कृषी सहाय्यक पगार | संपूर्ण माहिती

मित्रांनो कृषी विभागातील कृषी सहाय्यक या पदाला मूळ वेतन हे 25 हजार 500 इतके दिले जाते. परंतु वरील वेतनामध्ये कर्मचाऱ्याला महागाई भत्ता घर भाडे भत्ता व वाहतूक भत्ता देखील दिला जातो तो जाणून घेण्यासाठी खालील लेख संपूर्ण व्यवस्थित वाचा

krushi sahayak salary

कृषी सहाय्यक पगार

पद वेतन रचनावेतन
कृषी सहाय्यक मूळ वेतन25,000
महागाई भत्ता वेतन10,710
घरभाडे भत्ता वेतन4,590
वाहतूक भत्ता वेतन2,556
एकूण 43,356

कृषी सहाय्यक ची कामे

मित्रांनो खालील प्रकारची कामे ही कृषी सहाय्यकाला करावी लागतात

  • जसे की मित्रांनो राज्य शासनाकडून कृषी सहाय्यक हा दोन-तीन गावासाठी मिळून नेमण्यात येतो व त्या कृषी सहाय्यकाची कामे ही त्या दोन गावातील कृषी विभागाचा विकास करणे इतके असते
  • कृषी सहाय्यक या पदाचे काम हे जेव्हा कृषी विभाग तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळे शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवते तर तेव्हा कृषी सहाय्यकाला त्याच्या विभागातील गावांमध्ये त्या उपक्रमाबाबत माहिती द्यावी लागते
  • यानंतर शेतीसाठी कोणती बियाणे उपयुक्त आहेत व कोणती नाही या बियाण्यांची वेळोवेळी शेतकऱ्यांना माहिती देणे सल्ला देणे अशा प्रकारची कामे देखील कृषी सहाय्यकाला गावपातळीवरती करावी लागतात
  • तसेच मित्रांनो एका कृषी सहाय्यकाला त्याच्या गावातील शेतकऱ्यांनी घेतल्या जाणाऱ्या पिकातून उत्पादन जास्त प्रमाणात कसे निघेल यावर मार्ग काढून शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ले देणे अशी देखील कामे एका कृषी सहाय्यकाला करावी लागतात
  • तसेच मित्रांनो कमी खर्चात व कमी पाण्यात कोणती पिके घेतली पाहिजे या संबंधित वेळोवेळी शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन देखील कृषी सहाय्यकाला करावी लागते
  • याचबरोबर एका कृषी सहाय्यकाला त्याच्या विभागातील गावांचाकृषी आराखडा देखील तयार करावा लागतो व तो आराखडा ग्रामसभेत सगळ्यांना वाचून दाखवावा लागतो
  • अशाप्रकारे कृषी संबंधित कामे ही एक कृषी सहाय्यक गावपातळीवर करत असतो 

कृषी सहाय्यक पद पात्रता

मित्रांनो जर तुम्हाला कृषी सहाय्यक बनायचे असेल किंवा कृषी सहाय्यक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालील बाबींमध्ये पात्र असणे गरजेचे आहे तरच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता

  • सर्वप्रथम मित्रांनो कृषी सहाय्यक बनण्यासाठी तुमच्याकडे शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठातील कृषी संबंधित कृषी पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे
  • तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 19 व जास्तीत जास्त 38 वर्ष इतके असायला हवे

कृषी सहाय्यक परीक्षा अभ्यासक्रम

मित्रांनो कृषी सहाय्यक या पदासाठी परीक्षा ही संपूर्णपणे संगणक द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते व या परीक्षेचा अभ्यासक्रम हा खालीलप्रमाणे असतो

अ. क्र.विषयप्रश्न संख्यागुण
01English Language2020
02मराठी भाषा2020
03सामान्य ज्ञान2020
04बौद्धिक चाचणी2020
05Agriculture120120
एकूण200200
FAQ
कृषी सहाय्यक प्रमोशन किती असतात

मित्रांनो कृषी सहाय्यक या पदाची प्रमोशन तीन प्रकारचे असतात सर्वप्रथम कृषी सहाय्यक त्यानंतर कृषी पर्यवेक्षक यानंतर मंडळ कृषी अधिकारी आणि शेवटचे तालुका कृषी अधिकारी अशी तीन प्रकारची प्रमोशन ही कृषी सहाय्यक पदाची असतात

कृषी सहाय्यक म्हणजे काय

मित्रांनो कृषी सहाय्यक म्हणजे राज्य सरकारने तालुक्याच्या ठिकाणी दोन तीन गावांसाठी मिळून नेमलेला एक गाव पातळीवर काम करणारा कृषी अधिकारी म्हणजेच कृषी सहाय्यक होय

कृषी सहाय्यक वर कंट्रोल कोणाचे असते

मित्रांनो कृषी सहाय्यक या पदावरती पूर्णपणे कंट्रोल हे कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी या पदाचे असते

कृषी सहाय्यक च्या हाताखाली कोण काम करते

मित्रांनो कृषी सहाय्यक या पदाच्या हाताखाली कृषी सेवक हा काम करत असतो व कृषी सहाय्यक वर कृषी पर्यवेक्षकाचे कंट्रोल असते

Leave a Comment