महाराष्ट्र तरुण बेरोजगारी भत्ता योजना 2023 ऑनलाइन अर्ज

मित्रांनो महाराष्ट्रात तरुण बेरोजगार भत्ता योजना एक अशी योजना आहे की ज्या मार्फत 18 ते 35 या वयोगटातील बेरोजगार तरुणांना आर्थिक सहायता म्हणून प्रति महिना 5 हजार रुपयांचा सरकार भत्ता देणार आहे. मित्रांनो महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना नक्की काय आहे आणि या योजनेसाठी आपण अर्ज कसा करू शकतो याची पात्रता काय त्यानंतर या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे ती तुम्ही सविस्तर वाचा.

maharashtra berojgari bhatta yojana 2023 in marathi

महाराष्ट्र बेरोजगारी योजना 2023 अर्ज कसा करायचा

मित्रांनो सरकार सांगते की या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही युवकाला कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. कारण कोणताही सुशिक्षित बेरोजगार युवक या योजनेसाठी अर्ज हा त्याच्या मोबाईलद्वारे देखील करू शकतो यामुळे नक्कीच त्या तरुणाचा वेळ आणि पैसा हा वाचण्यास मदत होईल.

  • सर्वप्रथम मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला (mahasayam.Gov.in) या पोर्टल वरती जायचं आहे. तिथे जाऊन सर्वप्रथम तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन हे पूर्ण करावे लागेल.
  • रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला मोबाईल क्रमांक लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला तुमचे नाव गाव व पत्ता एवढच भरावे लागते इतर कागदपत्रे ही अपलोड करावी लागणार नाहीत आहेत ज्याची सविस्तर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पाहू शकता की ऑनलाईन अर्ज कसा करता येईल
  • अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करता येतो त्याची जर तुम्ही व्हिडिओ पाहिली तर तुम्हाला समजण्यास सोपे जाईल युट्युब वरती असंख्य व्हिडिओ आहेत

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या पात्रता

मित्रांनो या योजनेसाठी काही अटी व शर्ती आहेत ज्या द्वारे तुमची निवड केली जाईल त्या तुम्ही खाली वाचू शकता.

  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे इतर व्यवसायाचे साधन नसले पाहिजे म्हणजेच तुमचा कोणताही व्यवसाय नसला पाहिजे
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे 20 वर्षेा पुढील व 35 वर्षा आतील असले पाहिजे
  • अर्जदाराचे नाव हे अन Employment ऑफिस मध्ये रजिस्टर असायला हवे
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे शिक्षण हे कमीत कमी बारावी पास इतके असायला हवे
  • यानंतर अर्जदार युवकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखाच्या कमी पाहिजे
  • अर्ज करणारी व्यक्ती ही कोणत्याही शासकीय किंवा खाजगी ठिकाणी काम करणारी नसावे
  • मित्रांनो वरील अटी व शर्ती तुम्हाला मान्य असतील व तुम्ही जर पात्र होत असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना कागदपत्रे

मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला खालील दिलेली सर्व कागदपत्रे ही लागणार आहे त्यामुळे ती व्यवस्थित रित्या वाचून तुम्ही तुमच्याकडे आहेत की नाही याची चौकशी करा

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्याकडे स्वतःच आधार कार्ड असणे गरजेचे आहे त्याला तुमचा फोन नंबर देखील लिंक पाहिजे.
  • त्यानंतर अर्जदाराचे मतदान कार्ड त्याच्या जवळ असणे गरजेचे आहे ते देखील तुम्हाला लागणार आहे
  • पॅन कार्डची देखील आवश्यकता भासणार आहे त्यामुळे पॅन कार्ड देखील लागणार आहे
  • त्यानंतर तुम्ही पंधरा वर्षे महाराष्ट्र मध्ये राहत आहात म्हणून त्याचा तुम्हाला रहिवासी दाखला देखिल लागणार आहे
  • त्यानंतर अर्जदारा चे जन्म प्रमाणपत्र त्यामध्ये तुम्ही टीसी किंवा शाळेची बोनाफाईट देखील जोडू शकता
  • यानंतर तुम्हाला महसूल विभागाकडून दिला जाणारा उत्पन्नाचा कुटुंबाचा दाखला हा तुम्हाला लागणार आहे (जो 3 लाखाच्या आतील उत्पन्नाचा हवा )
  • यानंतर अर्जदाराच्या शिक्षणाचे निकाल सर्टिफिकेट जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असेल तर त्याची सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे
  • ये नंतर अर्जदाराचे बँकेमध्ये बचत खाते असली पाहिजे त्याच्या पासबुकची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे
  • यानंतर अर्जदाराचा चालू मोबाईल नंबर
  • तसेच पासपोर्ट साईज चे फोटो व सही आणि ईमेल आयडी
  • तर मित्रांनो वरील कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र व्हाल

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना धेय

मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार अनेक प्रकारच्या योजना सर्वसामान्य लोकांसाठी राबवत असते आणि त्यामधील एक महत्त्वाची योजना म्हणजे महाराष्ट्र तरुण  बेरोजगार योजना या योजनेचे महत्त्व असे की आपण पाहतो की महाराष्ट्रात खूप सारे तरुण युवक सुशिक्षित उच्च शिक्षण घेतलेले आहेत परंतु नोकरी नसल्या कारणामुळे त्यांच्यावर बेरोजगारीचे दिवस आले आहेत. आणि त्यामधील काही युवक तर गरीब घरातले असतात त्यामुळे त्यांना खूप सार्‍या आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. आणि गरीब परिवारातील युवक असल्यामुळे पुढील कौटुंबिक जीवनाची संपूर्ण जबाबदारी ही त्याच्या अंगावर पडत असते. ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे सरकारने या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र बेरोजगार योजना स्थापन केली आहे ज्याचा फायदा नक्कीच गरीब कुटुंबातील युवकांना होणार आहे

FAQ

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना अनुदान

मित्रांनो महाराष्ट्र सरकार अंतर्गत राबवले जाणाऱ्या या योजनेमध्ये गरीब घरातील उच्चशिक्षित तरुण युवकाला प्रति महिना 5 हजार रुपयांची मदत ही केली जाते ज्यामुळे त्या युवकाला त्याचे कौटुंबिक जीवनात हातभार लावण्यास मदत होईल तसेच त्याच्या शिक्षणासाठी किंवा इतर  व्यवसायासाठी त्याला थोडीफार मदत होईल. म्हणजेच एकंदरीत युवकाला कोणावर अवलंबून राहता येणार नाही आणि सरकार ही रक्कम थेट त्या युवकाच्या बँकेच्या खात्यात पाठवते.

 बेरोजगारी भत्ता किती वर्षासाठी मिळतो

  महाराष्ट्र बेरोजगार भत्ता हा तुम्हाला 35 वर्षे पर्यंत मिळतो

Leave a Comment