कांदा लागवड,पेरणी,खत व्यवस्थापन | kanda lagwad mahiti

भारतामध्ये महाराष्ट्र जे राज्य आहे त्याच कांदा पीक लागवडी व उत्पादनात प्रथम क्रमांक लागतो त्यामागचं कारणही असं आहे की इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मधलं जे वातावरण आहे हे या पिकासाठी वर्षभर अनुकूल असणार हवामान आहे त्यामुळे आपल्याला माहित असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये खरीप,रांगडा,रब्बी आणि उन्हाळी म्हणजेच गावरान अशा सर्व प्रकारच्या हंगामातला कांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये पिकवला जातो,आणि या पिकासाठी पंचगंगा आणि एलोरा हि दोन बियाणे प्रामुख्याने महाराष्ट्रात वापरली जातात आणि आजच्या काळामध्ये या बियान्यांचे भाव देखिल खुप वाढत चालले आहेत. पण या पिकांमधून जेवढं उत्पन्न शेतकऱ्याला मिळायला पाहिजे तेवढ उत्पन्न आपल्या खर्चाच्या मानाने मिळत नाही.परंतु सरकार दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्यासाठी चाळ अनुदान किंवा अनुदान हे देत असते जेणेकरून शेतकऱ्याला थोडीफार मदत हि होत असते.

कांदा लागवडीसाठी रान कसे तयार करावे

  • रान तयार करताना दोन प्रकारची उभी व आडवी अशी नांगरट झाली पाहिजे त्यामध्ये आपण ट्रॅक्टर किंवा कोळपणीच्या साह्याने चांगले जमीन भुसभुशीत करून घेणार त्यानंतरच आपल्याला गादीवाफे किंवा सरी लागवड करायची आहे. या पिकासाठी शक्यतो आपण लवनातल वावर हे वापरू नका कारण म्हणजे लवनातल जे वावर असतं त्याला जमिनीचा उतार हा कमी असतो व तेथे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे आपल पीक खराब देखील होऊ शकते. यानंतर आपल्याला वावरामध्ये बेसल टाकायचे आहे आपण बेसल हे दोन गोणी 10 26 26 ची प्रती एकर टाकणार. त्यानंतर अर्धी गोणी किंवा एक कोणी जास्तीत जास्त एम ओ पी आणि यानंतर 12 32 16 मध्ये जर पाहिलं तर आपल्याला दोन गोणी 12 32 16 आणि दीड गोणी एमओपी असं टाकायचं आहे परंतु यामध्ये आपल्याला मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायच आहे आणि यानंतर एखाद्याला जर आठ ते दहा महिने कांदा हा टिकून ठेवायचा असेल तर त्यांनी दहा किलो गंधक घ्यायचा आहे आणि ज्याला चांगला ठेवायचा असेल त्यांनी सिलिकॉन स्प्रे वापरा हे सगळं आपल्याला खाली बेसला टाकायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला लागवड करण्यास सुरू करायची आहे
  • त्या अनुषंगाने जर कांद्याच्या पीक लागवडीसाठी हवामानाचा जर विचार केला तर या पिकासाठी थंड आणि कोरडं हवामान असणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की जी उन्हाळी रब्बी लागवड असते. तर या लागवडीमध्ये कांद्याचे उत्पादन हे जी आपण खरीप हंगामामध्ये लागवड करतो किंवा रांगडा पीक लागवड करतो याच्यामधून जेवढे उत्पादन होते त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन आपल्याला या उन्हाळी हंगामात हे मिळत असत जमिनीचा जर विचार केला तर या पिकासाठी चांगली भुसभुशीत तसेच मध्यम ते मध्यम भारी जमीन आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असेल तर आपल्याला उत्पन्नात निश्चितच वाढ झालेली दिसून येईल त्याचबरोबर जमिनीतील मातीचा जो सामू आहे 6.5 ते 7.5 या दरम्यान असला तर तो अतिशय चांगला सामू मानला जातो आणि त्यामधून आपल्याला उत्पादनात देखील वाढ झालेली पाहिला मिळते. पीक उत्पादन घेत असताना आपल्याला ज्या वस्तू सामग्री लागतात या सर्व सामग्रीमध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये बियाणे असतील, इतर कीटकनाशके असतील, हार्वेस्टिंग,असेल म्हणजे पीक काढेपर्यंत पर्यंत किंवा नांगरणी तसेच,आंतरमशागत असेल अशा सर्व गोष्टीचा जर विचार केला तर कधी कधी यामध्ये आपण बियाण्यांकडे दुर्लक्ष करतो

