Krushi News : सिताफळ गर काढण्यासाठी बाजारात यंत्र उपलब्ध, जाणून घ्या उपयोग काय असणार..

Machines are available in the market for extracting Sita fruit

कृषी बातम्या : महाराष्ट्र मध्ये सीताफळाच्या बाजारपेठा वाढल्या आहेत तसेच सीताफळ लागवडीचे क्षेत्र देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे व फळ पिकांमधील सिताफळ हे एक महत्त्वाचे फळपीक म्हणून ओळखले जात आहे आरोग्याच्या दृष्टीने सीताफळ हे एक आरोग्यदायी फळ म्हणून ओळखले जाते त्यामुळे ग्राहकांच्या व व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी तज्ञांनी सिताफळ  गर व बीज काढण्यासाठी एक निष्कासन यंत्र बाजारामध्ये विकसित केले आहे.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी तज्ञांच्या अभ्यासाच्या माहितीनुसार बाजारामध्ये सीताफळ या फळाला खूप मागणी असते परंतु या फळाचे भाव हे आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करून सिताफळ फळ शेतीला एक योग्य प्राधान्य मिळावे व सीताफळाला एक चांगला भाव मिळावा यासाठी बाजारामध्ये आत्ता सीताफळ गर व बीज काढणे यंत्र येणार आहे

यंत्र कसे असणार आहे

  • सिताफळ घर काढणे यंत्र हे हाताळण्यास अगदी सोपे असणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मोठ्या तंत्रज्ञानाचा समावेश नाही
  • यानंतर हे यंत्र 0.5 अश्वशक्ति सिंगल फेज मोटर वर चालवल जाणार आहे, या यंत्राद्वारे सीताफळाचे सर्वप्रथम टरफल वेगळे केले जाईल त्यानंतर एका मोठ्या चमच्याद्वारे संपूर्ण सिताफळाचा गर काढून घेण्यात येईल त्यानंतर एका मिक्सरमध्ये तू घर टाकून त्यामधून त्या घरातील बिया या वेगळ्या केल्या जातील
  • यानंतर तयार झालेला सीताफळाचा गर हा पॅकिंग केला जाईल व तो बारा ही महिने विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केला जाईल
  • यंत्राची काम करण्याची क्षमता ही 70 ते 80 किलो प्रति तास या वेगाने हे यंत्र काम करते
  • यंत्राणे सिताफळाच्या गरातील पाकळ्या तुटत नाहीत 75 ते 85 टक्के यंत्राद्वारे सिताफळाचे बी काढल्यानंतर पाकळ्या तश्याच राहतात

यंत्र खरेदी करताना ही काळजी घ्या

  • जेव्हा तुम्ही बाजारामधून सीताफळ गर काढणारे यंत्र खरेदी कराल तेव्हा ते यंत्र तुम्हाला योग्य चाचणी करून घ्यायचे आहे की ते चालत कसे आहे
  •  यंत्र चालू करण्याआधी व यंत्र विकत घेण्याआधी यंत्राचे सर्व नट बोल्ट यंत्र चुकीचे वाटल्यास दुसऱ्या यंत्राची मागणी करावी
  • यंत्राची प्रक्रिया भांडी तपासून घ्यावी

असे काही हे सीताफळ गर काढण्याचे यंत्र असणार आहे, जे बाजारामध्ये लवकर उपलब्ध होणार आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही एक बारा ही महिने चालणारा व्यवसाय करू शकता माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या शेतकरी मित्राला पाठवा

Leave a Comment