कृषी विभाग भरती 2023 मधील वरिष्ठ लिपिक पदाची पात्रता व निवड पद्धत.जसे की वरिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी उमेदवाराचे ग्रॅज्युएशन हे होने खूप गरजेचे आहे.सर्वप्रथम भारतीय नागरीकत्व असणे गरजेचे आहे,यानंतर वयोमर्यादा ही 18 वर्षे आणि चाळीस वर्षाच्या आत असायला हवी,वरिष्ठ लिपिक पदासाठी टायपिंग असणे गरजेचे नाही फक्त या पदासाठी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण असणे हे गरजेचे आहे,तसेच जाणून घ्या सर्व कृषी विभाग भरती मधिल पदे व वेतन
वरिष्ठ लिपिक पदाची निवड पद्धत
वरिष्ठ लिपिक पदाच्या निवड पद्धतीमध्ये सर्व उमेदवारांची परीक्षा ही ऑनलाईन संगणक पद्धतीने घेण्यात येईल व परीक्षा ही मराठी माध्यमातून होईल तसेच सर्व उमेदवारांची परीक्षा ही उमेदवारांनी फॉर्म भरल्या गेलेल्या जिल्ह्याप्रमाणे त्या त्या जिल्ह्यात परीक्षा घेण्यात येईल.ऑनलाइन पद्धतीने परीक्षा झाल्यानंतर सर्व उमेदवारांची गुणवत्तेनुसार यादी लावून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल,गुणवत्ता यादीत नाव येण्यासाठी उमेदवारास किमान ४५% होऊन अधिक गुण असले पाहिजे.
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक भरती अभ्यासक्रम
ऑनलाइन संगणकाद्वारे होणारी वरिष्ठ लिपिक पदाची भरतीचा अभ्यासक्रम हा खालील प्रमाणे असेल वरिष्ठ लिपिक या पदासाठी अभ्यासक्रम हा मराठी, इंग्रजी,सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, या विषयांची प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 100 किंवा 200 प्रश्नांची परीक्षा घेण्यात येईल.
विषय | प्रश्न | गुण | दर्जा |
मराठी व्याकरण | २५ | ५० | बारावी |
इंग्रजी व्याकरण | २५ | ५० | बारावी |
बुद्धिमत्ता चाचणी | २५ | ५० | बारावी |
सामान्य ज्ञान | २५ | ५० | बारावी |
वरिष्ठ लिपिक भरती परीक्षा ही दोन विभागामार्फत परीक्षा होते एक म्हणजे डीव्हीईटी आणि दुसरी म्हणजे कृषी विभागा मार्फत घेतली जाते तरडीव्हीईटी मार्फत जी वरिष्ठ कृषी विभागाची भरती होत आहे त्याच्यासाठी मराठी व्याकरण आपल्याला करावे लागेल आणि मराठी व्याकरणांमध्ये खास करून आपल्याला वाक्यांचा काळ,समास,प्रयोग असे विषय तुम्हाला करावे लागतील आणि या मधलीच तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे विचारले जातील त्याचबरोबर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हनी, शब्दसमूह, तसेच पॅसेज वरती सुद्धा प्रश्न हे येणार आहेत आणि कृषी विभागाची जी भरती होणार आहे ती आयबीपीएस हे घेणार आहेत आणि ही जी आयबीपीएस मार्फत भरती होणार आहे. या भरतीसाठी तुम्हाला मराठी व्याकरणाची तयारी करण्याची आवश्यकता नाही कारण आयबीपीएस हे व्याकरणाचे प्रश्न विचारत नाही तर आयपीपीएस हे दररोजच्या वापरण्यात येणाऱ्या भाषेचे जे प्रश्न असतात म्हणजेच वाक्यांचा क्रम लावणे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखा असे सर्व व्याकरण सोडून गोष्टी या आयबीपीएस कृषी भरती मध्ये येतात तर कृषी विभागाची वरिष्ठ पदाची भरती ही आयबीपीएस हे घेणार आहेत त्यामुळे जर आपण इंग्लिश विषयाचे पाहिलं तर यामध्ये आपल्याला वाक्यांचा क्रम लावणे, वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे असे अजून दोन-तीन विषयातील प्रश्न तुम्हाला इंग्रजी मध्ये विचारले जातील त्यामुळे आयबीपीएस साठी तुम्हाला इंग्लिश ग्रामर हे करणे गरजेचे नाही आणि टीसीएस मार्फत जे वरिष्ठ लिपिक पदाची भरती होणार आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जातील. आणि आयबीपीएस मध्ये बुद्धिमत्ता आणि गणित हे दोन्ही टॉपिक मिळून प्रश्न विचारले जातात आणि पदावली या विषयावर जास्त करून प्रश्न हे विचारले जातात.
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक पदे 2023
कृषी विभाग | वरिष्ठ लिपिक पदे |
संभाजीनगर | ११ पदे |
अमरावती | ९ पदे |
लातूर | १४ पदे |
कोल्हापूर | १४ पदे |
ठाणे व कोकण | १८ पदे |
नागपूर | १४ पदे |
नाशिक | १२ पदे |
पुणे | १३ पदे |
वरिष्ठ लिपिक पद व वेतन
पद | वेतन |
वरिष्ठ लिपिक | २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० |
वरिष्ठ लिपिक भरती ऑनलाईन फॉर्म कागदपत्रे
वरिष्ठ लिपिक फॉर्म भरताना आपल्याला पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत त्यानंतर आपल्याला स्वाक्षरी ही काळ्या रंगाच्या पेनने करायची आहे.त्यानंतर पांढऱ्या कागदावरती स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घ्यायचा आहे अंगठा हा आपल्याला डाव्या हाताचाच द्यायचा आहे कारण पुढे एक्झाम सेंटरला पुन्हा तो अंगठा तिथे मॅच झाला पाहिजे त्यानंतर फॉर्म वरती दिलेले घोषणापत्र हे विद्यार्थ्यांनी त्याच्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायच आहे आणि घोषणापत्र हे आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये लिहायचं आहे नाहीतर उमेदवाराचा फॉर्म हा रद्द केला जाईल यानंतर उमेदवाराकडे फॉर्म भरण्यासाठी स्वतःचा चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असायला पाहिजे,अशा काही ठराविक गोष्टी वरिष्ठ लिपिक फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे असायला पाहिजेत.
FAQ
कृषी विभाग भरती 2023 परीक्षा वेळापत्रक
कृषी विभागामार्फत घेण्यात येणारी कृषी सहाय्यक आणि वरिष्ठ लिपिक भरती परीक्षा ही येत्या मे किंवा जून महिन्याच्या कालावधीत घेण्यात येईल.
कृषी विभाग भरती 2023 हॉल तिकीट
कृषी विभाग भरती 2023 चे हॉल तिकीट हे आपल्याला ibpsonline.ibps.in या साइट वरती पाहायला भेटतील व ते आपल्याला ऑनलाइन पद्धतीने मोबाईलवर डाउनलोड करायला प्राप्त होतील.