उन्हाळी व पावसाळी कांदा बियाणे | kanda lagwad biyane

उन्हाळी व पावसाळी कांदा लागवड करण्यासाठी किंवा शेतकरी मित्रांनो कोणतही पीक लागवड करण्यासाठी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे बियाण्यांची चांगल्या प्रकारे निवड करणे हे खूपच गरजेचे असतं आणि जर आपण बियाणे हे चांगल्या प्रकारचे किंवा चांगल्या क्वालिटीचे निवडले नाही तर याच नुकसान आपल्याला पुढे कांदा उत्पादनात देखील होतो,त्यामुळे योग्य प्रकारचे बियाणे निवडणे हे खूपच गरजेचे आहे

उन्हाळी लाल कांदा लागवड बियाने

  • तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी कांदा पीक लागवडीसाठी सर्वात प्रथम जे कांदा बियाणे असणार आहे ते म्हणजे आपलं जे पंचगंगा कंपनीच पुना फुरसुंगी हे जे बियाणं आहे हे आपल्याला चांगले प्रकारचे उत्पन्न देण्यास मदत करते.शेतकरी मित्रांनो आपण जर पुना फुरसुंगी या बियाण्याचे जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर आपल्याला अतिशय कमी कालावधीमध्ये कांदा पीक काढणीस आलेलं पाहायला मिळतं जवळपास ८० ते ९० दिवसांमध्ये या बियाण्याचे पीक आपल्याला काढणीस मिळते.तर शेतकरी मित्रांनो पुना फुरसुंगी या बियाण्याच्या कांद्याचा आकार पाहिला तर आपल्याला हा कांदा चपट्या आकाराचा पाहायला भेटतो आणि त्याच्यासोबतच एक भुरकट लालसर रंग आपल्याला या कांद्यावर पाहायला भेटतो शेतकरी मित्रांनो पुना फुरसुंगी या  बियाण्याच्या कांद्या साठवणुकीचा जर आपण विचार केला म्हणजेच आपण कांदा काढल्यानंतर किती दिवस तो कांदा साठवून ठेवू शकतो हे जर आपण पाहिलं तर या कांद्याची साठवणूक क्षमता ही ५ ते ६ महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते जर आपण मे महिन्यात हा कांदा काढला असेल तर आपण ऑक्टोंबर ते सप्टेंबर महिन्यापर्यंत हा कांदा साठवून ठेवू शकतो.
  •  तर शेतकरी मित्रांनो आता आपण पुढील कांद्याचे बियाणे पाहूया तर पुढील दुसरे कांद्याचे बियाणे आहे प्रशांत सीड्सच प्रशांत फुरसुंगी किंवा आपल्याला एन टू फोर वन हे नवीन नावाने ओळखले जाणारे प्रशांत सीड्स बियाणं आपण वापरू शकतो तर या बियाण्याचा जर आपण कालावधी पाहिला म्हणजेच लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे दिवस पाहिले तर ११० ते १२० दिवसाच्या कालावधीपर्यंत हा कांदा आपल्याला काढणीस मिळतो शेतकरी मित्रांनो या कांद्याचा जो आकार आहे तो आपल्याला चपट्या आकाराचा पाहायला मिळतो आणि या कांद्याचा कलर आहे तो आपल्याला थोडा भुरकट लालसर रंगाचा आपल्याला कलर पाहायला मिळतो आणि या कांद्याची लेयर ही आपल्याला डबल पत्ती लेयर पाहायला मिळते ज्यामुळे आपण जर हा कांदा साठवून ठेवत असाल तर या कांद्याला बुरशी लागण्याचे प्रमाण हे थोडे कमी होते हे या कांद्याचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत आणि यानंतर शेतकरी मित्रांनो या कांद्याचा साठवणुकीचा जर आपण कालावधी पाहिला तर आपण हा कांदा पाच ते सहा महिन्यापर्यंत साठवून ठेवू शकतो
  • शेतकरी मित्रांनो आता आपण कांदा लागवडीचे तिसरे बाण पाहूया तर तिसऱ्या बाणाचे नाव आहे एलोरा सीड तर या एलोरा सीड या कंपनीचा जो कांदा आहे तो आपल्याला एलोरा फुरसुंगी या नावाने पाहायला मिळतो आणि या कांद्याचा एकंदरीत लागवडीपासून ते काढणीपर्यंत जो कालावधी आहे तो जवळपास आपल्याला १२० ते १३० दिवसांचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतो तरी या कांद्याचा जो कालावधी आहे तो आपल्याला इथे इतर कांद्यापेक्षा थोडाफार जास्त दिवसांचा पाहायला मिळतो त्यामुळे या कांद्याची लागवड इतर कांद्याच्या लागवडीच्या २० ते २५ दिवस आधी करावी जेणेकरून सर्व कांदा काढण्याचा कालावधी हा एकच येईल व त्यात तुमचे नुकसान देखील होणार नाही आणि या कांद्याचा जो आकार आहे तो आपल्याला अंडा आकाराचा कांदा हा आपल्याला हा पाहायला भेटतो आणि या कांद्याचा जो कलर आहे तो आपल्याला गुलाबी रंगाचा कलर आपल्याला पाहायला भेटतो आणि यानंतर या कांद्याच्या साठवणुकीचा जर आपण विचार केला तर जवळपास सात ते आठ महिने आपण हा कांदा चाळीमध्ये किंवा शेडमध्ये टिकवून ठेवू शकतो आणि या कांद्याला देखील आपल्याला जवळपास दोन लेअर म्हणजेच डबल पत्ती पाहायला मिळतात
  • यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पुढील उन्हाळी कांदा लागवडीचे चौथे बाण पाहिले तर ते आहे जिंदल कंपनीचं जिंदल फुरसुंगी नावाने ओळखले जाणारे हे बाण आहे आणि हे जिंदल फुरसुंगी हे बाण देखील आपल्याला खूप जास्त प्रमाणात उप्तन्न देण्यास मदत करतं आणि त्यासोबतच या बाणाची वैशिष्ट्य म्हणजे या बाणाचा कांदा आपण आठ ते नऊ महिन्यापर्यंत साठवणूक करून ठेवू शकतो आणि या कांद्याचा साठवणुकीचा कालावधी जास्त असल्यामुळे हा कांदा लवकर खराब होत नाही त्यामुळे या कांद्याला जास्त मागणी देखील मिळते तर मित्रांनो या कांद्याचा जर आपण कालावधीचा विचार केला म्हणजेच की लागवडीपासून ते काढणीपर्यंत किती कालावधी लागतो तर या कांद्यासाठी तर जवळपास ११० ते १२० दिवसांचा कालावधी आपल्याला हा कांदा काढण्यासाठी लागतो आणि यानंतर मित्रांनो या कांद्याचा जो आकार आहे तो आपल्याला गोलाकार आकार पाहायला मिळतो आणि त्यासोबत हा कांदा एक डबल पत्ती कांदा आहे आणि डबल पत्ती असल्यामुळे या कांद्याच्या वजनात कमी प्रमाणात घट होत असते

