मित्रांनो चालू भरतीचा अभ्यासक्रम म्हणून आज आपण या लेखांमध्ये असे 100 म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत की जे खूप सारे परीक्षांमध्ये विचारले गेले होते त्यामुळे खालील लेख संपूर्ण वाचा व या लेखांमध्ये marathi mhani pdf देखील दिली आहे
मराठी म्हणी | marathi mhani and arth
खालील दिले जाणारे सर्व प्रथम टॉप 50 म्हणी आहेत जे परीक्षेला खूपदा विचारले गेले आहेत.
- म्हण – ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’
अर्थ – अडचणीच्या वेळी मूर्खाची सुद्धा खुशामत आपल्याला करावी लागते
- म्हण – ‘दाम करी काम’
अर्थ – पैशाने च सर्व कामे साध्य होतात
- म्हण – ‘बाहेरून गरीब पण मनातून कपटी’
अर्थ – (गोगलगाय पोटात पाय) दिसायला गोगलगाय काय आहे पण आतून पोटात पाय
- म्हण – अंथरूण पाहून पाय पसरणे
अर्थ – (आपली ऐपत पाहून वागावे) आपली जेवढी ऐपत आहे ते पाहून वागावे
- म्हण – ‘डोंगर पोखरून उंदीर काढणे’
अर्थ – (खूप कष्ट करून देखील काही साध्य न होणे) म्हणजे खूप मेहनत करून देखील हाती काहीच लागले नाही
- म्हण – ‘घरोघरी मातीच्या चुली’
अर्थ – (सर्वत्र सारखीच परिस्थिती) म्हणजे सगळ्यांच्या घरी तीच परिस्थिती
- म्हण – ‘गाढवाला गुळाची चव काय’
अर्थ – (ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचं महत्त्व पटून देणे) म्हणजे एखाद्याला त्या गोष्टीबद्दल काहीच माहित नाही आणि त्याला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहात
- म्हण – ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’
अर्थ – मुलगा मोठ्या पाणी कसं वागेल किंवा होईल याचा अंदाज लहानपणीच्या कृत्यावरून लावणे
- म्हण – ‘नाव मोठं लक्षण खोटं’
अर्थ – ( बाहेर भपका मोठा आहे पण कृतीच्या नावाने मात्र शून्य ) काम न करता नुसत्या मोठ्या बातम्या करणे
- म्हण – ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’
अर्थ – (जवळ असलेल्या वस्तूचा दूरवर शोध घेणे) आपल्या जवळ असलेल्या वस्तूचा शोध दूरवर घेणे
- म्हण – साखरेचे खाणार त्याला देव देणार
अर्थ – चांगले विचार ठेवणाऱ्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणे
- म्हण – अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
अर्थ – स्वतःची चूक मान्य करायचे सोडून दुसऱ्याला दोष देणे
- म्हण – ‘अगा अगा देसाया, काष्टी नाय नेसाया’
अर्थ – स्वतः स्वतःचे सरक्षण देखील करू शकत नाही
- म्हण – आपला हात जगन्नाथ
अर्थ – आपली प्रगती ही आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते (म्हणजेच आयुष्यामध्ये आपण तेव्हाच पुढे जाऊ शकते जेव्हा आपले काम सर्वश्रेष्ठ असेल)
- म्हण – ‘अभ्यासापेक्षा दप्तर जड’
अर्थ – कामापेक्षा त्या कामाचीच दगदगच जास्त
- म्हण – ‘ असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ’
अर्थ – दुर्जन माणसाची संगत केल्यास आपल्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो
- म्हण – ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’
अर्थ – एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील वेळ आली की दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते
- म्हण – ‘ अती शहाणा त्याचा बैल रिकामा’
अर्थ – जो माणूस प्रत्येक गोष्टीत अतिशहाणपणा दाखवतो त्याचं कोणत्याच गोष्टीत काम होत नाही
