कोल्हापुरी कांदा लसूण मसाला | kanda lasun masala

कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हा एकूण तीन प्रकारामध्ये बनवला जातो.त्यामधील सर्वात पहिला प्रकार म्हणजे की कोल्हापुरी कांदा लसून मसाला बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कोल्हापुरी लाल मिरची बनवावी लागते. त्यानंतर कांदा लसून मसाला बनवण्यासाठी आपल्यला खडे मसाले देखिल असणे हे गरजेचे आहे. तर आत्ता खाली दिलेली सर्व सामग्री आपल्याला १ किलो कोल्हापुरी कांदा लसून मसाला बनवण्यासाठी लागणार आहे.

कांदा लसून मसाला साहित्य | kanda lasun masala 1 kg

75 ग्रॅम काश्मीरी मिरची , 25 ग्रॅम जीरा , १२ ग्रॅम राई , ५ ग्रॅम दालचिनी , १२ ग्रॅम काली मिर्च

६० ग्रम बेडगी मिरची , ३ ग्रॅम शहाजीरा , १२ ग्रॅम सफेद तेल , ५ ग्रॅम स्टार फुल , ३ ग्रॅम जावित्री

१२० ग्रम लवंगी मिरची , १२ ग्रॅम सोफ , २ ग्रम खसखस , ५ ग्रॅम लवंग , ३ ग्रॅम त्रिफळ , 25 ग्रॅम जीरा , ३ ग्रॅम नागकेसर , ३ ग्रॅम हिंग , ७५ ग्रॅम कांदा  २५ ग्रॅम अद्रक , ३ ग्रॅम मोठी इलायची  , १२ ग्रॅम हळद

६० ग्रॅम लसूण , ३ ग्रॅम मेथीचे दाणे , ३ ग्रॅम दगडाची फुल , ३ ग्रॅम हिरवी इलायची ,६० ग्रॅम किसलेला खोबरा

कोल्हापुरी मसाला | 1kg kanda lasun masala recipe

कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी आपल्याला 75 ग्रॅम काश्मीरी मिरची,६० ग्रम बेडगी मिरची, १२० ग्रम लवंगी मिरची घ्यायची आहे.आणि ती मिरची आपल्याला एक ते दोन दिवस उन्हातमध्ये वाळवण्यासाठी ठेवायची  आहे त्यानंतर आपल्याला त्या मिरचीचे सर्व देठ काढून घ्यायचे आहेत मिरच्या ह्या कडक असल्या पाहिजेत जेणेकरून मसाला हा खूप बारीक वाटता येईल.

आता यानंतर जो दुसरा प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला सर्व खडे मसाले घ्यायचे आहेत ज्यामध्ये अर्धे खडे मसाले आपण तव्यावर भाजून घेणार व अर्धे खडे मसाले आपण तेलामध्ये तळून घेणार,तर सर्वप्रथम आपल्याला गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे आणि खडे मसाले भाजताना गॅस हा मंद ठेवायचा आहे जेणेकरून खडे मसाले व्यवस्थित भाजतील तवा गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्या मध्ये 60 ग्रॅम इतके धने टाकायचे आहेत महत्त्वाची टीप आपल्याला खडे मसाले हे पूर्णपणे भाजून घ्यायचे नाही आपल्याला ते फक्त थोडेसे गरम करायचे आहेत जोपर्यंत त्या खडे मसाल्याचा वास नाही येत तोपर्यंत आपल्याला ते गरम करायचे आहेत तर धने गरम करून घेतल्यानंतर आपल्याला ते सेपरेट एका वाटीमध्ये काढायचे आहेत त्यानंतर पुन्हा तव्यामध्ये आपल्याला 25 ग्रॅम जीरा व ३ ग्रॅम शहाजीरा आणि १२ ग्रॅम सोफ आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे तव्यावरती गरम करून घ्यायचा आहे गरम झाल्यानंतर आपल्याला हे गरम केलेल्या धन्यामध्ये मिक्स करायचे आहेत

त्यानंतर आपल्याला परत त्या तव्यामध्ये १२ ग्रॅम राई, 12 ग्रॅम सफेद तेल आणि १२ ग्रम खसखस घ्यायची आहे आणि आपल्याला त्या तव्यावरती ते गरम करून घ्यायचे आहेत आणि गरम झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व मसाले त्याच गरम केलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला शेवटी तेज पत्ता त्या तव्यावरती थोडा गरम करून घ्यायचा आहे आणि तो देखील आपल्याला त्या सर्व गरम केलेल्या मसाल्यामध्ये टाकायचा आहे आत्ता कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी जेवढे खडे मसाले भाजावे लागतात ते आपण आता भाजून घेतले आहेत आता आपण उरलेले खडे मसाले जे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत आता आपण ते पाहूया