पावसाळी कांदा लागवड बियाणे

  • सर्वप्रथम जी पहिली कांदा व्हरायटी आहे तर ती म्हणजे एलोरा चायना किंग आहे ही व्हरायटी आपण पावसाळी कांदा लागवड करण्यासाठी निवडू शकतो.आता हि लागवड करण्या पासून ते काढणीपर्यंतचा जो काही कालावधी आहे तर तो आहे ८० ते ९० दिवसांमध्ये हा कांदा निघतोय या कांद्याचा रंग हा गडद लाल कलर आहे याचे उत्पन्न देखील आपल्याला बरोबर पद्धतीने चांगले पाहायला मिळते आणि सर्वात महत्वाच म्हणजे शेतकऱ्यांच्या पसंतीचे असे हे लाल कांद्याचे बियाणं आहे आता याची जी लागवड आहे तर ती आपल्याला कधी करायला पाहिजे तर जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला याची लागवड करायची आहे आणि याचे उत्पन्न जे आहे तर ते ८० ते ९० दिवसांमध्ये आपल्याला निघते 
  • यानंतर जी काही दुसरी आणि तिसरी जी कांद्याची व्हरायटी आहे तर या दोन्ह्ही एकच व्हरायटी आहेत, तर ती म्हणजे पंचगंगा शेडसे  तर यामध्ये आपल्याला दोन प्रकार बघायला मिळतात निफाड स्पेशल आणि एक्स्पोर्ट स्पेशल तर ह्या दोन प्रकारांमध्ये आपल्याला पंचगंगा शेडचे हे पहायला मिळते.याची जी काही टिकवण क्षमता आहे आणि क्वालिटी आहे ही एक नंबर आहे आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त संपणार हे पंचगंगाचा जो काही कांदा आहे तर हा आहे,याचा जो काही कालावधी आहे तो ८० ते ९० हा कांदा निघतोय त्याच्यानंतर जे काही तिसरं महत्त्वाचं बियाणं आहे तर ते म्हणजे N५३ जे विद्यापीठाणी प्रमाणित केलेले बियाणे आहेत आपण मार्केटमध्ये भरपूर सारी N५३ पण आपल्याला बघायला मिळतात लाल कांदा जो काय आहे तर हा N५३ म्हणून आपल्याला ओळखला जातोय तर हा देखील आपण खरेदी करू शकता.
  • त्याच्यानंतर जे काही चौथं बियाणं आहे तर ते म्हणजे बसवंत ७८० हे जर बियाणं आपण खरेदी केलं तरी देखील आपल्याला भरपूर प्रमाणात असं उत्पन्न मिळेल.खुप प्रमाणात शेतकरी हे याचीच लागवड करतात. ८० ते ९० दिवसांमध्ये निघणार हा जो काही बसवंत 780 हा कांदा आहे लाल कांदा आहे तर याची देखील आपण लागवड करू शकतो याचा कलर देखील हा लाल कलर मध्ये निघतो याच वजन देखील जास्त प्रमाणात निघते, जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये आपण याची लागवड करू शकतो आणि ८० ते ९०  दिवसांमध्येच निघणारा हा जो काही कांदा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो
FAQ

एलोरा कांदा बियाणे किंमत

एलोरा कांदा बियाणे किंमत ही प्रती किलो ३००० हजार रुपये इतकी आहे.

पंचगंगा कांदा बियाणे किंमत

पंचगंगा कांदा बियाणे किंमत ही प्रती किलो ३४०० इतकी आहे.

लागवडीपासुन कांदे वाढण्यास किती वेळ लागतो?

कांदा लागवडी पासून काढणीपर्यंत सुमारे ९० ते १०० दिवस हे लागतात.

Leave a Comment