महाराष्ट्रामध्ये कोतवाल या पदाला एकूण 7500 मानधन पगार देण्यात येत होत परंतु नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळ बैठकीमध्ये राज्यातील एकूण 12 हजार 793 कोतवालांचा पगार हा वाढवण्यात येऊन तो पगार आता प्रति महिना 15 हजार रुपये इतका करण्यात आलेला आहे.
ज्यामुळे महाराष्ट्र राज्यांमध्ये जेवढे पण गाव पातळीवरती काम करणारे कोतवाल आहेत त्यांच्यासाठी कुठे ना कुठेतरी सरकारद्वारे एक चांगली बातमी आहे
कोतवाल पगार वाढ 2023
मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोतवाल साठी एक एप्रिल 2023 आधी प्रति महिना 7 हजार 500 रुपये इतका पगार मानधन स्वरूपात कोतवाल या पदासाठी होता परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी कोतवाल या पदाच्या पगार वाढी संबंधित मंत्रिमंडळात चर्चा करून त्यांचा पगार 01 एप्रिल 2023 पासून प्रति महिना 15000 रुपये इतका पगार वाढवण्यात आलेला आहे.
कोतवाल म्हणजे काय
- कोतवाल हा एक महसूल विभाग अंतर्गत नेमलेला एक सहाय्यक असतो जो गाव पातळीवरती काम करतो व त्या कोतवाला वरती पूर्णपणे लक्ष हे तलाठ्याचे असते
- तसेच कायदा व सुव्यवस्थेचा विचार करा कोतवाला वरती जवळून गावामध्ये लक्ष ठेवण्याचे काम हे पोलीस पाटील करतो
कोतवाल पद व वेतन | kotwal salary
कोतवाल पद | वेतन | सुरवातीचे वेतन |
कोतवाल पगार | Rs.१२,७९३ | ७,५०० |
कोतवाल होण्यासाठी पात्रता
- मित्रांनो कोतवाल या पदाची नेमणूक ही संपूर्णपणे तहसीलदार करतात
- कोतवाल होण्यासाठी बारावी पास शिक्षण असणे गरजेचे आहे
- कोतवाल हा शारीरिक दृष्ट्या सक्षम व हुशार असावा
- व तसेच कोतवाल हा त्या गावचा किंवा तालुक्याचा रहिवासी हवा
- कोतवाल होण्यासाठी वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्षे इतकी आहे
कोतवालाचे काम काय असते
- मित्रांनो कोतवालाचे काम हे सर्वप्रथम गावातील परिसर किंवा कार्यालय स्वच्छ ठेवणे
- गावामध्ये महत्त्वाच्या उपक्रमाबाबत किंवा आवश्यक माहिती दवंडी प्रमाणे किंवा घरोघरी जाऊन देने
- तसेच गावामध्ये होणाऱ्या जन्माची किंवा मृत्यूची किंवा विवाहाची वेळोवेळी माहिती ग्रामसेवक अधिकाऱ्याकडे देणे
- तसेच तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्या कामामध्ये मदत करणे
- त्याचप्रमाणे गावांमधील शासकीय दप्तरांची महसूल कार्यालयांमध्ये ने आण करणे
- अशी वरील गाव पातळीवरती केली जाणारी कामे ही कोतवाल याची असतात
कोतवाल कसे नेमले जातात
मित्रांनो कोतवाल हा गावाच्या लोकसंख्येचा विचार करून नेमला जातो म्हणजेच की जर एखाद्या गावाची लोकसंख्या ही 1 हजार असेल तर त्या हजार लोकसंख्ये मागे एक कोतवाल हा नेमला जातो