LIC कन्यादान पॉलिसी योजना 2023 | संपूर्ण माहिती मराठीत 

मित्रांनो एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना एक अशी योजना आहे की ज्या योजनेच्या मदतीने आपण आपल्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणाच्या व लग्नाच्या खर्चासाठी एक मोठी रक्कम बनवू शकतो. ते कसं तर या योजनेच्या मदतीने आपण आपल्या मुलीचे एलआयसी मध्ये अकाउंट उघडून तिथे प्रति दिवस फक्त 121 रुपये जमा करून 25 वर्षांनी 27 लाख रुपयाची रक्कम बनवु शकतो. किंवा आपण फक्त तेरा वर्ष जरी ही पॉलिसी चालवली तरी आपल्याला 10 लाख रुपयाची रक्कम 13 वर्षांनी मिळेल. तर आता या संबंधित आपण खाली अधिक माहिती पाहू की या योजनेसाठी पात्र कसे व्हायचे व अर्ज कसा करायचा या संबंधी सर्व माहिती आपण खाली पाहूया.

lic kanyadan yojana mahiti in marathi

एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना काय आहे

मित्रांनो एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना एक अशी योजना आहे ही खास करून मुलींसाठी राबवली जाते आपण पाहतो की गरीब घरातील मुलींना आर्थिक परिस्थितीचा खूप प्रमाणात सामना करावा लागतो त्यामुळे या योजनेच्या मदतीने मुलींवर व तिच्या पाल्यांवर भविष्यात येणार पैशाचं संकट कधीच येणार नाही ज्यामुळे त्यांचे शिक्षण देखील चांगले व पुढील भविष्य सुधारण्यास देखील मदत होईल.

स्कीम चे नावएलआयसी कन्यादान पॉलिसी योजना
लाभार्थी कोण होणारदेशातील सर्व मुली
ही स्कीम कोणा अंतर्गत राबवली जातेभारतीय आयुष्य विमा अंतर्गत
कन्यादान पॉलिसी योजना फायदाया योजनेमुळे मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी 27 लाख रुपयांची मदत होते
वयोमर्यादा13 वर्षांपासून पुढे व 15 वर्षा आतील
कन्यादान पोलीस योजना अर्ज वेबसाइटWww.Licindia.in

एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेसाठी पात्रता

  • या योजने मध्ये भाग घेण्यासाठी फक्त मुलीचे आई वडील अर्ज करू शकतात
  • आणि त्यासाठी मुलीचे वय हे 13 आणि 25 वर्षातील हवे याआधी जर तुम्ही अर्ज केला तर त्यानंतर पुढे 25 वर्षांनी तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील
  • कमीत कमी तुम्हाला प्रति दिवस 123 रुपये हे जमा करावे लागतील म्हणजेच प्रति महिना 3600 तुम्हाला जमा करावे लागतील.
  •  या योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिकत्व असणारे व्यक्ती घेऊ शकतात
  • या योजनेसाठी खातेदार ही मुलगी असणार आहे
  • ही एक बचत योजना आहे जी मुलीच्या शिक्षणासाठी व तिच्या लग्नाच्या खर्चासाठी मदत करते

एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेचे फायदे

  • या योजनेचा अर्ज केल्यानंतर समजा जर एक वर्षांनी खातेदाराचा म्हणजेच मुलीच नैसर्गिक रित्या काही झाल तर त्या खातेदाराच्या पाल्यास नियमित व्याजाने रक्कम ही परत दिली जाते आणि जर खातेदाराच्या पाल्यास काय झाले तर त्या मुलीला 5 ते 10 लाखाची आर्थिक मदत केली जाते.
  • या योजनेमध्ये 75 रुपये देखील स्कीम राबवण्यात येते ज्यामध्ये उमेदवाराला 25 वर्षानंतर 14 लाखाची रक्कम दिले जाते
  • तसेच जर उमेदवाराने आणि 251 रुपये भरले तर त्याला 25 वर्षांनी 51 लाख रुपयाची मदत होते

एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना कागदपत्रे

मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे ही लागणार आहेत त्यामुळे तुमच्याजवळ ही कागदपत्रे आहेत की नाही त्याची चौकशी करून घ्या.

  • मुलीचे व पाल्याचे आधार कार्ड वार्षिक उत्पन्नाचा दाखला मतदान कार्ड पाल्यांचे जन्माचा दाखला मुलीचा पत्त्याचा पुरावा लाईट बिल पासपोर्ट साईज चे फोटो मुलीचे व पाल्यांचे तसेच एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेचा भरलेला ऑफलाइन फॉर्म ज्यावर मुलीची व तिच्या पाल्याची स्वाक्षरी हवी

एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेसाठी अर्ज कसा करायचा

मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या एलआयसी कार्यालयामध्ये जायचे आहे किंवा एलआयसी एजंट च्या मदतीने या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आधी काढून घ्यायची आहे या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त झाल्यावर तुम्ही त्या एजंट द्वारे अकाउंट खोलून या योजनेचा लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी तुम्ही खाली कमेंट करू शकता व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू.

FAQ
एलआयसी मध्ये किती पैसे टाकल्यावर किती मिळतात

एलआयसी मध्ये जी कन्यादान पॉलिसी योजना राबवली जाते त्यामध्ये जर तुम्ही 121 रुपये प्रति दिवस 25 वर्षांसाठी टाकले तर 25 वर्षांनी तुम्हाला 27 लाख रुपये मिळतात.

एलआयसी मधील मुलांसाठी सर्वात भारी योजना

खालील एलआयसी योजना आपल्या मुलांसाठी चांगल्या योजना म्हणून ओळखल्या जातात त्यामधील पहिली एलआयसी जीवन तरुण,एलआयसी आधारस्तंभ,एलआयसी न्यूज चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन, एलआयसी जीवन लाभ,एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना,एलआयसी जीवन उमंग योजना,अशा योजना सर्वात भारी योजना म्हणून ओळखले जातात.

Leave a Comment