मुंबई महाडा योजना 2023 ऑनलाइन अर्ज सपूर्ण माहिती

मुंबईमध्ये खूप सारी लोक स्वतःचे घर शोधत असतात आणि हे शोधत असताना ते म्हाडा लॉटरी या योजनची खुप वाट पाहत असतात त्यामुळे सरकारमार्फत राबवली जाणारी म्हाडा योजना आता मुंबईकरांच्या भेटीसाठी येत आहे यामध्ये माढा योजना 2023 अंतर्गत अवघ्या 4083 घरांचे वाटप करण्यात येणार आहे. आणि याची अर्ज करण्याची तारीख 22 मे 2023 रोजी सुरू होणार आहेत व अंतिम तारीख ही 18 जुलै 2023 ही आहे. तर म्हाडा लॉटरी साठी अर्ज कसा करायचा आणि यासाठी पात्रता व कागदपत्रे कोणती लागतील या संबंधित आपण आता संपूर्ण माहिती घेऊया.

Mhada Lottery yojana 2023 Mumbai

म्हाडा लॉटरी योजना काय आहे

म्हाडा म्हणजेच (maharashtra housing and area development authority) ही योजना महाराष्ट्र सरकार मार्फत राबवली जाते. महाराष्ट्रातील नऊ क्षेत्र विभाग मंडळा मार्फत मुंबई उपनगर बरोबर इतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील नागरिकांसाठी विविध घर बांधणे प्रकल्पा अंतर्गत सर्व नागरिकांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्याचे काम या म्हाडा लॉटरी योजनेचे मार्फत राबवले जातात.

म्हाडा लॉटरी साठी कोण अर्ज करू शकतात

  • मित्रांनो म्हाडा लॉटरी साठी अर्ज करण्यासाठी पात्रता ही सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र मधिल रहिवासी असायला हवेत कोणत्याही भागातील असेल तरी चालेल,
  • तसेच तुमचा उद्योग व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमची 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे (व्यक्ति किंवा महिला )
  • तसेच तुम्ही शेतकरी असाल किंवा एखादा व्यवसाय करणारी व्यक्ती असाल आणि तुम्ही महाराष्ट्र मध्ये कोणतेही खेडेगावात किंवा भागात राहत असाल तर तेव्हा देखील या म्हाडा लॉटरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता
  • यानंतर जो अर्ज करणारा व्यक्ती आहे तर त्याचे त्या भागात कोणत्याही प्रकारचे मालकी हक्क असणारे घर गाळा किंवा जमीन नसावी म्हणजे जर तुम्ही मुंबई म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करणार असाल तर तुमच्या जवळ तिथे कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क असणारे जमीन किंवा घर नसावे
  • महाराष्ट्र मध्ये शहरांमध्ये एक घर असण्याची गरज पाहून सरकारी या योजनेचा लाभ मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न, उच्च गटासाठी मध्ये असलेल्या नागरिकांना या योजनेमार्फत लाभ दिला जातो यामध्ये नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर हे दिले जाते. आणि यासाठी म्हाडा ऑनलाईन पद्धतीने लॉटरी योजना राबवते ज्यातून नागरिकांची निवड करून त्यांना घर दिले जाते

आणि ही म्हाडा लॉटरी योजना फक्त मुंबईमध्येच राबवली जात नाही त्या उद्या महाराष्ट्रात काही ठराविक जिल्ह्यांमध्ये ही म्हाडा लॉटरी योजना राबवली जाते त्यासाठी तुम्ही देखील अर्ज करू शकता खालील ठिकाणी ही म्हाडा लॉटरी योजना राबवली जाते (म्हाडा मुंबई,पुणे,नाशिक,कोकण,औरंगाबाद,नागपूर,अमरावती अशा भागात ही योजना राबवली जाते तिथे देखील तुम्ही अर्ज करू शकता)

म्हाडा लॉटरी योजना पात्रता

मित्रांनो महाराष्ट्रा मध्ये जी म्हाडा लॉटरी योजना राबवली जाते त्याची पात्रता अल्प,मध्यम आणि उच्च नागरिकांच्या उत्पन्नानुसार ठरवली जाते. व त्या मार्फत त्यांना घराची सुविधा ही दिली जाते तर खालील माहिती वाचून आपण आपले उत्पन्न पाहून अर्ज करू शकता.

