विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 ही अशा उमेदवारांसाठी राबवली जाणार आहे की ज्यांचे शिक्षण हे सातवी पास किंवा दहावी पास इतकं झालेला आहे आणि या भरतीच्या अंतर्गत एकूण 512 जागा ह्या भरण्यात येणार आहेत आणि या जागा एकूण 5 प्रकारच्या पदांसाठी भरण्यात येणार आहेत. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 30 मे पासून ते 13 जून 2023 पर्यंत आहे या भरतीसाठी अर्ज कसा करायचा व उमेदवार पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी खालील माहिती संपूर्णपणे वाचा.
राज्य उत्पादन भरती अभ्यासक्रम
विद्यार्थी मित्रांनो राज्य सरकार द्वारे राज्य उत्पादन भरती राबविण्यात येणार आहे या भरतीसाठी खालील अभ्यासक्रमाप्रमाणे ऑनलाइन स्वरूपात परीक्षा ही घेण्यात येईल आणि त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीसाठी व कौशल्य चाचणीसाठी बोलवण्यात येईल आणि त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल
- बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये विद्यार्थ्यांना बुद्धिमत्तेविषयी प्रश्न विचारले जातील ज्यामध्ये घड्याळी गणिते शेकडा कालावधी अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातील
- सामान्य ज्ञान या विषयांमध्ये महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल असेल नागरिक शास्त्र राज्यशास्त्र व भारताचा इतिहास चालू घडामोडी अशा गोष्टी ह्या सामान्य ज्ञान मध्ये विचारल्या जातील.
- मराठी विषयांमध्ये वाक्यांचा उपयोग करा वाक्यरचना जाती व्याकरण वाक्प्रचार शब्दांचे अर्थ अचूक शब्द ओळखा वाक्यांची चढ-उत्तर व्याकरण अशा पद्धतीचे प्रश्न हे मराठी अभ्यासक्रमात विचारले जातील.
- इंग्रजी विषयांमध्ये वाक्यरचना व्याकरण मुहावरे वाक्यांच्या प्रकार सामान्य शब्दसंग्रह अर्थपूर्ण वाक्य तयार करणे ग्रामर अशा प्रकारचे असंख्य प्रश्न हे इंग्रजी अभ्यासक्रमात विचारले जातील
राज्य उत्पादन शुल्क भरती उंची व वयोमर्यादा
विद्यार्थी मित्रांनो या भरतीसाठी खालील प्रमाणे उमेदवाराची शारीरिक चाचणीसाठी उंची व वयोमर्यादा असणे गरजेचे आहे यामध्ये जर तुम्ही पात्र होत असाल तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करा.
उंची | छाती | |
पुरुष | पुरुष उंची 165 सेंटीमीटर | छाती 79 सेमी पेक्षा कमी नसावी |
महिला | महिला उंची 158 सेमी | – |
वयोमर्यादा | सर्वसाधारण प्रवर्ग 18 ते 40 वय यानंतर मागासवर्ग प्रवर्ग 18 ते 45 वय |
राज्य उत्पादन शुल्क भरती पदे व संख्या
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 साठी एकूण महाराष्ट्र सरकार 512 रिक्त पदांची भरती घेणार आहे ती आपण खालील माहितीनुसार वाचू शकता व त्यासाठी अर्ज देखील करू शकता.
पदाचे नाव | पदसंख्या |
लघुलेखक निम्न श्रेणी रिक्त पदे | 5 |
लघुटंकलेखक रिक्त पदे | 16 |
जवान रिक्त पदे | 371 |
जवान नी चालक रिक्त पदे | 70 |
पिऊन रिक्त पदे | 50 |
भरती अर्जासाठी लागणारी फी
पदे | मागासवर्गीय प्रवर्ग | सर्वसाधारण प्रवर्ग |
लघुलेखक निम्न श्रेणी | 810 | 900 |
लघुटंकलेखक | 810 | 900 |
जवान | 660 | 735 |
जवान नी चालक | 800 | 720 |
पिऊन | 720 | 800 |
महाराष्ट्र राज्य उत्पादन भरती 2023 पात्रता
- लघुलेखक निम्नश्रेणी पद पात्रता : माध्यमिक शाळा दहावी पास परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी लागणार आहे, त्यानंतर या पदासाठी उमेदवाराची मराठी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट या वेगाने व तसेच इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट या वेगाने असणे गरजेचे आहे व अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे त्याचे प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे
- लघुटंकलेखक पद पात्रता : माध्यमिक शाळा दहावी पास परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी लागणार आहे,त्यानंतर या पदासाठी उमेदवाराची मराठी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट या वेगाने व तसेच इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट या वेगाने असणे गरजेचे आहे व अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे त्याचे प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे
- जवान पद पात्रता : या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे फक्त माध्यमिक शाळा दहावी परीक्षा पास उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
- जवान नि चालक पद पात्रता : या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान 7वी पास उत्तीर्ण शिक्षण पूर्ण असायला पाहिजे व त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील असायला हवा तरच तो या पदासाठी अर्ज करू शकतो
- पिऊन पद पात्रता : या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे माध्यमिक शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती अर्ज कसा करायचा
विद्यार्थी मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरतीच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे ( www.ahd.mahaharashtra.gov. in)