तर आपल्याला एका वाटीमध्ये ५ ग्रॅम दालचिनी ५ ग्रॅम स्टार फुल ५ ग्रॅम लवंग १२ ग्रॅम काली मिर्च ३ ग्रॅम मोठी इलायची ३ ग्रॅम हिरवी इलायची ३ ग्रॅम जावित्री ३ ग्रॅम त्रिफळ आणि ३ ग्रॅम नागकेसर हे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत.तर आत्ता आपल्याला एका कढईमध्ये चार ते पाच मोठे चमचे तेल घालून ते तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या गरम तेलामध्ये हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर ते सर्व मसाले आपल्याला एका सेपरेट वाटीत काढून घ्यायचे आहेत आणि पुन्हा परत त्या तेलामध्ये आता आपल्याला १२ ग्रॅम हळद ३ ग्रॅम हिंग ३ ग्रॅम मेथीचे दाणे या मसाल्याला पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला परत त्याच वाटीमध्ये हे टाकायचे आहेत यानंतर आपल्याला आत्ता शेवटचा मसाला भाजून घ्यायचा आहे तर तेलामध्ये टाकणार ३ ग्रॅम दगडाची फुल आणि ते तेलामध्ये बाजूने पुन्हा आपण त्याच वाटीमध्ये हे टाकणारतर आत्ता आपले खडे मसाले भाजून घेण्याचा व तेलात तळण्याचा दुसरा प्रकार पूर्णपणे पूर्ण झाला आहे.

आता आपण तिसरा प्रकार पाहूया तर परत पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला 75 ग्रॅम कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा लाल होईपर्यंत भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 60 ग्रॅम लसूण व 25 ग्रॅम अद्रक टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला परत चार ते पाच मिनिट ते सर्व त्या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे भाजून झाल्यानंतर आपल्याला हे एका सेपरेट वाटीत काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता परत त्याच गरम तेलाच्या कढईमध्ये आपल्याला मुठभर ताजी कोथंबीर भाजून घ्यायची आहे भाजल्यानंतर ती कोथिंबीर आपल्याला भाजलेल्या कांद्यामध्ये ठेवायची आहे.त्यानंतर आपल्याला एका गरम तव्यावरती 60 ग्रॅम इतका किसलेला खोबरा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आता कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याकडे आता तयार झालेल्या आहेत आत्ता आपण सर्व मसाल्यांना एकत्रित एका क्रमानुसार वाटून घेऊया.

तर सर्वप्रथम आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीनही प्रकारच्या मिरच्यांना घ्यायचा आहेत आणि मिरच्यांची आपल्याला एक बारीक पावडर वाटून घ्यायची आहे आणि बारीक पावडर केल्यानंतर पावडर झालेली सर्व मिरची आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहे

यानंतर आपल्याला याचप्रमाणे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम केलेले खडे मसाले व तेलात तळलेले खडे मसाले एकत्र टाकून त्यामध्ये 60 ग्रॅम मीठ १२ ग्रॅम जिंजर पावडर २ ग्रॅम जायफळ घालून आपल्याला ते सर्व खडे मसाले आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून एक बारीक पावडर बनवायची आहे त्यानंतर मसाल्यांची पावडर झाल्यानंतर आपल्याला तीच पावडर परातीमध्ये असलेल्या मिरचीमध्ये टाकायची आहे.

यानंतर आपल्याला शेवटी उरलेल्या गोष्टी म्हणजेच तळलेला कांदा खोबरा कोथंबीर या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाकून एक आपल्याला त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यामध्ये आपण पाणी नाही टाकणार पेस्ट तयार झाल्यानंतर आपण ती पेस्ट सेम परातीमध्ये टाकणार

आता या सर्वांना आपण परातीमध्ये हाताने एकत्र करून घेणार एकत्र करताना ते मसाले जरा जरा हातावर चोळून घ्यावेत सर्व मसाला एकत्र केल्यानंतर आपण पुन्हा एकदा तो सर्व मसाला मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊ शकतो आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण एक चाळणीच्या मदतीने तो मसाला बारीक चाळून घेऊ शकतो आणि सर्व मसाला चाळून झाल्यानंतर आता आपला झालेला आहे घरगुती कोल्हापुरी कांदा लसूण मसाला

Leave a Comment