मित्रांनो हल्लीच्या जगात आपण पाहत असाल की घर चालवण्यासाठी व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक ग्रामीण भागातील महिला व शहरी भागातील महिला या मोलमजुरीची कामे करत असतात व दैनंदिन जीवनात दिवस काढत असतात. ज्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबावर व मुलांवर व्यवस्थितपणे लक्ष देता येत नाही व खूप हलकी चे जेवण हे जगावे लागते याचाच विचार करून आत्ता देशातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील कष्टकरी महिलांना एक घर बसल्या रोजगार प्राप्त वा व्हावा यासाठी देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत शिलाई मशीन योजना 2023 ही सुरू केली आहे.
मित्रांनो या योजनेअंतर्गत देशातील सर्व ग्रामीण भागातील व शहरी भागातील कष्टकरी व बेरोजगार महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्यामुळे महिलांना घरबसल्या शिलाई काम करून छोटासा व्यवसाय किंवा रोजगार मिळवता येईल. त्यामुळे जर आपण एक कष्टकरी व बेरोजगार महिला असाल आणि जर तुम्हाला शिलाई मशीन हवी असेल तर तुम्ही खालील दिलेल्या माहितीनुसार या योजनेसाठी अर्ज करू शकता त्यामुळे खालील दिलेली माहिती तुम्ही व्यवस्थित वाचा.
मोफत शिलाई मशीन योजना 2023 काय आहे
मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजना ही योजना संपूर्णपणे केंद्र सरकार अंतर्गत राबविण्यात येणारी योजना आहे व या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण व शहरी भागातील कष्टकरी व बेरोजगार महिलांनाच घेता येतो.
केंद्र सरकार या योजनेमार्फत भारतामधील प्रत्येक राज्याला 50 हजार हून अधिक मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देते ज्याचा लाभ प्रत्येक राज्यातील महिलांना घेता येतो व मिळतो ज्यामुळे महिलांना घरबसल्या एक छोटासा व्यवसाय करून उत्पन्न कमावता येते
महत्वाची सूचना
या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागतो त्या अर्जामध्ये जर तुम्ही पात्र झाला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो व एक मोफत शिलाई मशीन मिळते परंतु अर्ज करत असताना अर्जदाराचे वय हे 20 ते 40 वयोगटातील असावे लागते तरच या योजनेचा लाभ अर्जदाराला मिळतो.
फ्री शिलाई मशीन योजनेचा हेतू काय आहे
मित्रांनो फ्री शिलाई मशीन देण्यामागचा केंद्र सरकारचा हेतू एवढाच आहे की देशातील सर्व बेरोजगार व कष्टकरी महिलांना एक घर बसल्या छोटासा व्यवसाय सुरु करून उत्पन्न कमावता येईल व त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल. व ज्यामुळे महिलांना समाजामध्ये एक वेगळे स्थान प्राप्त होईल व असंख्य महिला एक व्यवसायाचा विचार घेऊन देशामध्ये व्यवसाय सुरू करण्याचे ध्येय ठेवतील असा या योजनेमागे केंद्र सरकारचा येतो किंवा उद्देश आहे
मोफत शिलाई मशीन योजनेचे फायदे काय आहेत
- सर्वप्रथम मित्रांनो या योजनेचा लाभ हा फक्त गरजू महिलांनाच मिळणार आहे त्यामुळे ज्या कष्टकरी आणि बेरोजगार महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
- त्यानंतर मित्रांनो या योजनेसाठी विनामूल्य खर्चात तुम्हाला मोफत शिलाई मशीन ही मिळणार आहे
- यानंतर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला विनामूल्य खर्चात अर्ज करता येणार आहे
- त्यानंतर या योजनेमुळे सर्व ग्रामीण व शहरी भागातील गरीब महिलांना एक रोजगाराची संधी मिळणार आहे
- यानंतर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रा मध्ये 50 हजार हून अधिक मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ मिळू शकतो
मोफत शिलाई मशीन योजना 2023 पात्रता काय आहे
- या योजनेसाठी जर अर्जदाराला पात्र व्हायचे असेल तर अर्जदाराचे सर्वप्रथम वय हे 20 ते 40 वयोगटातील असावे
- यानंतर अर्जदाराच्या पतीचे वार्षिक उत्पन्न हे वीस ते पंचवीस हजार इतके असावे त्याच्या जास्त असेल तर तो अर्जदार पात्र ठरला जाणार नाही
- यानंतर देशातील विधवा व अपंग महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ही खालील प्रमाणे आहेत त्याची पूर्तता तुम्ही व्यवस्थितपणे करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करा
- या योजनेसाठी अर्ज करताना सर्वप्रथम अर्जदाराचे ओळखपत्र हे लागणार आहेत ज्यामध्ये अर्जदाराकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड असणे गरजेचे आहे
- यानंतर अर्जदाराकडे वय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
- त्यानंतर अर्जदाराला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे
- त्यानंतर अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो व त्याच्याजवळ मोबाईल क्रमांक असणे खूप गरजेचे आहे
- यानंतर अर्जदार अपंग असेल तर त्याच्याजवळ अपंगत्व प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
- असे वरील व इतर काही ठराविक कागदपत्रे हे या योजनेसाठी लागणार आहेत
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करायचा
- मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम केंद्र सरकारच्या (india.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावरती जावे लागेल
- यानंतर त्या अधिकृत संकेतस्थळावरती गेल्यानंतर मोफत शिलाई मशीन साठी लागणारा अर्ज तुम्हाला डाऊनलोड करून घ्यावा लागेल तुम्ही तो अर्ज या लिंक वरती जाऊन देखील डाऊनलोड करू शकता
- संबंधित अर्ज डाऊनलोड केल्यानंतर तो अर्ज व्यवस्थितपणे भरून त्याला तुमचे फोटो चिटकवून वर लागणारी कागदपत्रे देखील जोडून तो अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयांमध्ये नेऊन जमा करायचा आहे
- यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून तुमचा अर्ज तपासून घेण्यात येईल व त्याची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही जर या योजनेसाठी पात्र होत असाल तर तुम्हाला या योजनेतून एक मोफत शिलाई मशीन देण्यात येईल