अपंग लोकांसाठी महा शरद पोर्टल पेन्शन योजना 2023

मित्रांनो केंद्रातील व महाराष्ट्रातील सरकार अपंग लोकांसाठी दरवर्षी अनेक प्रकारच्या योजना या राबवत असते त्याचप्रमाणे यादेखील वर्षी राज्य सरकार अंतर्गत अपंग लोकांसाठी Maha sharad Portal या नावाचे संकेतस्थळ सुरू करण्यात आलेल आहे. त्यामध्ये सर्व अपंग नागरिकांना सरकारने पेन्शन देण्याचे ठरवले आहे त्यामुळे आपण जर अपंग व्यक्ती असाल खालील दिलेली माहिती संपूर्ण वाचा.

maha sharad portal apang yojana 2023

Maha Sharad Portal काय आहे

मित्रांनो महा शरद पोर्टल हे महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व अपंग नागरिकांसाठी केलेल एक संकेत स्थळ आहे. या संकेतस्थळा अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व अपंग नागरिकांसाठी एक मदतीच व्यासपीठ तयार करण्यात आलेल आहे. जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व अपंग नागरिकांना सरकार मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व सरकारी योजनेचा लाभ घेता येईल. यामध्ये Maha Sharad Portal चे मुख्य उद्दिष्ट असे आहे की महाराष्ट्रातील सर्व अपंग नागरिकांची नोंदणी या संकेतस्थळावरती करणे ज्यामुळे भविष्यात महाराष्ट्र सरकार अपंग नागरिकांसाठी ज्या योजना राबवेल त्या योजनांचा नागरिकांना डायरेक्ट घेता येईल.

Maha Sharad Portal Yojana अर्ज असा करा

मित्रांनो महाराष्ट्र सरकारने जे Maha Sharad Portal हे संकेत स्थळ तयार केलं आहे ते खास करून महाराष्ट्रातील दिव्यांग नागरिकांसाठी केला आहे या संकेतस्थळा अंतर्गत महाराष्ट्र सरकार ज्या पण अपंग नागरिकांसाठी योजना राबवणार आहे त्यांचा लाभ त्यांना मिळावा व त्यांना आर्थिक मदत प्राप्त व्हावी यासाठी देखील महाराष्ट्र सरकार या पोर्टल द्वारे योजना राबवणार आहे परंतु अपंग नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्या अगोदर या पोर्टलवर त्यांची नोंदणी करणे व गरजेचे आहे त्यामुळे जर तुम्ही अपंग नागरिक असाल आणि तर तुम्ही Maha Sharad Portal या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही तुमचे नोंदणी करू शकता.

  • मित्रांनो या संकेतस्थळावर तुमची नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला (mahsharad.in)  या संकेतस्थळावरती जावे लागेल
  • त्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत संकेतस्थळाचे होम पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला दिव्यांग या पर्यायाच्या लिंक वर क्लिक करावे लागेल
  • त्यानंतर एक नवीन पेज लोड होऊन तुमच्यासमोर दिव्यांग नोंदणी फॉर्म उघडेल त्या फॉर्मवर विचारलेली सर्व माहिती तुम्हाला योग्यपणे भरावी लागेल
  • सर्व माहिती योग्य भरल्यानंतर खालील दिलेल्या रजिस्टर बटनावर क्लिक करून तुमची त्या संकेतस्थळावरती नोंदणी करून घ्यायची आहे आणि अशाप्रकारे तुमची नोंदणी होईल

Maha Sharad Portal योजना फायदे

  • मित्रांनो राज्य सरकार ही योजना ज्या नागरिकांसाठी राबवत आहे ते नागरिक आहेत दिव्यांग नागरिक म्हणजेच सर्वात जास्त या योजनेचा जो फायदा होणार आहे तो अपंग नागरिकांसाठी होणार आहे
  • महाराष्ट्र सरकारने हे पोर्टल फक्त अपंग नागरिकांसाठी सुरू केलं आहे त्यामुळे या पोर्टल वरती फक्त अपंग नागरिकच नोंदणी करू शकतात
  • Maha Sharad Portal च्या माध्यमातून जे पण अपंग नागरिक या पोर्टल वरती नोंदणी करतील त्या सर्व नागरिकांसाठी भविष्यात ज्या पण सरकारी योजना राबवण्यात येतील त्या सर्व योजनेचा लाभ त्यांना घेता येईल
  • सर्वात महत्त्वाचे आपण या पोर्टल वरती बिना एक रुपया देता नोंदणी करू शकता
  • Maha Sharad Portal वरती महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती संपूर्णपणे या पोर्टलवर देण्यात येईल
  • आणि या पोर्टलचा सर्वात महत्त्वाचा फायदा महाराष्ट्र सरकारला होणार आहे जेणेकरून महाराष्ट्र सरकार ज्या पण योजना अपंग लोकांसाठी राबवते त्या लोकांची सर्व माहिती त्यांना या संकेतस्थळावरती प्राप्त होईल जेणेकरून सर्व योजनेचा लाभ सर्व अपंग लोकांना मिळेल
  • त्यामुळे आपण जर महाराष्ट्रातील नागरिक असेल आणि जर तुम्हाला महाराष्ट्रातील योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही जर अपंग व्यक्ती असेल तर तुम्ही Maha Sharad Portal या पोर्टल वरती नोंदणी करणे खूप गरजेचे आहे
FAQ

Maha Sharad Portal नोंदणी कशी करायची

मित्रांनो महा शरद पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या या (mahsharad.in) अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन नोंदणी करू शकता.

Maha Sharad Portal नोंदणी पात्रता काय आहे

मित्रांनो महा शरद पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी नागरिक असायला हवेत व तुम्ही अपंग व्यक्ती असायला हवेत.

Leave a Comment