मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग 40 हजार ते 50 हजार इतके वेतन देते. आणि या वेतनामध्ये दरवर्षी महागाई प्रमाणे एक ते दोन हजार रुपयाची वाढ ही होत असते
पशुधन पर्यवेक्षक म्हणजे काय
ग्रामीण भागातील गाई,म्हैस पालन,शेळ्या अशा पशुंच्या पालन पोषण करिता व त्यांच्या आरोग्य तपासणी करिता नेमण्यात आलेला अधिकारी म्हणजे पशुधन पर्यवेक्षक होय
पशुधन पर्यवेक्षक ची कामे
- पशुधन पर्यवेक्षक ची कामे ही प्राण्यांची देखभाल व उपचार व्यवस्थितपणे करणे
- प्राण्यांच्या भोवतील परिसर स्वच्छ ठेवणे किंवा स्वच्छ करून घेणे
- सर्व कामे व्यवस्थितपणे चालण्यासाठी सर्व कामगारांवर व मजुरांवर व्यवस्थित लक्ष ठेवणे
- प्रत्येक गावागावात प्राण्यांचे प्रशिक्षण घेणे यासाठी मार्गदर्शन करणे
- प्राण्यांना होणारे आजार व त्या आजारावर उपचारासाठी लोकांना मार्गदर्शन करणे
पशुधन पर्यवेक्षक पात्रता
- पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय हे 18 ते 38 इतके असायला हवे
- यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे दहावी पास इतके बसायला हवे व त्याच्याजवळ पशु विभागाचा एक तरी डिप्लोमा केलेला असायला हवा
- किंवा महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
- महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषि विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य विद्यापीठाची बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही.एस.सी. अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी
- यानंतर अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र मधील राहणारा रहिवासी असायला हवा
पशुधन पर्यवेक्षक ची प्रमोशन किती आहेत
जर तुमची पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी निवड झाली असेल तर त्यानंतर तुम्हाला वरती दोन प्रमोशन मिळतात त्यामध्ये सहाय्यक पशुधन विकास अधिकारी हे पहिलं प्रमोशन तुमचं होतं त्यानंतर दुसरे प्रमोशन हे क्लास वन पोस्ट साठी होतं ते म्हणजे पशुधन विकास अधिकारी अशा प्रकारची दोन प्रमोशन भविष्यात तुमच होऊ शकत
पशुधन पर्यवेक्षक पगार
पद | पगार |
पशुधन पर्यवेक्षक पगार | 40 हजार ते 50 हजार |
पशुधन पर्यवेक्षकाच्या हाताखाली कोण काम करते
ड्रेसर व परिचारक हे पशुधन पर्यवेक्षकांच्या हाताखाली काम करत असतात
पशुधन पर्यवेक्षक प्रश्नपत्रिका अभ्यासक्रम
पशुधन पर्यवेक्षक | लेखी परीक्षा गुण |
मराठी | 30 गुण |
इंग्रजी | 30 गुण |
सामान्य ज्ञान | 30 गुण |
चालू घडामोडी | 80 गुण |