- म्हण – ‘अति तेथे माती’
अर्थ – कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळणे नेहमी नुकसानकारक असते
- म्हण – ‘ अती झाले असू आले ‘
अर्थ – एखादी गोष्ट अती प्रमाणात झाली की त्याचे दुःख आपल्याला होते
- म्हण – ‘ अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज ‘
अर्थ – गरजवंताला अक्कल नसते (म्हणजेच गरजेपुरते जवळ करणे)
- म्हण – ‘ अंगावरच लेण जन्मभर देण’
अर्थ – दागिन्यांसाठी कर्ज करून ठेवायच आणि ते जन्मभर फेडायच
- म्हण – ‘ अंत काळापेक्षा मध्य काळ कठीण’
अर्थ – मरणाच्या वेदनेपेक्षा, भुकेची वेदना जास्त प्रमाणात असणे
- म्हण – ‘ अंधारात केले, पण उजेडात आले’
अर्थ – कितीही गोष्ट लपून केली तरी ती गोष्ट लोकांसमोर येते
- म्हण – ‘ अति झाले गावाचे आणि पोट फुगले देवाचे
अर्थ – कृत्य एकाचे असणे आणि त्रास दुसऱ्याला मिळणे
- म्हण – ‘ अंगापेक्षा बोंगा मोठा’
अर्थ – मूळ गोष्टीपेक्षा बाकीचीच गोष्ट जास्त सांगणे
- म्हण – ‘अन्नाचा येते वास, कोरिचा घेते घास’
अर्थ – अन्न न खाने पण अन्न खाण्याचे मन असणे
- म्हण – अळी मिळी गुप चिळी
अर्थ – रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मुग गिळून बसणे
- म्हण – ‘अहो रुपम अहो अहो ध्वनी’
अर्थ – एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलट खोटी स्तुती करणे
- म्हण – अचाट खाणे मसणात जाणे
अर्थ – खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो
- म्हण – ‘अपापाचा माल गपाप’
अर्थ – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन लवकर नष्ट होते
- म्हण – अल्प बुद्धि बहु गर्दी
अर्थ – कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो
- म्हण – ‘अटकाव नाही तिथे धुडकूस’
अर्थ – जिथे प्रतिबंध नाही तिथे गोंधळ असतो
- म्हण – ‘ अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये
अर्थ – अपरिचित माणसाशी सलगी करू नये
- म्हण – ‘अंधारात चोरास बळ’
अर्थ – अनुकूल परिस्थिती मिळताच माणसाचे बळ वाढते
- म्हण – ‘अघळपघळ अन घाल घोंधल’
अर्थ – मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते
- म्हण – ‘आधी पोटोबा मग विठोबा’
अर्थ – आधी पोटाची सोय पाहाणे नंतर देव धर्म करणे
- म्हण – आईची माया आन् पोर जाईल वाया
अर्थ – फार लाड केले की मुले बिगड़तात
- म्हण – आपलेच दात आणि आपलेच ओठ
अर्थ – आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते
- म्हण – ‘आयत्या बिळावर नागोबा’
अर्थ – दुसऱ्याच्या कामावर आपला फायदा करून घेणे
- म्हण – आढीच्या दीढी सावकाराची सढ़ी
अर्थ – अडलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो
- म्हण – आधीच तारे त्यात शिरले वारे
अर्थ – आधीच भरकट्यात त्यात मध प्यायलेला
- म्हण – आसू ना वासु कुत्र्याची सासु
अर्थ – जिथे जिव्हाळा नाही तिथे दुःख नाही
- म्हण – आडातल बेडूक समुद्राची गोष्ट सांगे
अर्थ – संकुचित वृत्तीचा मनुष्य विशालतेचा विचार सांगतो
- म्हण – आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
अर्थ – अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे, पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मिळणे
- म्हण – आप सुखी तर जग सुखी
अर्थ – आपण खुश असलो की संपूर्ण जग खुश आहे असे वाटते
- म्हण – आयत्या पिठावर रांगोळी काढणे
