AUSvsPAK : आज 14 डिसेंबर 2023 पार पडत असलेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलिया संघाची दोन खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या दोन खेळाडूंनी सामन्याची सुरुवात केली.
ऑस्ट्रेलिया संघाने सामन्याची सुरुवात चांगल्या फलंदाजीने केली सुरुवातीचे दोन्ही खेळाडू उत्तम प्रकारे पाकिस्तानच्या गोलंदाजावरती मात करू लागले व ओके 42 चेंडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर या खेळाडूने 50 धावांचा आकडा गाठला व पुन्हा एकदा दाखवून दिले की डेव्हिड वॉर्नर टेस्ट मालिकेचा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून का ओळखला जातो, तसेचत्याच्या संगतीने खेळत असणारा उस्मान ख्वाजा ने सुद्धा थोडीशी आक्रमक खेळी खेळण्यास सुरुवात केली होती त्याने एकूण 50 चेंडूत 21 धावा केल्या होत्या
सामन्यात उस्मान ख्वाजा जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा 15 व्या ओव्हर दरम्यान पाकिस्तानचा गोलंदाज जमाल ने पहिला चेंडू जेव्हा त्याला टाकला तेव्हा अब्दुल्ला शफिक या फलंदाजांनी त्या चेंडूवर मोठा प्रहार करण्यास प्रयत्न केला व तो प्रयत्न अपयशी ठरला आणि त्याचा आकाशामध्ये झेल उडाला
जेव्हा झेल उडाला तेव्हा सर्व खेळाडू त्या झेलकडे धाव घेऊ लागले परंतु चेंडू आकाशात उडल्यानंतर त्याच झेलच्या सर्वात जवळ जो खेळाडू होता तो होता अब्दुल्ला शफीक आणि त्या खेळाडूंनी त्या झेलकडे धाव घेण्यास सुरुवात केली व धाव घेता घेता तो त्या चेंडूला पकडण्यास अयशस्वी झाला व त्यानंतर पाकिस्तान खेळाडूंची व प्रेक्षकांची अब्दुल्ला शफीक या खेळाडू वरती नाराजगी सर्वांना पाहायला मिळाली
याचीच खिल्ली उडवत सोशल मीडिया वरती अनेक पोस्ट अब्दुल्ला शफीक या पाकिस्तान खेळाडू वरती पहायला मिळाल्या व असंख्य क्रिकेट प्रेमी हसून हसून कमेंट व पोस्ट देखील करू लागले