप जास्त असते त्यामुळे त्याला वितळण्यास खूप टाईम लागतो आणि त्या टाईम मध्ये तुमचा कांदा हा थंड पडतो त्या गारांमुळे आणि त्यामुळे तुमचा कांदा नासण्याचे किंवा खराब होण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम पाणी द्यायचे आहे जेणेकरून तुमच्या गारा लवकर वितळतील
- यानंतर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्या कांदे पिकावरती बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे, परंतु आपण अशा बुरशीनाशकांची फवारणी करणार की ज्यांचा रिझल्ट हा लवकरात लवकर मिळतो आपण कृषी तज्ञांची माहिती घेऊन अशा बुरशीनाशकांची माहिती घेऊ शकता खालील काही बुरशीनाशके आहे ज्यांचा रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल त्यामध्ये फॉलिक्युलर, कॅब्रेाटॉप, नेटिव्हाे इत्यादी असे अनेक बुरशीनाशक आपल्याला बाजारात मिळतील, फक्त आपल्याला सिस्टिमॅटिक बुरशीनाशकच वापरायची आहेत कारण असे की सिस्टिमॅटिक बुरशीनाशके जी असतात ती पूर्णपणे कांदे पिकाच्या आत मध्ये जाऊन सुद्धा बुरशी ही नष्ट करू शकतात, त्यामुळे गारपीट झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्या पीकला पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर तात्काळ सिस्टिमॅटिक बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे.
पाऊस झालेला कांदा आपण साठवु शकतो का
शेतकरी मित्रांनो पाऊस झाल्यानंतरचा कांदा तुम्ही बिलकुल साठवू शकता परंतु केव्हा जर तुमच्या कांद्या पिकावर कांदा काढायच्या तीस दिवस आधी जर पाऊस झाला असेल तर तेव्हाच तुम्हाला कांदा हा साठवता येईल, आणि जर पाऊस कमी प्रमाणात झाला असेल तर तो कांदा तुम्ही साठवू शकता परंतु जर पाऊस हा जास्त प्रमाणात झाला असेल आणि त्यामुळे जर तुमच्या कांद्याच्या माना मोडल्या असतील, तर तो कांदा तुम्हाला दोन महिन्यापेक्षा जास्त साठवता येणार नाही त्यामुळे गारपिटीचा कांदा काढल्यानंतर जेवढ्या लवकर तुम्हाला तो विकता येईल तेवढया लवकर तुम्हाला तो विकायचा आहे.
उन्हाळी कांदा किती दिवस टिकतो
अनेक सारे शेतकरी जास्त करून कांद्याची लागवड ही उन्हाळ्या मध्ये करत असतात, परंतु त्याला माहीत नसते की उन्हाळी कांदा काढल्यानंतर साठवणुकीसाठी किती दिवस टिकतो, तर शेतकरी मित्रांनो कृषी शास्त्रज्ञांच्या मते रब्बी सीजन मधील कांदा हा साधारणपणे कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत आणि जास्तीत जास्त पाच महिन्यांपर्यंत टिकू शकतो, बाजारामध्ये असंख्य प्रकारची कांदा बियाणे ही आपल्याला पाहायला मिळतात त्यांची लागवड करून आपण कांदा खूप काळ देखील टिकवु शकतो.
चाळीमध्ये कांदा कसा साठवायचा
- शेतकरी मित्रांनो सरकार दरवर्षी खूप प्रमाणात कांदा चाळ योजना ही राबवत असते त्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांदा चाळ ही मोफत मिळते, तर त्यामुळे आता आपण माहिती घेऊया की या कांदा चाळ मध्ये आपण योग्य प्रकारे कांदा कसा साठवणार, कारण की काही शेतकऱ्यांना कांदा योग्य प्रकारे कसा साठवला जातो याची माहिती नसते त्यामुळे कांदा चाळ मध्ये ठेवलेला कांदा देखील त्यांचा खराब होतो किंवा जास्त काळ टिकत नाही.
- सर्वप्रथम कांदा साठवण्यासाठी आपण चाळीमध्ये कांदा हा पाच फुटापर्यंत उंच इतका साठवणार कारण की पाच फुटाच्या वरती जर आपण कांदा साठवला तर खाली जो कांदा असतो तो दबावामुळे नासण्यास किंवा बुरशी लागण्यास सुरुवात होते ज्याचं नुकसान आपल्याला संपूर्ण कांद्यावरती पाहिले मिळते त्यामुळे आपल्या कांदा चाळीची उंची कितीही उंच असू द्या त्याचा काहीच फायदा नाही फक्त आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपण चाळीमध्ये जो कांदा साठवणार तो कांदा हा पाच फुटापर्यंतच साठवणार हे आपल्याला लक्षात घ्यायच आहे.
- यानंतर शेतकरी मित्रांनो कांदा चाळ मधील रुंदी ही आपल्याला 4 फुट इतकी ठेवायची आहे. जर आपण रुंदी जास्त ठेवली तर चाळीमध्ये हवा पास होणार नाही. ज्यामुळे आपला कांदा चाळ मध्ये असलेला मधील कांदा हवा न लागल्यामुळे खराब होईल.
- यानंतर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये ऊन हे खूप उष्ण असते त्यामुळे कांद्या चाळीवर जो पत्रा असतो तो खूप प्रमाणात तापतो आणि त्याची उष्णता कुठे ना कुठे आपल्या खाली चाळीमध्ये उतरते ज्यामुळे आपल्या कांद्याला उष्णता लागते आणि जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होते आणि वातावरण संपूर्ण थंड होते तेव्हा आपला कांदा उष्ण असल्यामुळे तो खराब होण्यास सुरुवात होते. तर शेतकरी मित्रांनो नुकसान होण्यापासून टाळण्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये चाळीच्या पत्र्यावरती सावली राहिल अस काहीतरी नियोजन करायच आहे जेणेकरून पत्रात तापणार नाही व कांद्याला उष्णता देखील लागणार नाही परंतु जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होईल तेव्हा आपल्याला ते काढून टाकायच आहे असं आपल्याला चाळीसाठी थोडक्यात नियोजन करायचा आहे.
- यानंतर खूप सारे शेतकरी हे कांदा चाळ भरत असताना कांदे हे वरून टाकतात त्यामुळे खूप कांदे फुटतात व खराब होतात आणि त्याचा परिणाम बाकी कांद्यांवर देखील होतो त्यामुळे कांदा चाळ भरत असताना आपल्याला कांदे हे व्यवस्थितपणे चाळीमध्ये भरायचे आहेत आणि बाजारामध्ये असंख्य कांदा जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी पावडर मिळतात त्या पावडरचा अभ्यास करून आपल्याला त्या पावडरी चाळीमध्ये टाकायच्या आहेत कसं एकंदरीत आपल्याला कांदा भरण्यासाठी नियोजन करायचा आहे.