लागवडीसाठी बियाण्यांची निवड

आपल्या महाराष्ट्र मध्ये चांगल्या बाणाचा जर विचार केला आपण तर सर्वात पहिलं बाण आहे पुना फुरसुंगी हे चांगल्या प्रकारचे त्याचबरोबर भीमाशक्ती हे देखील चांगलं बाण आहे यानंतर एन टू फोर वन हे देखील चांगलं बाण आहे अशी तीन चार बाण महाराष्ट्र मध्ये चांगल्या प्रकारे प्रचलित आहेत परंतु बियाण्याची निवड करताना जे आपण बियाणं निवडणार ते आपल्या डोळ्यासमोरील असलं पाहिजे म्हणजेच की त्याचे उत्पादन कसं होत हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

पेरणी कशी करायची

पेरणी करत असताना आपण गादीवाफा च तयार केला पाहिजे गादीवाफा हा भुसभुशीत असला पाहिजे त्यामध्ये तीन मीटर लांबी आणि एक मीटर रुंदी आणि पंधरा सेंटीमीटर च्या आसपास उंची असायला पाहिजे आणि भुसभुशीत केलेल्या गादीवाफ्यावरती आपल्याला लाइनिंग टाकून पेरणी करायची आहे आणि पेरल्यानंतर ते व्यवस्थित झाकून घ्यायचे आहे त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी हलक्या स्वरुपात पाणी द्यायचे आहे.

रोप तयार होण्याचा कालावधी

रोप तयार होण्यास सात ते आठ आठवड्याने तयार होते म्हणजेच की या रोपाला तयार होण्यासाठी दीड ते पावणे दोन महिने लागतात संपूर्ण लागवडीसाठी तयार होण्यासाठी आणि जेव्हा हे डेट ते दोन महिन्यात रोप तयार होतं तर ते रोप जेव्हा आपल्याला दुसऱ्या शेतामध्ये लावायचं असेल तर तेव्हा त्या शेतामध्ये इतर बुरशीचा अटॅक किंवा इतर घटकांचा अटॅक आपल्या रोपावरती न होण्यासाठी आपण त्या शेतामध्ये रोप टाकायच्या आधी तिथे पाणी मारून घ्यायचा आहे आणि जे आपलं तयार झालेलं कांद्याचे रोप आहे ते आपण 100 लिटर पाण्यामध्ये 200 एम एल कार्बो सल्फ आणि 200 ग्रॅम कार्बन डायजियम टाकून द्यायचा आहे आणि या द्रावणामध्ये आपल्याला ती रोपे पाच ते दहा मिनिटे बुडवून त्यानंतरच लागवडीसाठी दुसऱ्या वावरामध्ये किंवा शेतामध्ये न्यायचे आहेत ज्यामुळे आपल्या रोपांवरती बुरशीचा किंवा इतर कीटकांचा अटॅक कमी प्रमाणात होऊ शकतो आणि आपली लागवड देखील चांगली होऊ शकते.

लागवड कशी करावी

आता आपण जी लागवड करणार ती कायमस्वरूपी लागवड करणार म्हणजेच फायनल लागवड करणार त्यामुळे ही लागवड करताना आपल्या शेतात सपाट वाफे पद्धत असली पाहिजे. आणि या लागवडीसाठी जमिनीची व्यवस्थितपणे नांगरट हे होणे गरजेचे आहे नांगरणी झाल्यानंतर त्यावरती दोन कुळवणी किंवा दोनदा रोटर मारून आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण जी दुसरी कुळवणी मारणार त्यामध्ये आपला जो भेसळ डोस असणार आहे तो आपल्याला शेतामध्ये टाकायचा आहे म्हणजेच की आपल्याला शेतामध्ये 15 15 च्या किंवा 12 32 16 च्या दीड ते दोन गोणी शेत तयार करताना टाकायचे आहे बेसल डोस म्हणून यानंतर प्रति एकर एक ते दहा टन इतकं शेणखत आपल्या शेताला आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर गांडूळ खत किंवा कोंबडी खत एक टनाच्या आसपास देखील आपल्या शेतामध्ये गेला पाहिजे अशा सर्व गोष्टी आपल्याला दुसऱ्या कुळवणीच्या वेळेस करून घ्यायच्या आहेत शेतामध्ये त्यानंतर लागवड करण्यासाठी दोन दोन कांद्याच्या रोपांमध्ये अंतर ठेवणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे एका कांद्यामध्ये चार ते पाच इंच एवढं अंतर तुम्ही ठेवायला पाहिजे त्यामुळेच कांदा नंतर तुम्हाला चांगला फुगलेला देखील दिसेल

