महाराष्ट्र जलयुक्त शिवार योजना 2.0 | अर्ज 2023

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्या मध्ये जास्त करून शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो आणि त्याच कुठे ना कुठेतरी नुकसान हे त्यांच्या पिकाला व उत्पादनाला होत असते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना 2.0 सुरु केली आहे. ही योजना पाण्याची टंचाई महाराष्ट्र मध्ये दूर करण्यास नक्कीच मदत करेल असे देखील सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि या योजनेसाठी काय पात्रता असेल आणि अर्ज कसा भरायचा, कागदपत्रे तसेच या योजनेचे फायदे काय ही संपूर्ण माहिती तुम्ही खाली वाचू शकता.

जलयुक्त शिवार योजना 2.0 काय आहे

शेतकरी मित्रांनो जलयुक्त शिवार योजना ही एक अशी योजना आहे जी गावांमध्ये सिमेंट आणि काँक्रीटचे बंधारे बांधून पावसाच्या पाण्याचा साठा करून देण्यास मदत करते तसेच शेतामध्ये शेततळे असेल. किंवा शेतातील इतर तलावे असतील त्याच्या खोलीकरणासाठी आणि जुन्या सिंचन साधनांच्या दुरुस्तीसाठी आपल्याला सरकार खर्च देत असतो जेणेकरून ग्रामीण भागात पाण्याची टंचाई बसणार नाही व शेतकऱ्यांचे देखील नुकसान होणार नाही.

जलयुक्त शिवार योजना 2023 पात्रता

शेतकरी मित्रांनो जलयुक्त शिवार योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण काही गोष्टीत पात्र असणे गरजेचे आहे जसे की तुम्ही मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवेत त्यानंतर अर्जदार शेतकरी असायला पाहिजे आणि तो शेतकरी जल संकटांनी त्रस्त असणाऱ्या भागातील असायला पाहिजे.

जलयुक्त शिवार योजना कागदपत्रे

शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला खालील कागदपत्रे ही लागणार आहेत.

  • अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, शेती संबंधित कागदपत्रे, सातबारा, पासपोर्ट साईजचे फोटो, निवासी पत्त्याचा पुरावा, लाईट बिल आणि चालू मोबाईल नंबर जो आधार कार्ड बरोबर लिंक पाहिजे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या पंचायत समिती मध्ये जाऊन माहिती घेऊ शकतो.

जलयुक्त शिवार योजनेचे फायदे

  • या योजनेसाठी सरकार 199 कोटींचं अनुदान सर्व महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांमध्ये वाटत असते त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्याला होत असतो
  • या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की पावसाचे पडणारे पाणी याचा योग्य प्रकारे साठा करून गावावर पडणारा पाणी टंचाईचा प्रश्न सोडवणे तसेच भूजलाची पातळी वाढवणे त्यामुळे जशी जशी पातळी वाढेल त्यामुळे त्यातून लोकांना बोरवेल आणि विहीर काढून चांगल्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल त्याचा फायदा त्यांना शेतीतून होईल
  • या योजनेमार्फत इतर गावातील सिमेंट पूल आणि ते जोडण्याचे काम देखील करण्यात येईल

जलयुक्त शिवार योजना ऑनलाइन अर्ज

शेतकरी मित्रांनो जलयुक्त शिवार योजना 2023 ही यावर्षी अजून तरी महाराष्ट्र सरकारने सुरू केली नाही. परंतु जेव्हा महाराष्ट्र सरकार या वर्षीची ही योजना अमलात आनेल तेव्हा तुम्हाला (Mrsac. Maharashtra. Gov. In) या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. या योजने संबंधित अधिक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता किंवा खाली कमेंट करू शकता

FAQ

महाराष्ट्र जलयुक्त शिवार योजनेचे ध्येय काय आहे

या योजनेचे ध्येय हे खास करून शेतकऱ्यांसाठी आहे म्हणजेच कालवे आणि तलावे यांसारख्या जलस्रोतांची दुरुस्ती करून पावसाचे पाणी साठवण्यासाठी मदत करणे.

जलयुक्त शिवार योजनेत सरकार काय मदत करते

जलयुक्त शिवार योजनेत सरकार हे सिमेंटचे बंधारे बांधणे, तसेच ग्रामीण तलावे बांधणे, मोठे बंधारे बांधणे तसेच शेततळे बांधणे तसेच सिंचन दुरुस्ती अशा अनेक  प्रकारची मदत सरकार करते.

जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्याचा फायदा काय

या योजनेतून शेतकऱ्याचा फायदा असा की शेतकऱ्याचा पाणीटंचाईचा आणि दुष्काळाचा प्रश्न मिटेल.

जलयुक्त शिवार योजना अनुदान

शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी पात्र झाल्यास अनुदान हे 1 लाख पर्यंत मिळून जाते

Leave a Comment