मिरची लागवड माहिती | mirchi lagwad

शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यातील भाजीपाला पिकांमधील सर्वात उत्कृष्ट व जास्त प्रमाणात केले जाणारे पीक म्हणजे मिरची लागवड  मिरची हा बाराही महिने आपल्या आहारातील एक प्रमुख घटक आहे त्यामुळे मिरचीचे उत्पादन करणे हे शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे जर आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणीसाठा असेल तर उन्हाळ्यामधील भाजीपाला पिकांमधील मिरची हे एक उत्तम पीक आहे म्हणूनच शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे उन्हाळ्यामधील मिरची लागवड.

मिरची लागवड खर्च | mirchi lagwad kharch

mirchi lagwad

 

शेतकरी मित्रांनो मिरची लागवडीसाठी येणारा खर्च आता आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण जमिनीची मशागत करून घेणार आहे म्हणजेच की जमिनीची नांगरणी करायची त्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये मोघड़ा मारायचा त्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये रोटर मारावा लागतो त्यानंतर आपल्याला बेड भरून घ्यावे लागतात बेड भरून झाल्यानंतर आपल्याला त्यावर बेसल डोस हा टाकावा लागतो तसेच त्यावर त्यानंतर लॅटरल अथरावे लागते परत लॅटरल चेक करावे लागते ते झाल्यानंतर मल्चिंग अथरावी लागते हे मल्चिंग अथरल्यानंतर आपला छिद्र पाडावी लागतात चित्रांमध्ये पुन्हा माती भरावी लागते व त्यानंतर मित्रांनो ड्रीप मधून पुन्हा प्रत्येक बेडला आपल्याला पाणी सोडावे लागते आणि त्यानंतर आपल्याला मिरची लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मिरची लागवड केली जाते तर या सर्व लागवडीसाठी आपल्याला एकूण खर्च किती येतो तर सुरुवातीला मित्रांनो शेतीची मशागत करण्यासाठी जो ट्रॅक्टरचा खर्च येतो तो आपल्याला 5000 च्या दरम्यान येतो त्यानंतर मिरच्यांचे जे रोप असतं त्याचा खर्च 8000 च्या आसपास आपल्याला येतो त्यानंतर मल्चिंग च्या बंडल साठी आपल्याला 11000 च्या आसपास खर्च येतो यानंतर मित्रांनो मजुरी व बाकी खर्च पाहिला तर एकंतरीत दीड एकर साठी आपल्याला 30000 च्या आसपास आपल्याला खर्च येतो.

उन्हाळी मिरची लागवड माहिती

mirchi lagwad

उन्हाळ्यामधील मिरची लागवड फेब्रुवारी व मार्च या महिन्याच्या कालावधीमध्ये मिरची लागवड ही खूपच जास्त प्रमाणात ही केली जाते यावेळेस आपल्याला लागवडीपासून काढणीपर्यंत कोणत्या प्रमुख गोष्टींची काळजी घ्यायची आहे कोणत्या गोष्टी कशा प्रकारे करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला एकंतरीत मिरची लागवडीची सर्व माहिती तुम्हाला आत्ता कळणार आहे

सुरुवातीला आपण पाहूया की मिरची लागवड करण्यासाठी कोणत हवामान हे योग्य हवामान आहे तसं पाहिलं तर तिन्ही हंगामामध्ये म्हणजेच खरीफ,रब्बी,उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये मिरची लागवड केली जाते परंतु कृषी अभ्यासकांच्या माहितीनुसार तुमच्याकडे उष्ण आणि दमट हवामान जर असेल तर तेव्हा तिथे मिरचीची वाढ ही चांगली होते आणि त्याचबरोबर उत्पादन देखील चांगलं भेटत आणि जर जमिनीबद्दल पाहिलं तर जवळजवळ सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही मिरची लागवड ही करू शकता परंतु जर तुमच्याकडे चांगली उपजव जमीन,भारी स्वरूपाची जमीन असेल  पाणी धरून ठेवणारी जमीन असेल तसेच मित्रांनो तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 0.५  ते १ मर्यादित असेल तर तेव्हा तुम्हाला पुर्णपणे चांगले प्रकारचे उत्पादन हे होऊ शकतेमिरची पीक घेण्याआधी आपल्याला जमिनीची पूर्व मशागतिचं जर पाहिलं तर याआधी आपल्या शेतामध्ये जेपण पीक आपण घेतलं होतं त्याचे सर्व अवशेष आपल्याला पहिल्यांदा आपल्या शेतामधून बाहेर काढून टाकायचे आहेत एकदा ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यानंतर आपल्याला खोल नांगरट करून ते पूर्व पिकाचे सर्व अवशेष जमिनीतून काढून टाकायचे आहेत त्यानंतर आठ ते दहा दिवस तुमच रान चांगलं उन्हामध्ये तापू द्या त्यानंतर आपल्याला त्या रानामध्ये तीन ते चार ट्रॉली गांडूळ खत किंवा चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचे आहे त्यानंतर पुन्हा जमिनीची मशागत करून घ्यायची आहे म्हणजेच आपलं जे शेत आहे ते आपल्याला बेड तयार करण्यासाठी आणि मिरची लागवडीसाठी तयार करायचा आहे.आता लागवडीचा जर हंगाम पाहिला तर फेब्रुवारी व मार्च या महिन्यात तुम्ही चांगल्या प्रकारची मिरची लागवड करू शकता आणि उन्हाळी हंगामातील उत्पादन तुम्ही नक्कीच चांगलं घेऊ शकता.

मिरची लागवड मिरचीच्या जाती

शेतकरी मित्रांनो यानंतर मित्रांनो मिरचीच्या जर आपण काही सुधारित जाती जर पाहिल्या तर शाईन सीड ची 610 f1 हायब्रीड हा एक बाण चांगला आहे त्यानंतर महयोकोच तेजा फोर हे एक बाण चांगला आहे तसेच शाईन सीड्स एफ वन साईन 820 हा देखील एक बाण चांगला आहे या तीन मधील एक बाण तुम्हाला उन्हाळी हंगामामध्ये मिरची लागवडीसाठी लागणार आहे.

मिरची लागवड कशी केली जाते

एक एकर मिरची लागवडीसाठी आपल्याला किती बियाण लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो एक एकर लागवडीसाठी आपल्याला ६० ते ७० ग्रॅम चांगलं बी असणे आवश्यक आहे.तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूया की मिरची लागवड कश्या प्रकारे केली जाते तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचे आहे की जमीन समतोल करून त्या ठिकाणी एक ते दीड फूट उंच गादीवाफे तयार करायचे आहे त्यानंतर दोन गादीवाफ्यातील अंतर आपल्याला चार ते साडेचार फुट इतकं ठेवायचा आहे त्यानंतर दोन मिरचीच्या रोपातील अंतर आपल्याला एक ते दीड फुटाच ठेवायचा आहे शेतकरी मित्रांनो गादी वाफ्यातील लांबी तुम्हाला मल्चिंग आणि जमिनीच्या उतारानुसार ठरवायचे आहे गादीवाफे तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा बेसल  डोस त्यामध्ये मिसळायचे आहे आणि त्यानंतर ड्रीप अंथरून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांना आपल्याला मल्चिंग आथरायचं आहे मल्चिंग ला होल पाडून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला गरगरीत बेड भिजवून त्यानंतर एक ते दोन दिवसांनी आपल्याला त्या ठिकाणी मिरचीच्या रोपांची लागवड ही करायची आहे आणि लागवड करताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की जमिनीमध्ये जास्तही ओलावा नसावा व जमिनीमध्ये जास्त सुकावा नसावा लागवड करायच्या आधी आपल्याला रोप प्रक्रिया करायची आहे त्यामध्ये आपल्याला दहा लिटर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला इमिडाक्लोप्रिड हे दहा मिली इतकं टाकायचं आहे आणि कार्बण्डाझिम दहा ग्रॅम इतका टाकायचा आहे आणि ते पाण्यामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मिरचीच्या रोपांची मुळे त्यामध्ये फक्त बुडवून काढायचे आहेत आणि पाच ते दहा मिनिटं सावलीमध्ये सुकवायचे आहेत आणि त्यानंतरच मग त्या रोपांचे आपल्याला पुनर लागवड करायचे आहे असं का आपण करणार की सुरुवातीच्या टाईमला रोपांमध्ये जी मर येणार आहे तसेच ज्या किडीचा प्रादुर्भाव होणार आहे तो त्या ठिकाणी कमी होणार आहे रोपांचे सेटिंग हे लवकर आणि चांगल्या प्रकारे होणार आहेयाच्यानंतर रोपे बेड वरती लावल्यानंतर दर पंधरा दिवसांनी तुम्हाला 19 19 19 हे विद्रव्य महाधन खत दोन ते तीन किलो इतके चार ते पाच दिवसाच्या अंतराने बेडला देणे चालू करायचे आहे यानंतर तिसऱ्या आठवड्यापासून तुम्ही काय करू शकता 13 40 13 आणि 19 19 19 ही दोन्ही खते तुम्ही चालू करू शकता आणि त्यानंतर चौथ्या ते पाचव्या आठवड्यापासून तुम्ही 12 61 0 तसेच झिरो 52 34 या दोन वेगवेगळ्या खताच्या ज्या ग्रेड आहेत त्या तुम्ही सोडायला सुरू करू शकता शेतकरी मित्रांनो पिकाच्या वाढीनुसार अवस्थेनुसार तुम्हाला काय करायचं आहे विद्रव्य खत्याच्या ग्रेड ह्या बदलायच्या आहेत

शेतकरी मित्रांनो मिरची लागवडीच्या ५० ते ६० दिवसानंतर तुमचा मिरची लागवडी मध्ये पहिला तोडा हा निघू शकतो त्यानंतर दर दहा ते पंधरा दिवसांनी तुमचे तोडे हे सुरु होऊ शकतात.शेतकरी मित्रांनो अश्या प्रकारे थोडक्यात आम्ही मिरची लागवडी बद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

Leave a Comment