पतपेढी कर्ज आणि ठेवी व्याजदर माहिती | patpedhi loan

मित्रांनो महाराष्ट्र मध्ये तीन प्रकारच्या पतपेढी आहेत ग्रामीण पतपेढी, शहरी पतपेढी आणि वेतनदाराची पतपेढी ज्याला नोकरीवाले  सोसायटी असे म्हणतात. तर आज आपण पाहणार आहोत की या तीन ही प्रकारच्या पतपेढीमध्ये कर्ज कसे दिले जाते. जसे की मित्रांनो पतपेढी ही दोन प्रकारे लोकांना पैसे पूर्वत असते त्यामधील एक म्हणजे कर्ज देऊन आणि दुसरे म्हणजे ठेवीवर व्याजदर देऊन. तर आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया की वरील सांगितलेल्या तीन प्रकारच्या पतपेढया किती टक्के व्याजदरावर कर्ज देतात तसेच किती रक्कमेवर किती टक्के व्याजदर देतात तर संपूर्ण खाली दिलेला लेख वाचा.

नागरी पतपेढी ठेवी व्याजदर

मित्रांनो नागरी पतसंस्थेमध्ये ठेवी व्याजदर हे राज्य सरकारच्या नियमानुसार 9.5% इतके जास्तीत जास्त द्यावे याच्या जास्त देऊ नये. ठेवी व्याजदरा मध्ये पैसे असतील किंवा इतर कोणतेही सोने तारण असेल. त्यावर जास्तीत जास्त 9.5% च्या आत मध्ये पतसंस्थेला योग्य वाटेल त्या टक्क्यांमध्ये ते सभासदांना ठेवी वरती व्याजदर देऊ शकतात आणि हा नियम राज्य शासनाच्या नियमानुसार आहे त्यामुळे आपल्याला जर पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवायची असेल आणि जर आपल्याला कोणतीही पतसंस्था 9.5% पेक्षा अधिक व्याजदर देत असेल तर तिथे त्या पतसंस्थेमध्ये काहीतरी घोटाळा असू शकतो त्यामुळे अशा पतसंस्थे पासून आपण दूर राहिले पाहिजे.

नागरी पतपेढी कर्ज व्याजदर

विनातारण कर्ज : विनातारण कर्ज म्हणजे काय तर या कर्जासाठी आपल्याला पतपेढीमध्ये कोणत्याही प्रकारची मालमत्ता म्हणजेच पैसे,सोने,जमीन,गाडी अशी कोणती मालमत्ता आपल्याला ठेवावी लागत नाही बिना मालवत्ता ठेवता आपल्याला हे कर्ज दिले जाते. आणि खास करून हे कर्ज शैक्षणिक किंवा वैयक्तिक कामासाठी कर्ज  दिले जाते. आणि राज्य शासनाच्या नियमानुसार प्रत्येक पतपेढीने विनातारण कर्जावरती जास्तीत जास्त 15% कर्ज व्याजदर हा आकारला पाहिजे. आणि पतपेढी ही 15% च्या आत मध्ये त्याला वाटेल त्या व्याज दरावरती लोकांना कर्ज हे वाटू शकते.

तारण कर्ज : तारण कर्ज म्हणजे काय तर या कर्जामध्ये आपल्याला पतपेढीमध्ये आपल्या नावावर असणारी नोंदणीकृत मालमत्ता ही ठेवावी लागते जसे घर,जमीन,गाडी,फ्लॅट,सोने अश्या विविध ठेवीवर आपल्याला जे पतपेढीकडून कर्ज दिले जाते त्याला तारण कर्ज असे म्हणतात. या तारण कर्जामध्ये लोकांना पतपेढी जास्तीत जास्त 13% व्याज दारावरती पैसे हे वाटू शकते. आणि 13% च्या आत पतपेढीला वाटेल त्याप्रमाणे त्या व्याजदरा वरती ते लोकांना पैसे देऊ शकते.

शहरी पतपेढी ठेवी व्याजदर

मित्रांनो राज्य सरकारच्या नियमानुसार शहरी पतपेढी वरती देखिल ठेवी व्याजदर हे जास्तीत जास्त 9.5% इतके राहील. त्यामुळे आपली ठेवी जास्त असली किंवा कमी असली तरी त्यावर व्याजदर हे आपल्याला सरकारच्या नियमानुसार 9.5% आत पतसंस्थेच्या व्याजदरा प्रमाणे मिळेल.

शहरी पतपेढी कर्ज व्याजदर

विनातारण कर्ज : शहरी पतपेढी मध्ये सुद्धा विनातारण कर्ज व्याजदर हा जास्तीत जास्त 15% इतका राहील.

तारण कर्ज : शहरी पतपेढी मध्ये तारण कर्ज व्याजदर हे जास्तीत जास्त 13% इतके राहील

सरकारी कर्मचारी पतपेढी ठेवी व्याजदर (वेतनदाराच्या सोसायटी)

मित्रांनो राज्य सरकारच्या नियमानुसार कर्मचारी पतसंस्थेमध्ये देखील वेतनदाराच्या ठेवी वरती त्याला जास्तीत जास्त 9.5% इतके व्याजदर दिला पाहिजे. त्याआत मध्ये किती पण टक्के देऊ शकते फक्त 9.5% अधिक दिले नाही पाहिजे.

सरकारी कर्मचारी पतपेढी कर्ज व्याजदर

मित्रांनो नागरी पतपेढी आणि शहरी पतपेढी यांच्यामधील कर्ज व्याजदरापेक्षा कर्मचारी पतसंस्था कर्ज व्याजदर हे पूर्णपणे वेगळे आहे

  • सर्वप्रथम वेतनदाराच्या सोसायटीने किंवा पतसंस्थेने बाहेरुन कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतले नसेल, म्हणजेच सांगायचं झालं तर वेतनदाराच कर्ज हे त्या सोसायटीने स्वतःच्या मालमत्तेतून देत असेल तर त्यावेळेस पतसंस्थेने जास्तीत जास्त 12% व कमीत कमी 6% च्या आतमध्ये त्या कर्जावरती व्याजदर हा आकारला पाहिजे.
  • यानंतर जर कर्मचारी पतसंस्थेने बाहेरून बँकेकडून किंवा इतर संस्थांकडून जर कर्ज घेतले असेल म्हणजेच की वेतनदाराला कर्ज देण्यासाठी सोसायटीने बाहेरून कर्ज घेतले असेल तर तेव्हा पतसंस्था ही लावलेल्या व्याजदरामध्ये 2% अधिक व्याजदर वाढवून त्या वेतनदाराला कर्ज देऊ शकते.

वरील सर्व ठेवी आणि कर्ज व्याजदर हे कमाल आणि किमान मध्ये सांगितले आहेत त्यामुळे प्रत्येक पतपेढीचे ठेवी आणि कर्ज व्याजदर हे वेगवेगळे असेल त्यामुळे तुम्ही सविस्तर आपल्या जवळच्या पतपेढीत जाऊन याबद्दल माहिती घेऊ शकता.

पतपेढी कर्ज वसुली नियम

मित्रांनो कायद्यानुसार कोणत्याही पतपेढीला कर्ज वसुली जर करायची असेल तर कलम 156 आणि नियम 107 या कायद्यानुसार पतपेढीला कर्ज वसुली करण्यास आदेश देण्यात आली आहेत. आणि न्यायालया कडून कलम 98 च्या आधारावरती प्रत्येक पतसंस्थेला कर्ज वसूल करण्यासाठी एक प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र जर त्या पतपेढीकडे असेल तर तेव्हा मुद्दल व्याज निवडाची रक्कम खर्च इतर खर्च कर्ज वसुली व्याज हे सर्व अधिकार या प्रमाणपत्र मार्फत त्या पतपेढीला न्यायालया कडून देण्यात येते.

Leave a Comment