महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्ज योजना | gramin bank loan schemes

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून आपल्यासाठी किती प्रकारच्या कर्ज योजना राबवल्या जातात व त्या कर्जावरती आपल्याला किती व्याजदर भरावे लागते. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पात्रता काय लागते त्याच बरोबर कागदपत्रे देखील कोणती लागतात या याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत तर खालील माहिती तुम्ही पूर्ण वाचा

महाराष्ट्र ग्रामीण बँक गृह कर्ज योजना

मित्रांनो प्रत्येकाला स्वतःचे घर बांधायचे किंवा दुरुस्त करायचे असे एक स्वप्न असते परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने काहींचे स्वप्न हे स्वप्नच राहते. त्यामुळे महाराष्ट्र मध्ये ग्रामीण बँक आता आपल्याला आपलं घर बांधण्यासाठी किंवा घर दुरुस्तीसाठी सर्वात कमी व्याजदरावरती आकर्षक कर्ज देत आहे.

 कर्जाची रक्कम

मित्रांनो नवीन घर बांधण्यासाठी ग्रामीण बँक आपल्याला जास्तीत जास्त 20 लाख रुपये इतके कर्ज देऊ शकते. आणि घर दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपये इतके कर्ज आपल्याला देऊ शकते. परंतु हे कर्ज मिळवण्यासाठी आपल्याकडे किमान 25% पैसे असायला पाहिजे म्हणजेच की 20 लाखाच्या कर्जासाठी आपल्याकडे 5 लाख रुपये असणे खूप गरजेचे आहे.

कर्ज परतफेड कालावधी

मित्रांनो घराचे बांधकाम करण्यासाठी आपल्याला जे 20 लाखाचे कर्ज दिले जाईल त्याचा कालावधी हा 20 वर्षाचा आहे आणि दुरुस्तीसाठी जे 5 लाख रुपयाचे कर्ज आपल्याला मिळेल त्याचा कालावधी हा 5 वर्षे इतका आहे.

कर्जाचे व्याजदर

मित्रांनो घर बांधण्यासाठी कर्ज घ्या किंवा दुरुस्ती साठी कर्ज घ्या त्यावर तुम्हाला एकच व्याजदर आकारला जाईल तो म्हणजे 8.5% व्याजदरावरती तुम्हाला वीस वर्षासाठी 20 लाख, घर बांधण्यासाठी व घर दुरुस्तीसाठी 5 लाख,पाच वर्षासाठी असे कर्ज दिले जाईल.म्हणजेच तुम्ही वीस लाख रुपयाचे जर लोन घेतले तर तुम्हाला प्रति महिना त्यावरती 14,177 रुपये इतके व्याज भरावे लागेल म्हणजेच वर्षाचे व्याज हे एक लाख 70 होईल.

पात्रता
  • सर्वप्रथम कर्ज घेण्यासाठी एक तर आपण पगारदार व्यक्ती असायला पाहिजे जर आपण सरकारी नोकरदार असाल तर आपल्यावर याआधी कोणते प्रकारचे थकीत कर्ज असले नाही पाहिजे यानंतर आपण जर प्रायव्हेट जॉब करत असेल तर आपले मागील चार-पाच वर्षाचे व्यवहार पाहून आपल्याला कर्ज दिले जाईल.
  • त्यानंतर जर आपण एक व्यवसायिक असाल तर आपला व्यवसाय व त्या व्यवसायावरती निर्माण होणारे उत्पन्न हे पाहून आपल्याला कर्ज देण्यात येईल.
  • कर्ज घेण्यासाठी वयोमर्यादा ही वय 21 पासून पुढे व 55 वर्षाच्या आत असायला पाहिजे.
  • यानंतर जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या शेतीतून दरवर्षी निघणारे उत्पन्न व मागील काही कर्ज असतील ते पाहून तुम्हाला कर्ज हे देण्यात येईल.
कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
  • अर्ज RF-45 हे आपल्याला लागणार आहे
  • पावत्या F-260 ह्या लागणार आहेत
  • मुदत कर्ज करार 245 B हे लागणार आहे
  • हमी RF-154 A हे एक लागेल
  • प्लॉट / घर गहाण
  • असे अनेक अजून कागदपत्र तुम्हाला ही लागणार आहेत त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामीण बँकेमध्ये जाऊन अधिक चौकशी करू शकत.

महाराष्ट्र ग्रामीण बँक वाहन कर्ज योजना

मित्रांनो एक गाडी घेण्याचे स्वप्न तर प्रत्येक व्यक्तीचं असतं तो लहान कुटुंबातील असो किंवा मोठ्या कुटुंबातील असो आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामीण बँक आपल्याला वाहन कर्ज देते. आणि हे कर्ज आपण नवीन गाडी खरेदी करण्यासाठी घेऊ शकतो किंवा आपल्याला जर जुनी गाडी खरेदी करायची असेल त्यासाठी देखील आपण घेऊ शकतो (परंतु जुनी गाडी ही दोन वर्षाच्या आतील असायला पाहिजे)

वाहन कर्जाची रक्कम

वाहन खरेदीसाठी कर्ज हे दोन प्रकारांमध्ये दिले जाते प्रथम म्हणजे नवीन वाहन खरेदी करण्यासाठी ग्रामीण बँकेकडून कर्ज हे वाहनाच्या रोख रकमेच्या 90% इतके दिले जाते. म्हणजे जर तुमची गाडी 1 लाखाची असेल तर 90 हजाराचे कर्ज हे तुम्हाला मिळू शकते. आणि यानंतर जर तुम्हाला जुनी गाडी घ्यायची असेल तर त्या गाडीसाठी गाडीच्या मुद्दल किमती वरती 70% इतके कर्ज दिले जाते म्हणजेच तुमची जूनी गाडी जर 1 लाखाची असेल तर त्यावर तुम्हाला 70 हजारापर्यंत कर्ज हे मिळू शकते.

वाहन कर्ज परतफेड कालावधी

मित्रांनो हे कर्ज परतफेड करण्यासाठी आपल्याला कालावधी हा जर आपण नवीन दुचाकी गाडीसाठी कर्ज घेतल असेल तर त्यासाठी 60 महिन्यांचा कालावधी हा मिळतो. आणि यामध्ये जर आपण नवीन चार चाकी गाडीसाठी कर्ज घेतलं असेल तर तो कालावधी 84 महिने इतका देखील होतो.

वाहन कर्जाचे व्याजदर

वाहन नवीन खरेदी करायचे असेल किंवा जुने खरेदी करायचे असेल तर या दोन्हीसाठी तुमच्याकडून एकच व्याजदर आकारला जाईल तो म्हणजे 9%म्हणजेच जर तुमची एक लाखाची दुचाकी गाडी असेल आणि त्यावर तुम्हाला 90% कर्ज मिळाले असेल तर 60 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रति महिना 1868 इतके लागतील.

वाहन कर्ज पात्रता

हेकर्जएनआरआय, तसेच फर्म आणि  इतर कंपन्यांच्या लोकांसाठी देखील उपलब्ध आहे. या कर्जासाठी पात्र होण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे उत्पन्न असणे हे गरजेचे आहे आणि हे कर्ज देण्यासाठी तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचे हमीपत्र हे लागणार आहे.आणि तसेच हे कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला कोणत्याही जमीनदाराची आवश्यकता भासणार नाही.

सोने तारण ठेवून कर्ज

मित्रांनो महाराष्ट्रा मध्ये ग्रामीण बँकेमध्ये दिली जाणारी सोने तारण कर्ज योजना ही एक अशी योजना आहे की ज्यामध्ये व्यक्ती सोन ठेवून खालील गोष्टीसाठी कर्ज घेऊ शकतो. ( कृषी पीक उत्पादनासाठी किंवा पिकाच्या देखभालीसाठी तसेच इतर कृषी खत, औषधासाठी, यानंतर व्यवसायासाठी, सामाजिक आणि कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी तसेच टिकाऊ वस्तू खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर वैद्यकीय गरजेसाठी अश्या अनेक गोष्टीनसाठी सर्वात कमी व्याजदरावर सोने ठेऊन कर्ज घेऊ शकतो.

सोने तारण कर्ज रक्कम

सोनेतारण ठेवीवर कर्ज रक्कम ही सोन्याच्या मूल्यांकन केलेल्या मूल्याच्या जास्तीत जास्त 80% पर्यंत  कर्जाची रक्कम मिळू शकते.

सोने तारण कर्ज परतफेड कालावधी

सोने तारण ठेवून घेतलेल्या कर्जाची परतफेड ही तारण ठेवलेल्या योजनेवर अवलंबून असते. जास्तीत जास्त सरासरी 36 महिन्यांचा कालावधी हा परतफेड करण्यासाठी दिला जातो.

सोने तारण कर्ज व्याजदर

सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी व्याजदर हा 8.25% इतका महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून आकारला जातो.

महाराष्ट्र ग्रामीण बँक वैयक्तिक कर्ज योजना

मित्रांनो महाराष्ट्र बँक आपल्याला घरगुती गरजांसाठी आर्थिक मदत करत असते आणि ती मदत आपल्याला वैयक्तिक कर्ज योजनेतून होते आणि ही कर्ज योजना आपली आर्थिक परिस्थिती पाहून लगेच मंजूर करण्यात येते.

वैयक्तिक कर्ज रक्कम

वैयक्तिक कर्ज योजना ही तुमच्या मालमत्तेवरती दिली जाते तुमच्या मालमत्त्या मूल्यांकनाच्या 50% पर्यंत कर्ज मर्यादा तुमच्या मालमत्तेच्या मूल्यांका वर अवलंबून बँक 50% पर्यंत खर्चाची रक्कम देते.