खत व्यवस्थापन

  • कांद्यांचे रोपांची मुळे ही उथळ असल्यामुळे ते जास्त खोलवर जात नाहीत त्यामुळे आपल्याला त्या रोपांना योग्य वेळी खत देणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे आपण लागवड करायच्या आधी चांगलं शेणखत किंवा गांडूळ खत शेताला दिलं पाहिजे अशा सेंद्रिय खतामुळे कांद्याची जी साठवणूक क्षमता आहेत ती वाढण्यास मदत होते. या पिकासाठी तीन महत्त्वाचे खत आहेत म्हणजेच अन्नद्रव्य आहेत त्यामधील पहिलं म्हणजे नत्र नत्र हे पिकाच्या वाढीसाठी खूप मदत करते आपण जेव्हा लागवड करतो तेव्हापासून किमान दोन महिन्यापर्यंत नत्र या खताची आपल्याला गरज भासते जेव्हा आपण लागवड करतो त्याच्या दोन तीन आठवडे जर आपण नत्र हे आपण पिकाला टाकलं तर त्याचा फायदा आपल्याला पुढे दिसून येतो या पिकासाठी हेक्टरी 100 किलो नत्राची आवश्यकता आपल्याला भासते नत्र खत देताना सुरुवातीच्या लागवडीच्या वेळेस आपण 50 किलो खत द्यावे आणि उरलेले जे 50 किलो नत्र आहे ते आपण पुढील दोन तीन आठवडे विभागून पिकाला द्यावे जसं तुम्ही लागवडीनंतर वीस दिवसांनी 25 किलो किंवा 45 दिवसांनी 25 किलो असेही देऊ शकता
  • यानंतर आपल्याला या पिकाच्या मुळाच्या वाढीसाठी आपल्याला फॉस्फरस हे द्यायचा आहे याला काही भागात स्फुरद असे देखील म्हटले जाते प्रत्येक हेक्टरी 50 किलोच्या आसपास स्फुरद आपल्याला सुरुवातीला लागवडीच्या टायमाला रोपांना द्यायचे आहे असे हे दुसरं अन्नद्रव्य आहे ते म्हणजे स्फुरद हे देखील आपल्याला पिकासाठी द्यायचा आहे.
  • यानंतर तिसरे जे मुख्य अन्नद्रव्य आहे ते म्हणजे पालाश शेतकरी मित्रांनो पालाश हे अन्नद्रव्य सर्वांच्या जमिनीत भरपूर प्रमाणात उपलब्ध असते परंतु जेवढे या पिकासाठी असायला पाहिजे तेवढे शेतामध्ये ते उपलब्ध नसल्या कारणामुळे कांदा जास्त काळ टिकत नाही त्यामुळे जास्त काळ टिकवण्यासाठी आणि पेशींना काटकपणा आणण्यासाठी तसेच गोलाकार आणि कांद्याला आकर्षक रंग येण्यासाठी या पालाश अन्नद्रव्याची आवश्यकता असते पालाश आपल्याला पिकाच्या लागवडीच्या आधी जेव्हा आपण पहिला बेसल डोस देतो तेव्हा आपल्याला पालाश द्यायचा आहे पालाश देताना प्रति हेक्टर 50 किलो असे आपल्याला द्यायचे आहे तसेच आपण गंधक युक्त खतांचा देखील वापर केला पाहिजे जेणेकरून कांद्याची जी साठवणूक क्षमता असते ती वाढण्यास मदत होते
  • कांदे पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज देखील लागते जर आपण लागवडीच्या आधी शेतात सेंद्रिय खताचा वापर जास्त केला तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासत नाही आणि जर आपण सेंद्रिय खताचा वापर कमी केला तर आपल्याला थोडी फार सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासते परंतु जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर जास्त प्रमाणात केला तर त्याचा परिणाम आपल्याला कांदे पिकामध्ये पाहायला भेटतो त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीला देताना फवारणीच्या माध्यमातून द्या नाहीतर कमी प्रमाणात त्या जेणेकरून तुमच्या कांद्याचे उत्पादन चांगलं प्रकारे होईल या पिकासाठी खालील मुख्य सुषमा अन्नद्रव्यांची गरज भासते तांबे लोह दस्त मॅग्नेशियम मॅग्नीज बोरॉन व सिलिकॉन अशा सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज खास करून भासते.

FAQ

कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध वापरावे

160 लिटर पाण्यामध्ये जिबिरलिक एसिड च्या  35 रुपयाच्या दोन ते तीन डब्या टाकायच्या आहेत आणि हे द्रावण पंपाद्वारे आपल्याला पिकाला फवारायचे आहे जेणकरून आपला कांदा चागला फुगेल.

खताचे नियोजन कसे करायचे

यानंतर खताचे नियोजन करण्यासाठी जे आपल्याला बाजारामध्ये 15 15 चे खत भेटते ते तुम्ही 300 ग्रॅम देऊ शकता त्याचबरोबर शेणखत देखील तुम्ही तीन ते चार किलोच्या आसपास देऊ शकता हे सर्व मिक्स करून तुम्ही गादीवाफ्यामध्ये रोप टाकू शकता.

Leave a Comment