1 मिनिटात मोबाईलवर पॅन कार्ड डाउनलोड करा

मित्रांनो दैनंदिन जीवनात काम करत असताना आपल्याकडे आपलं ओळखपत्र असणे खूप गरजेचे आहे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड यांचा वापर आजच्या डिजिटल युगात खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बाहेर कुठे पण जाताना आपल्याजवळ आपलं ओळखपत्र असणं खूप गरजेचे आहे

परंतु काही लोकांकडे स्वतःच ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड हे एकच असल्यामुळे जेव्हा पण ते बाहेर जातात तेव्हा ते मतदान कार्ड पॅन कार्ड किंवा आधार कार्ड घेऊन जात नाहीत कारण की ते ओळखपत्र हरवण्याची भीती त्यांना वाटते

त्यामुळे आज आपण आधार कार्ड पॅन कार्ड व मतदान कार्ड मधील एक ओळखपत्र म्हणजेच पॅन कार्ड हे ऑनलाइन पद्धतीने मोबाईलवर कसे डाउनलोड करू शकतो व त्याचा वापर आपण दैनंदिन जीवनात एक ई पॅन कार्ड म्हणून देखिल करू शकतो. तर मित्रांनो खालील दिलेला संपूर्ण लेख वाचा त्यामध्ये व्यवस्थित माहिती सांगितली आहे की पॅन कार्ड मोबाईल वर कसे डाउनलोड केले जाते.

पॅन कार्ड मोबाईल वर डाऊनलोड कसे करायचे

मित्रांनो पॅन कार्ड तुम्ही खालील दिलेल्या माहितीनुसार तुमच्या फोन द्वारे डाऊनलोड करू शकता त्यामुळे खाली दिलेली माहिती तुम्ही व्यवस्थितपणे वाचा.

  • सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती गुगल क्रोम उघडून (incometaxindia.gov.in) या संकेतस्थळावरती जायचं आहे किंवा तुम्ही गुगल वरती (income tax E filling) असे देखील सर्च करू शकता व सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट तुम्हाला दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे
  • जेव्हा तुम्ही (income tax E filling) या पेज वरती याल तेव्हा तुम्हाला खाली स्क्रोल करून एक (Instant E Pean) असा पर्याय दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एकदा एक नवीन पेज उघडेल
  • यानंतर नवीन पेज वरती तुम्हाला खाली एक ( check status and download pan) असा पर्याय दिसेल व त्या पर्यायाच्या खाली एक (Continue) अस बटन असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे
  • (Continue) या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन पेज तुमच्यासमोर लोड होईल त्यावरती तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकण्याचा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला त्या बॉक्समध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे व (Continue) या बटनावर तुम्हाला क्लिक करायच आहे 
  • त्यानंतर आधार कार्ड सोबत जो तुमचा नंबर लिंक आहे त्यांना लिंक नंबर वरती एक ओटीपी येईल तो आलेला ओटीपी तुम्हाला तिथे त्या बॉक्समध्ये टाकावा लागेल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला (Continue) या बटनावरती क्लिक करायचं आहे
  • त्यानंतर तुम्हाला त्या पेज वरती (Pan Allotted successfully) अशी हिरव्या रंगाची सूचना दिसून येईल
  • त्याच सूचनेच्या वरती तुम्हाला (view E pan) असा एक पर्याय दिसून येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमचं पॅन कार्ड हे पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होईल
  • आणि मित्रांनो डाउनलोड झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या पॅन कार्डची पीडीएफ उघडाल तर तुम्हाला त्या पीडीएफ चा पासवर्ड विचारण्यात येईल आणि तो पासवर्ड मित्रांनो तुमची जन्मतारीख असणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमची तिथे जन्मतारीख टाकून ती पीडीएफ उघडायचे आहे व ई पॅन कार्डचा लाभ घ्यायचा आहे
  • अशा पद्धतीने तुम्ही अवघ्या एक मिनिटात मोबाईलचा उपयोग करून पॅन कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकता

पॅन कार्ड असण्याचे फायदे

  • मित्रांनो तुमच्याजवळ पॅन कार्ड असण्याचे खूप फायदे आहेत त्यामधील एक म्हणजे की पॅन कार्ड ला तुम्ही तुमची ओळखपत्र म्हणून देखील वापरू शकता
  • त्यानंतर पॅन कार्ड चा वापर करून तुम्ही विविध सरकारी योजनेचा लाभ देखील घेऊ शकता
  • यानंतर तुम्हाला जर एखाद्या बँकेमध्ये खाते खोलायचे असेल तर तुमच्याजवळ पॅन कार्ड असणे हे खूप गरजेचे आहे जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये तुमचे बँक खाते खोलू शकता
  • यानंतर तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन काढायचे झाले तर तेव्हा तिथे देखील तुम्हाला पॅन कार्ड हे लागते त्यामुळे पॅन कार्ड हे तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे
  • यानंतर जर तुम्हाला विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा म्युचल फंड किंवा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तेव्हा तिथे देखील तुम्हाला पॅन कार्ड  हे लागणार आहे
  • अशा अनेक सरकारी व खाजगी कामांमध्ये पॅन कार्डचा उपयोग खूप प्रमाणात होतो त्यामुळे प्रत्येकाकडे पॅन कार्ड असणे हे खूप गरजेचे आहे
FAQ

मोबाईलवर पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे

मित्रांनो जर तुम्हाला मोबाईल वरती पॅन कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही (incometaxindia.gov.in) या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.

मोबाईल वरून पॅन कार्ड कसे पहायचे

मित्रांनो मोबाईल वरून पॅन कार्ड जर तुम्हाला पहायचे असेल तर तुम्हाला “NSDLPAN” आणि यानंतर पंधरा अंकी पॅन नंबर लिहून “57575” वर तुम्हाला sms करायचा आहे.

Leave a Comment