वैयक्तिक कर्ज परतफेड कालावधी

वैयक्तिक कर्ज घेतल्यानंतर त्याच्या परतफेडीचा  कालावधी हा तुम्ही कर्ज घेतल्यापासून  ते 60 महिन्यांचा कालावधी हा तुम्हाला मिळतो त्यामुळे त्यामध्ये तुम्ही ईएमआय मार्फत परतफेड देखील करू शकतात.

वैयक्तिक कर्ज व्याजदर

वैयक्तिक कर्जासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 10% व्याजदर ठेवलेला आहे. यामध्ये अर्जदाराचा पगार हा किमान 6000 इतका असायला पाहिजे तरच त्याला वैयक्तिक कर्ज मिळू शकते अधिक माहितीसाठी ग्रामीण बँकेमध्ये जाऊन चौकशी करा.

महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवसाय कर्ज

मित्रांनो महाराष्ट्र बँक व्यवसायासाठी देखील कर्ज देते आणि हे कर्ज 25 लाखापर्यंत आपल्याला मिळते आणि त्याचा व्याजदर हा 11 टक्के आहे या व्याजाने आपल्याला कर्ज हे मिळते. या कर्जासाठी परत परतपेढीचा कालावधी हा जास्त असतो व हे कर्ज मिळण्यासाठी अधिक खूप सार्‍या गोष्टींची गरज भासते त्या तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामीण बँकेमध्ये जाऊन चौकशी करू शकता.

महाराष्ट्र ग्रामीण बँक शेतीसाठी कर्ज

महाराष्ट्र ग्रामीण बँक शेतकऱ्यांच्या पिकाच्या लागवडीसाठी म्हणजेच वृक्षरोपण असेल लघु सिंचन, अनेक उपकरने असतील जमीन आणि मृदा संवर्धन सुधारणा किंवा एखादा व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन कोंबडी पालन अशा अनेक व्यवसायासाठी किंवा शेतीसाठी काही खर्च शेतकऱ्याला लागत असतो त्यामुळे ही बँक त्याला परवडल अशा व्याजावर कर्ज देते. या योजनेसाठी सर्व शेतकरी पात्र होऊ शकतात.

कृषी कर्ज रक्कम

शेतकरी ज्यासाठी कर्ज उचलणार त्यासाठी त्याला 5% पासून 20% पर्यंत कर्ज हे दिले जाते म्हणजे जर तुम्हाला एक लाखाचा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्हाला 25 हजार रुपये कर्ज हे ग्रामीण बँकेकडून मिळू शकते.

कृषी कर्ज परतफेडचा कालावधी

खास करून शेतकऱ्यांसाठी ग्रामीण बँकेने कर्ज परतफेडीचा कालावधी हा पाच ते दहा वर्षांचा ठेवलेला आहे आणि या कर्जफेडीमध्ये तुम्ही मधील कालावधीमध्ये जर व्याज भरले नाही तरी सुद्धा चालू शकते परंतु तुम्हाला 5 ते 10 वर्षाच्या कालावधीत संपूर्ण व्याज हे भरावे लागेल.

कृषी कर्ज व्याजदर

शेतकरी मित्रांनो कृषी कर्ज घेतल्यानंतर त्यासाठी व्याजदर हे महाराष्ट्र ग्रामीण बँक 9% इतके लावते.

महाराष्ट्र ग्रामीण बँक शैक्षणिक कर्ज

शैक्षणिक कर्ज हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले जाते हे कर्ज विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्याला दिले जाते.

शैक्षणिक कर्ज रक्कम

ग्रामीण बँक शैक्षणिक कर्ज रक्कम ही जर विद्यार्थ्याला भारतात शिक्षण घ्यायचे असेल तर 10 लाखापर्यंत कर्ज हे उपलब्ध करून देते. परंतु जर विद्यार्थ्याला बाहेर देशात शिक्षण घ्यायच असेल तर तेव्हा तेथे त्याला 20 लाखापर्यंत अभ्यासासाठी कर्ज हे दिले जाते.

शैक्षणिक कर्ज परतफेडीचा कालावधी

विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतले असेल तर त्याचा कालावधी हा खालील प्रमाणे असेल जर तुम्ही साडेसात लाखापेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर तुम्हाला परतफेडीसाठी जास्तीत जास्त पंधरा वर्षाचा कालावधी हा दिला जातो आणि जर तुम्ही पाच लाखाच्या तर तुम्हाला दहा वर्षाचा परतफेड करण्यासाठी कालावधी दिला जातो.

शैक्षणिक कर्ज व्याजदर

महाराष्ट्र ग्रामीण बँक शैक्षणिक कर्जासाठी व्याजदर हे 11.95% ते 13.45% पर्यंत देते

Leave a Comment