अर्थ – दुसऱ्याच्या परिश्रमावर फायदा घेणे
- म्हण – आपले नाही धड आणि शेजाऱ्याचा कढ
अर्थ – कोणाविषयी प्रेम नसणे
- म्हण – आपले नाक कापून दुसऱ्याचा अपशकुन
अर्थ – आपल्या नुकसानामध्ये दुसऱ्याचे पण नुकसान करायचे
- म्हण – आपण शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हूंगावायचं
अर्थ – आपले दोष दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करणे ( आपण चूक करायची आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचे)
- म्हण – आले अंगावर तर घेतल शिंगावर
अर्थ – आयता मिळालेला फायदा करून घेणे
- म्हण – आपल्या कानी सात बाळ्या
अर्थ – एखाद्या वाईट गोष्टींमध्ये आपला हात नाही असे दाखवणे
- म्हण – आईजीच्या जीवावर बाईजी उदार
अर्थ – दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे
- म्हण – आपल्याच पोळीवर तूप ओढणे
अर्थ – फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे
- म्हण – आधी शिजोरी मग जेजुरी
अर्थ – आधी भोजन मग देवपुजा
- म्हण आयजीच्या जीवावर बायजी उदार
- म्हण – देखल्या देवा दंडवत
अर्थ – खोटे खोटे केलेले स्वागत (तोंडावर केले जाणारे स्वागत)
- म्हण – उडला तर कावळा बुडला तर बेडूक
अर्थ – एखाद्या गोष्टीची वेळ किंवा परीक्षा येईपर्यंत वाट पाहावी लागते
- म्हण – अन्नाचा येतो वास कोरीच घेते घास
अर्थ – अन्न न खाता अन्न खाण्याचे मन करणे
- म्हण – अर्थी दान महापुण्य
अर्थ – गरजू व गरीब लोकांना दान केल्यास पुण्य मिळते
- म्हण – अर्धी टाकून सगळीकडे धावू नये
अर्थ – पूर्ण वस्तू मिळेल या आशेवर अर्धी वस्तू टाकून जाऊ नये
- म्हण – असे साहेब किती सांमटीत हिंडे राती
अर्थ – फक्त नावाचे साहेब किती तरीच असतात पण त्यांचा उपयोग काही नाही
- म्हण – गाता गळा, शिपंता मळा
अर्थ – जबाबदारी किंवा सामर्थ्य पेलण्याची कौशल्य हे जेव्हा स्वतः माणूस पेलतो त्याशिवाय त्याला कळत नाही
- म्हण – कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे
अर्थ – वाईट प्रवृत्ती किंवा विचार असलेल्या व्यक्तीला सगळे जगच वाईट दिसते
- म्हण – तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले
अर्थ – फायद्याच्या गोष्टी पाहिल्या तर त्या मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य होत नाही
- म्हण – तोंड दाबून बुक्क्यांचा मार
अर्थ – एखाद्याला कारण नसताना शिक्षा देणे व त्या शिक्षेची त्याला तक्रार करण्यास देखील मार्ग न देणे
- म्हण – तळे राखील तो पाणी चाखिल
अर्थ – आपल्याकडे एखादे काम जर सोपवले असेल तर त्यातून थोडाफार काहीतरी लाभ आपल्याला मिळेल याची प्रवृत्ती ठेवणे
- म्हण – तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणीक करून आला
अर्थ – भांडण मिटवायचे सोडून पेटून आला
- म्हण – डोंगर पोखरून उंदीर काढणे
अर्थ – खूप कष्ट व प्रयत्न करून हत्ती छोट यश मिळणे
- म्हण – डोळ्यात केर आणि कानात फुंकर
अर्थ – रोग एक आणि उपचार दुसराच
- म्हण – टिटवी देखील समुद्र आटवते
अर्थ – सामान्य दिसणारा माणूस देखील वेळ आली की खूप काही मोठे करून दाखवू शकतो
- म्हण – टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही
अर्थ – कष्ट केल्याशिवाय देवपण किंवा यश मिळत नाही
- म्हण – झाकली मूठ सव्वा लाखाची
अर्थ – व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते
- म्हण – जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
अर्थ – एखाद्याचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही
- म्हण – ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे
अर्थ – एखाद्याला जेव्हा आपण चांगले सांगायला जातो तो तेव्हा त्याचेच खरे करतो
- म्हण – जशी देनावळ तशी धुनावळ
अर्थ – मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करावे
- म्हण – ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट जो
अर्थ – आपल्यावर जो उपकार किंवा मदत करतो त्याला आपण नेहमी मदत केली पाहिजे
- म्हण- पी हळद गोरी
अर्थ – अति उत्तवळेपणा दाखवणे
- म्हण – मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
अर्थ – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
- म्हण – अति तेथे माती
कोणतीही गोष्ट अति केल्याने त्याचा शेवट वाईट होतो
- म्हण – एकावे जनाचे करावे मनाचे
अर्थ – अनेकांकडून सल्ला घ्यावा पण करावे आपल्या मनाचेच
- म्हण – कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
अर्थ – आपल्याच सोबतचे फितुरी आपलाच घात करतात
- म्हण – न कर्त्याचा वार शनिवार
अर्थ – न करण्याचे काम कारण सांगून टाळणे
- म्हण – शितावरून भाताची परीक्षा
अर्थ – वस्तूच्या लहान भागावरून वस्तूची संपूर्ण परीक्षा घेणे
- म्हण – आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खात
अर्थ – एकाने काम करावं आणि त्याचा फायदा दुसऱ्यांनी घ्यावा
- म्हण – आईचा काळ बायकोचा मवाळ
अर्थ – स्वतःच्या आईकडे दुर्लक्ष करून बायकोची बाजू घेणे
- म्हण – अचाट खाणे मसणात जाणे
अर्थ – खाण्यापिण्याचा अतिरेक झाल्याने त्याचे परिणाम वाईट होतात
- म्हण – आपण असे लोकांना आपला शेंबूड नाकाला
अर्थ – आपलीच वाईट परिस्थिती असताना दुसऱ्यावर हसणे
- म्हण – आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट
अर्थ – स्वतःचे चांगले व दुसऱ्याचे वाईट अशी प्रवृत्ती ठेवणे
- म्हण – उठता लाथ बसता बुक्की
अर्थ – प्रत्येक कृत्यावर अद्दल घडण्यासाठी केली जाणारी शिक्षा
- म्हण – इच्छा तिथे मार्ग
अर्थ – कोणत्याही गोष्टीची जर इच्छा असेल तर तेथे मार्ग देखील असतोच
- म्हण – इकडे आड तिकडे विहीर
अर्थ – सर्व बाजूने अडचणीची परिस्थिती निर्माण होणे
- म्हण – उंदराला मांजर साक्ष
अर्थ – वाईट कृत्य करताना एकमेकांच्या बाजूने साक्ष देणे
- म्हण – उचलली जीभ लावली टाळयाला
अर्थ – कोणताही विचार न करता मधे मधे बोलणे
- म्हण – उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
अर्थ – हसू येईल इतका उतवळेपणा दाखवणे
- म्हण – उथळ पाण्याला खळखळाट फार
अर्थ – स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा जास्त बोलणे
- म्हण – एका माळेची मणी
अर्थ – सगळी माणसे एकाच स्वभावाची व विचाराची असतात
- म्हण – एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही
अर्थ – दोन माणसे एका घरात नांदू शकत नाही (तसेच दोन सवती एका घरात सुख समाधानी ने राहू शकत नाही
- म्हण – कर नाही त्याला डर कशाला
अर्थ – ज्याने काही चूक केली नाही त्याला भीती कशाची
- म्हण – ओळखीचा चोर जीवे न सोडी
अर्थ – ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा खूप धोकादायक असतो
FAQ
म्हणी meaning in English
मराठी म्हणींना इंग्रजी मध्ये proverbial ( प्रोवरबिअल ) असे म्हणतात