मित्रांनो महाराष्ट्र कृषी विभागाच्या कृषी सेवक या पदासाठी यापूर्वी 6000 रुपये प्रति महिना इतका पगार दिला जात होता,परंतु नुकत्याच आलेल्या शासन निर्णयामध्ये कृषी विभागाच्या कृषी सेवक या पदाची पगार वाढ करण्यात आलेली आहे जी आपण खालील माहिती वाचून जाणून घेऊ शकता
कृषी सेवक पगार
मित्रांनो जसे की कृषी सेवक या पदासाठी पूर्वी सहा हजार रुपये प्रति महिना इतके वेतन शासनाकडून दिले जात होते परंतु नुकत्याच शासन निर्णयांमध्ये कृषी सेवक या पदासाठी दहा हजार रुपये पगार वाढ ही करण्यात आलेली आहे
ज्यामुळे अत्याच्या घडीला कृषी सेवक या पदाचा सुरुवातीचा चालू वेतन पगार हा 16 हजार रुपये इतका झालेला आहे
या पगारांमध्ये कोणत्याही प्रकारचा भत्ता हा कृषी सेवक पदासाठी दिला जात नाही पगार हा एकत्रितपणे दिला जातो
पद | वेतन |
कृषी सेवक | 16,000 |
कृषी अधिकारी | क्लिक करून पहा |
कृषी सहाय्यक | क्लिक करून पहा |
कृषी सेवक शैक्षणिक पात्रता काय आहे
- मित्रांनो कृषी सेवक या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे शैक्षणिक पात्रतेमध्ये कृषी विभागाची तीन वर्षाची डिग्री असणे खूप गरजेचे आहे
- मित्रांनो कृषी सेवक या पदाची परीक्षा होण्यापूर्वी किंवा अर्ज करण्याच्या अगोदर तुमच्याकडे PDC हे Certificate असणे खुप गरजेचे आहे
- मित्रांनो कृषी सेवक या पदासाठी कृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी हे अर्ज करू शकत नाही
कृषी सेवकाची भरती कशी केली जाते
मित्रांनो कृषी सेवकाची भरती ही प्रत्येक जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या रिक्त जागांवर आधारित भरती ही घेण्यात येते
घेण्यात येणारी भरती ही परीक्षा द्वारे घेण्यात येते व पात्र उमेदवार निवडून त्यांना या पदासाठी पात्र ठरवले जाते व त्यांच्या कामाची नियुक्ती देखील त्याच कृषी विभागाच्या जिल्ह्यामध्ये करण्यात येते
कृषी सेवक अभ्यासक्रम
कृषी सेवक पदाची परीक्षा 200 प्रश्नांची व गुणांची असते, त्यामध्ये 120 गुणांचे प्रश्न हे कृषी घटकावर व विभागाच्या संबंधित विचारले जातात
यानंतर उरलेले जे 80 मार्क आहेत ते इंग्रजी 20 मार्क, मराठी २० मार्क, गणित बुद्धिमत्ता 20 मार्क, जनरल नॉलेज 20 मार्क असा अभ्यासक्रम हा कृषी सेवक पदासाठी असत
कृषी सेवक कामे
- मित्रांनो सरकार ने कृषी विभाग हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व शेतकऱ्यांना सरकार द्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी स्थापन केले आहे
- त्यामुळे कृषी सेवक या पदाचे काम हे शेतकऱ्यांना वेळोवेळी सरकार द्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणे तसेच शेती संबंधित उपक्रम राबवून शेती विषयी माहिती देणे
- तसेच हवामानानुसार कोणत्या पिकाची लागवड ही शेतकऱ्यांनी केली पाहिजे या संबंधित माहिती देणे
- तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा बाजारभाव या संबंधित माहिती वेळोवेळी कृषी सेवक हा कृषी विभागाकडे पोहोचवण्याचे काम करतो
कृषी सेवक भरती कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
- जन्माचा दाखला (डोमेसाईल)
- कृषी विभाग पदवी प्रमाणपत्र
- 10 वी व 12 वी पास प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिनल असल्याचा दाखला
- मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी
- लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र
- MS-CIT कोर्स प्रमाणपत्र
- वरील कागदपत्रे ही कृषी सेवक या पदासाठी लागणार आहेत
FAQ
कृषी सेवक या पदाची परीक्षा कोण घेते
मित्रांनो 2023 वर्षापासून कृषी सेवक या पदासाठी जी परीक्षा घेण्यात येणार आहे ती परीक्षा IBPS द्वारे घेण्यात येणार आहेत
कृषी सेवक परीक्षा कशी असते
मित्रांनो कृषी सेवक या पदाची परीक्षा ही संगणकाद्वारे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येते
कृषी सेवक परीक्षा किती गुणांची असते
कृषी सेवक या पदाची परीक्षा ही 200 गुणांची असते
कृषी सेवक या पदाची पगार वाढ केव्हा झाली
मित्रांनो कृषी सेवक या पदाची पगार वाढ हे नुकतीच 01 ऑगस्ट 2023 ला एका शासन निर्णयानुसार करण्यात आली