नोकारी : महाराष्ट्र राज्य मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत महाराष्ट्र मध्ये एकूण 670 पदांची भरती घेण्यात येणार आहे या भरतीसाठी किती जागा असणार आहे तसेच शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तसेच वयाची अट परीक्षा पद्धत कशी असेल यासंबंधी सर्व माहिती खाली दिली आहे
मृदा व जलसंधारण विभाग भरती पात्रता
- मृदा व जलसंधारण विभाग भरती पात्रता ही अशी असणार आहे की अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा
- यानंतर उमेदवाराची वयोमर्यादा ही 19 वर्षे ते 38 वय वर्षापर्यंत असावी मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत चालेल
- यानंतर दिव्यांग जर तुम्ही असाल तर वय वर्ष 45 पर्यंत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता
- शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमचा जर डिप्लोमा हा सिविल इंजीनियरिंग मध्ये झाला असेल किंवा सिविल मध्ये तुमचे ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्ही इथे अर्ज दाखल करू शकता
मृदा व जलसंधारण विभाग भरती कागदपत्रे
- अर्जदाराची ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो व सही
- मोबाईल क्रमांक
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- सिव्हिल प्रमाणपत्र
अर्ज कसा करायचा
मृदा व जलसंधारण भरतीसाठी अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तो अर्ज करण्यासाठी तुम्हाला या (cdn3.digialm.com) संकेतस्थळावरती जायचे आहे व अर्ज करायचा आहे
परीक्षा कशी घेतली जाणार
परीक्षा ही तुमची संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार ज्यामध्ये 100 प्रश्नांचा व 200 गुणांचा पेपर घेण्यात येईल ज्यासाठी वेळ हा 120 मिनिटे राहील
परीक्षेसाठी किती फी राहील
या भरतीसाठी उमेदवाराला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करायला 1000 रुपये शुल्क फी राहील.
मृदा व जलसंधारण नोकरी कुठे मिळेल
मृदा व जलसंधारण भरती अंतर्गत पात्र उमेदवाराला नोकरी ही छत्रपती संभाजी नगर किंवा पुणे जिल्ह्यात नियुक्ती ही होऊ शकत
अर्ज करण्याची दिनांक
मृदा व जलसंधारण भरती साठी तुम्ही अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करू शकता व अर्ज करण्याची मुदत ही 21/12/2023 ते 10/12/2024 पर्यंत 1 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता,