पंतप्रधान नरेंद्र मोदी जन आरोग्य योजना 2023

भारतामध्ये जर आजाराचे प्रमाण पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात आजार हे नागरिकांना होत असतात व त्या आजाराच्या उपचारासाठी असंख्य नागरिकांकडे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पैसे देखील नसतात त्यामुळे याचाच विचार करून केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी जन आरोग्य योजना ही 23 सप्टेंबर 2018 रोजी सादर करण्यात आली. ही योजना आयुष्यमान भारत योजना म्हणून देखील ओळखण्यात येते.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला केंद्र सरकारकडून त्याच्या उपचारासाठी 5 लाख रुपया पर्यंत खर्च हा मिळतो तर मित्रांनो या संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लेख संपूर्णपणे वाचा.

jan arogya yojana

पंतप्रधान जन आरोग्य योजना काय आहे

मित्रांनो या योजनेला PMJAY या नावाने देखील ओळखलं जाते. पीएम जन आरोग्य योजना ही आयुष्यमान भारत योजना सोबत सुरू करण्यात आली आहे. आणि या योजने मागे सरकारचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येक नागरिकाच्या कुटुंबाला प्रत्येक वर्षासाठी या योजनेअंतर्गत त्यांच्या आरोग्याच्या उपचारासाठी 5 लाख रुपया पर्यंत आर्थिक मदत करणे.

कुटुंबातील कोणताही व्यक्ती प्रत्येक वर्षी या योजनेचा लाभ घेऊन 5 लाख रुपया पर्यंत फुकट उपचार घेऊ शकतो

पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे फायदे

मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फायदे जर आपण पाहिले तर खालील प्रमाणे फायदे हे तुम्हाला या योजनेमुळे होणार आहे.

  • या योजनेतून केंद्र सरकार तुम्हाला तुमच्या उपचारासाठी ज्या वैद्यकीय चाचण्या किंवा उपचार किंवा सल्ला यासाठी होणारा जो खर्च आहे तो खर्च संपूर्णपणे या योजनेअंतर्गत दिला जातो.
  • यानंतर या योजनेतून दुसरा फायदा जो आहे तो तुम्हाला रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी जो तुमच्या वाहतुकीचा किंवा इतर खर्च येतो तो देखील या योजनेअंतर्गत केंद्र सरकार तुम्हाला देते
  • यानंतर या योजनेतून तुम्हाला तिसरा जो फायदा होतो तो म्हणजे रुग्णालयांमध्ये राहून उपचारासाठी घेण्यासाठी जो खर्च येतो तो देखील या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे
  • त्यानंतर या योजनेतून तुम्हाला चौथा फायदा जो होणार आहे तो म्हणजे रुग्णालयांमध्ये तुम्हाला लागणारा जेवणाचा जो खर्च आहे तो सर्व मेसचा खर्च तुम्हाला केंद्र सरकार या योजनेतून देणार आहे
  • यानंतर या योजनेतून तुम्हाला पाच वाजून फायदा होणार आहे तो म्हणजे रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना लागणाऱ्या औषधांचा खर्च देखील तुम्हाला केंद्र सरकार या पंतप्रधान जन आरोग्य योजनेतून देणार आहे
  • अशे वरील व असंख्य फायदे हे तुम्हाला या जन आरोग्य योजनेतून होणार आहेत

पंतप्रधान जन आरोग्य योजना पात्रता

केंद्र सरकारने या योजनेचा लाभ फक्त गरीब कुटुंबातील व्यक्तींना मिळावा यासाठी काही पात्रता देखील आखली आहे जेणेकरून याचा लाभ जास्तीत जास्त गरिबांनाच मिळेल त्यामुळे खालील पात्रतेमध्ये जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम या योजनेचा लाभ हा शहरातील राहणारे नागरिक किंवा गावाकडील खेडेगावात राहणारी नागरिक देखील घेऊ शकतात
  •  यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे व त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे  दीड लाख रुपया पेक्षा कमी पाहिजे.
  • यानंतर लाभार्थ्याकडे जर कमी प्रमाणात शेत जमीन कमी असेल किंवा काहीच नसेल तर  तो लाभार्थी या योजनेसाठी पात्र होणार आहे
  • अशी वरील काही ठराविक पात्रता या योजनेसाठी आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या योजनेच्या संकेतस्थळावरती जाऊन घेऊ शकता

पंतप्रधान जन आरोग्य योजना 2023 अर्ज असा करा

  • मित्रांनो जर तुम्ही या योजनेसाठी पात्र होत असाल आणि जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायला लागेल अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्याजवळच्या अटळ सेवा केंद्रा मध्ये किंवा जनसेवा केंद्रा मध्ये जावे लागेल
  • तिथे गेल्यानंतर तुम्हाला या योजने संबंधित माहिती तेथील अधिकाऱ्याला द्यावी लागेल आणि त्यानंतर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला तिथे लागतील.
  • त्यानंतर तेथील अधिकारी तुमचा अर्ज करून तुमचे या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करेल आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी तुम्हाला जनसेवा केंद्रा कडून एक या योजनेसाठी गोल्डन कार्ड मिळेल.
  • आणि जेव्हा तुम्हाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गोल्डन कार्ड मिळेल तेव्हा ते कार्ड दाखवून तुम्ही कोणत्याही रुग्णालयात पाच लाख रुपये पर्यंत फुकट उपचार घेऊ शकता

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अधिक माहितीसाठी

मित्रांनो जर तुम्हाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल किंवा या योजनेसाठी कोणते कागदपत्रे किंवा काय पात्रता तसेच अर्ज पद्धत कशी आहे या संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही या योजनेच्या (www.pmjay.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावरती भेट देऊन अधिक माहिती देऊ शकता

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्ज येथे क्लिक करा
मोफत दवाखाना योजना येथे क्लिक करा
FAQ
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ कोणाला मिळेल

मित्रांनो केंद्र सरकार या योजनेचा लाभ अशा नागरिकांना देत आहे की जे नागरिक आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत शेत जमीन नाही राहण्यासाठी घर नाही आदिवासी,कामगार वर्ग बेरोजगार अशा व्यक्तींना सरकारी योजना चा लाभ देते

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून किती अनुदान मिळते

मित्रांनो या योजनेतून लाभार्थ्याला व त्याच्या कुटुंबाला प्रति वर्ष 5 लाख रुपया पर्यंत केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत अनुदान हे मिळते

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्यायचा

मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही जवळच्या जन आरोग्य केंद्रा मध्ये जाऊन आयुष्यमान कार्ड काढू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment