महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना 2023 | 12 हजार रुपयांचे अनुदान मिळणार

मित्रांनो महाराष्ट्र सरकारने स्वच्छ भारत अंतर्गत महाराष्ट्रामध्ये एक शौचालय अनुदान योजना ही आणली आहे या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये काही ग्रामीण भागामध्ये अजूनही घरोघरी शौचालय नाही त्यामुळे खूप साऱ्या नागरिकांना व महिलांना उघड्यावर रात्री अपरात्री शौचालयासाठी जावे लागते त्यामुळे यावर एक उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने स्वच्छ भारत योजना अंतर्गत ही शौचालय अनुदान योजना महाराष्ट्रा मध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्र मधील सर्व व्यक्ती लाभ घेऊ शकतील व या योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र शासन शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयांचे अनुदान देणार आहे या योजने संबंधित अधिक माहितीसाठी व अर्ज कसा करायचा या संबंधित माहितीसाठी खालील लेख संपूर्ण वाचा

महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना काय आहे

मित्रांनो महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना ही एक अशी योजना आहे जी स्वच्छ भारत अंतर्गत राबवली जाते व या योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त ग्रामीण भागातील नागरिकांना घेता येतो. या योजनेमध्ये सरकार ग्रामीण भागातील नागरिकांना 12000 रुपयाचे अनुदान शौचालय बांधण्यासाठी देते.

महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना पात्रतेसाठी अटी

  • मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ग्रामीण भागातील नागरिक असायला हवेत व तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवेत
  • यानंतर या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं ग्रामीण भागामध्ये स्वतःच घर असायला हवं
  • यानंतर या योजनेमध्ये तुम्ही पात्र होण्यासाठी तुमचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे दोन ते अडीच लाखाच्या आत मध्ये असायला हवे
  • यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी याआधी तुम्ही कोणत्याही सरकारी शौचालय योजनेचा लाभ घेतला नसायला पाहिजे

महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना महत्त्वाच्या बाबी

  • सर्वप्रथम मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रा मधील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तयार केली आहे त्यामुळे जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता
  • या योजनेअंतर्गत अनुदान हे प्रतिशौचालय 12 हजार रुपये इतके महाराष्ट्र सरकार पात्र नागरिकाला देणार आहे
  • या योजनेत पात्र झालेल्या लाभार्थ्याला डायरेक्ट त्याच्या बँकेच्या खात्यात अनुदान हे देण्यात येणार आहे

महाराष्ट्र शौचालय योजना अनुदान किती मिळते

मित्रांनो महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना ही प्रतेशौचलया मागे प्रति नागरिकास 12 हजार रुपये इतके अनुदान देते व अनुदान हे दोन टप्प्यांमध्ये दिले जाते

  • सर्वप्रथम या अनुदानामध्ये पहिला हप्ता दिला जातो ज्यामध्ये लाभार्थ्याला सहा हजार रुपये शौचालय बांधण्यासाठी दिले जातात त्यानंतर शौचालय संपूर्ण बांधल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून शौचालयाची तपासणी होते व त्यानंतर लाभार्थ्याला दुसरा हप्ता दिला जातो
  • जेव्हा लाभार्थी संपूर्णपणे शौचालय बांधून घेईल तेव्हा त्याला दुसरा हप्ताह 6 हजार रुपये इतका त्याच्या बँकेच्या खात्यात दिला जातो

महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा

मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्रामधील ग्रामीण भागातील व्यक्ती असाल आणि जर तुमच्याकडे शौचालय नसेल आणि जर तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊन शौचालय बांधायचे असेल तर तुम्ही खालील प्रमाणे या योजनेसाठी अर्ज करू शकता

  • मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही ज्या गावी राहता म्हणजे ज्या गावचे रहिवासी आहात त्या गावच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये तुम्हाला जावे लागेल
  • त्यानंतर ग्रामपंचायत मधून तेथील ग्रामसेवक अधिकाऱ्याकडून तुम्हाला महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेचा ऑफलाईन अर्ज हा मिळेल
  • तो अर्ज तुम्हाला व्यवस्थितपणे भरून खालील कागदपत्रे जोडून पुन्हा ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवकाकडे जमा करायचा आहे व अर्जासोबत खालील कागदपत्रे तुम्हाला जोडावी लागतील

महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • या योजनेच्या अर्जा सोबत तुम्हाला सर्वप्रथम तुमचे ओळखपत्र जोडावे लागेल ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड,पॅन कार्ड व मतदान कार्ड हे जोडायचे आहे
  • शिधापत्रिकेची प्रत जोडावी लागेल
  • त्यानंतर तुमचे बँकेमध्ये अकाउंट असायला हवे त्या अकाउंट च्या पासबुकची एक प्रत तुम्हाला जोडावी लागेल
  • यानंतर स्वतःचे पासपोर्ट आकाराचे फोटो तुम्हाला अर्जा सोबत जोडावे लागतील
  • हे सर्व जोडूनच तुम्हाला अर्ज हा ग्रामपंचायतीमध्ये जमा करायचा आहे
FAQ

 शौचालय योजनेसाठी किती अनुदान मिळते

मित्रांनो महाराष्ट्र शौचालय योजने अंतर्गत नागरिकाला 12000 रुपये शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळते

महाराष्ट्र शौचालय योजनेसाठी अर्ज कुठे करायचा

मित्रांनो महाराष्ट्र शौचालय योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता

Leave a Comment