विद्यार्थ्यांसाठी मोफत शाळेचा गणवेश वाटप योजना 2023

महाराष्ट्र सरकारने नुकताच 06 जुलै रोजी एक शासन निर्णय जाहीर केला ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार प्रत्येक ग्रामीण भागातील व शहरातील काही भागातील शाळेतील मुलांना मोफत गणवेश वाटप करणार आहे.या योजने सम्बंधित अधिक माहिती साठी खलील लेख सपूर्ण वाचा.

मोफत शाळेचा गणवेश योजना विद्यार्थी पात्रता

मित्रांनो सरकार द्वारे राबवण्यात येणाऱ्या मोफत शाळेचा गणवेश योजनेसाठी खालील पद्धतीने विद्यार्थ्यांची पात्रता ठरवली जाणार आहे व त्यानुसार त्याची या योजनेसाठी निवड करण्यात येणार आहे.

  • ही योजना खास करून गरजू विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे सर्वप्रथम विद्यार्थी हा ग्रामीण भागातील शाळेमध्ये शिकणारा असावा
  • त्यानंतर शिकणारा विद्यार्थी हा इयत्ता पहिली ते आठवी या वर्गात शिक्षण घेणारा असावा
  • यानंतर सरकार या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभ हा अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांना देणार आहे त्यामुळे विद्यार्थी जर अनुसूचित जाती मधील असेल तर त्याला या योजनेचा लाभ 100% मिळणार आहे
  • तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांकरिता देखील ही योजना आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो

मोफत गणवेश योजनेचा लाभ काय आहे

मित्रांनो महाराष्ट्र सरकार मोफत गणवेश योजनेतून गरजू विद्यार्थ्याला एक शालेय ड्रेस आणि एक जोडी बूट यांचे मोफत शाळेमध्ये वाटप करण्यात येणार आहे.

मोफत गणवेश योजना काय आहे

मित्रांनो महाराष्ट्रा मधील अधिक भाग हा ग्रामीण भाग आहे व त्यामध्ये कष्टकरी,शेतकरी व गरजू लोक खूप प्रमाणात राहतात व त्यांच्या विद्यार्थ्यांना एक छोटीशी भेट म्हणून शालेय गणवेश मोफत देणे ही महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. ज्या योजनेचा शासन निर्णय हा 06 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र सरकारने काढला व त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येणार आहे असे धोरण देखील महाराष्ट्र सरकारने दिले.

या शासन निर्णयाच्या माध्यमातूनच केंद्र शासनाच्या असणाऱ्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश वाटप योजना मधून शासकीय तसेच स्थानिक काही ठराविक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुला मुलींना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे.

मोफत गणवेश योजना अनुदान किती आहे

सरकारने राबवलेल्या मोफत गणवेश योजना 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने सर्व महाराष्ट्रभर मोफत गणवेश वाटण्यासाठी 75 कोटी इतका निधी मंजूर केला आहे व या निधीतून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्याला प्रति विद्यार्थी 600 रुपये इतके अनुदान मोफत गणवेश घेण्यासाठी मिळणार आहे ज्यामधून या योजनेचा लाभा संपूर्ण गरजू विद्यार्थ्यांना मिळेल.

1 मिनिटात मोबाईलवर पॅन कार्ड डाउनलोड करायेथे क्लिक करा
LIC कन्यादान पॉलिसी योजना 2023येथे क्लिक करा
1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज योजना येथे क्लिक करा

Leave a Comment