Mahindra Tractors : शेतकरी दिवस म्हणून mahindra कंपनीने बाजारात आणला नवीन ट्रॅक्टर! एका तासाला एक लिटर डिझेल लागणार.

Mahindra company launched a new tractor as Farmers Day

Mahindra Tractors : २३ डिसेंबर 2023 हा राष्ट्रीय किसान दिवस म्हणून ओळखला जातो त्याच्या निमित्त महिंद्रा ट्रॅक्टर्स कंपनी ने सर्व शेतकऱ्यांसाठी एक ट्रॅक्टर बाजार मध्ये आणला आहे तो ट्रॅक्टर एक लिटर डिझेलमध्ये एक तास चालू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे तर चला घेऊया या ट्रॅक्टर संबंधी व्यवस्थित माहिती

महिंद्रा कंपनीने जो बाजारामध्ये विक्रीसाठी ट्रॅक्टर आणला आहे त्या ट्रॅक्टरचे नाव आहे Mahindra 265 Dl XP Plus या ट्रॅक्टरची सर्वप्रथम महाराष्ट्र मध्ये खरेदी केली आहे जी केली आहे पुण्यात राहत असलेल्या अमित ढोले यांनी, व हा ट्रॅक्टर घेऊन त्यांचे सांगतात की शेतीसाठी एक उत्तम ट्रॅक्टर जर घ्यायचं असेल तर हा ट्रॅक्टर एक शेतीसाठी उत्तम ट्रॅक्टर ठरतो

Mahindra 265 Dl XP Plus हा बाजारात आलेला महिंद्रा कंपनीचा नवीन ट्रॅक्टर आहे व हा ट्रॅक्टर 33 एचपी चा  अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे, तसेच महिंद्रा कंपनीकडून या ट्रॅक्टरला 3 पावरफुल सिलेंडर इंजिन दिले जाते, ज्यामुळे ट्रॅक्टर गरम होत नाही त्याचे तापमान स्थिर राहते, तसेच महिंद्रा कंपनी हे ट्रॅक्टरला 11 इंच चे मोठे टायर देते ज्यामुळे ट्रॅक्टरची जमिनीपासून उंची ही खूप आहे ज्यामुळे ट्रॅक्टर कोणत्याही अडचणीच्या किंवा खोलगट भागात व्यवस्थितपणे चालतो, कोणत्याही प्रकारचे घर्षण होत नाही, यानंतर या ट्रॅक्टरला 4.50 फुटाचा रोटर चालतो तसेच 9 दातांची फंनी चालते, ज्यामुळे पेरणीसाठी हा एक उत्कृष्ट ट्रॅक्टर ठरतो

तसेच या ट्रॅक्टरला महिंद्रा कंपनी एवरेज हे खूप चांगले देते म्हणजे जर तुम्हाला शेतीची मशागत करायची असेल तर प्रति तास एक लिटर डिझेल तुम्हाला लागेल. त्यामुळे जर तुम्ही शेती व्यवसायासाठी एक चांगला ट्रॅक्टर शोधत असाल तर महिंद्रा कंपनीचा haट्रॅक्टर तुमच्यासाठी एक उत्तम ट्रॅक्टर ठरणार आहे

Leave a Comment