उत्पन्न गटकौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा
अत्यल्प उत्पन्न गट (EWS) 25,000 हजार पर्यंत
अल्प उत्पन्न गट (LIG)25,000 ते 50,000 हजार पर्यंत
मध्यम उत्पन्न गट (MIG)50,000 ते 75,000 हजार पर्यंत
उच्च उत्पन्न गट (HIG)75,000 हजार पेक्षा जास्त
वरील उत्पन्न हे पती व पत्नी यांचे दोघांचे मिळून धरले जाईल त्यामुळे तुम्ही कोणत्या गटात बसत आहात हे तुम्ही वरील तक्ता पाहून पाहू शकतात आणि त्यानंतर म्हाडा लॉटरी योजनेसाठी अर्ज करू शकता.

म्हाडा लॉटरी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा

म्हाडा लॉटरी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही या(Lottery.Mhada.gov.in) संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करू शकता

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत प्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती जायचं आहे ते तुम्ही मोबाईल वरून गुगल क्रोम च्या मदतीने जाऊ शकता
  • तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचे नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे तर तुम्ही याआधी जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तिथे लॉगिन करायचं आहे
  • यानंतर तुम्हाला तुम्ही पात्र असलेल्या योजनेचा स्कीम कोड लक्षात घेऊन तिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे
  • अर्ज केल्यानंतर शेवटी तुम्हाला अर्जाची जी फी असेल ती तुम्हाला तिथे ऑनलाईन पद्धतीने पेड करावी लागेल. आणि जर समजा लॉटरी मध्ये तुमचे नाव लागले नाही तर तुम्ही पेड केलेले रक्कम परत तुमच्या अकाउंटला जमा होते ( अर्ज कसा केला जातो या संबंधित तुम्ही youtube वरती प्रात्यक्षिकपणे व्हिडिओ पाहून तसा अर्ज तुम्ही अचूक पद्धतीने भरू शकता)

म्हाडा लॉटरी योजना निवड पद्धत

म्हाडा लॉटरी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सरकार त्यातील अपात्र अर्ज भेटाळतात आणि त्यानंतर जे पात्र अर्ज आहेत ते लॉटरी पद्धतीने काढले जातात. लॉटरी पद्धतीने काढताना सर्वप्रथम जातीप्रमाणे आरक्षण देऊन लॉटरी काढली जाते. आणि त्यानंतर जे पात्र नागरिक आहेत त्यांची यादी आपल्याला म्हाडाच्या संकेतस्थळावर मिळते. तसेच एसएमएसच्या माध्यमातून मोबाईल द्वारे देखील आपल्याला कळवण्यात येते.

म्हाडा लॉटरी योजना कागदपत्रे

मित्रांनो म्हाडा लॉटरी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी व या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे खालील ठराविक कागदपत्रे असणे गरजेचे आहेत

  • आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदान कार्ड, बँक पासबुक, बँक कॅन्सल चेक, महाराष्ट्रा मधिल कायम निवासाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज चे फोटो जन्माचा दाखला,मोबाईल नंबर,ईमेल आयडी,वार्षिक उत्पन्नाचा दाखला अशा काही गोष्टी ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे यानंतरच्या पडताळणीसाठी तुम्हाला अधिक कागदपत्रे लागतील त्या संबंधित माहितीसाठी तुम्ही संकेतस्थळावरती जाऊन अधिक माहिती गोळा करू शकता

Leave a Comment