Poco c65 smartphone : पोको कंपनीचा नुकताच बाजारामध्ये आलेला Poco C65 हा स्मार्टफोन ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध होत आहे कारण म्हणजे हा असा एक फोन ठरणार आहे जो अवघ्या 7 हजारामध्ये आपल्याला 8GB रॅम देणार आहे, ज्यामुळे आपला फोन कधीच हँग होणार नाही व एक उत्तम प्रकारे चालेल यामुळे ग्राहकांची या स्मार्टफोन साठी खूप मागणी होत आहे
Poco c65 Display
पोको स्मार्टफोनचा डिस्प्ले जो असणार आहे तो खूप मोठा पहायला मिळणार आहे जो असणार आहे 6.74 इंच चा फुल HD +ipc LCD तसेच 90 hz refresh rate व 600 nits peak brightness असा हा संपूर्ण स्मार्टफोनचा डिस्प्ले असणार आहे जो आपल्याला पंधरा ते वीस हजाराच्या स्मार्टफोन मध्ये पाहायला मिळतो तोच आपल्याला या स्मार्टफोन मध्ये 7,000 रुपयांत पाहायला मिळणार आहे
Poco c65 camera
पोको स्मार्टफोन मध्ये तुम्हाला तीन कॅमेरे पाहायला मिळतात त्यामध्ये पहिला जो कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सल कॅमेरा आहे ज्यामुळे तुमची फोटो क्वालिटी ही खूप उत्तम राहणार आहे आणि कमी पैशात जास्त मेगापिक्सल चा कॅमेरा देणारा हा एक स्मार्टफोन आहे आणि पुढे सेल्फी काढण्यासाठी जो कॅमेरा देण्यात आला आहे तो 8 मेगापिक्सेल चा कॅमेरा आहे ज्यामधून उत्तम प्रकारे सेल्फी फोटो निघतात
Poco c65 battery
पोको स्मार्टफोन्स मध्ये जी तुम्हाला बॅटरी मिळणार आहे ती 5000mAh बॅटरी असणार आहे जे की खूप चांगले आहे कंपनी सांगते की एकदाच चार्जिंग केल्यावरती तुमचा स्मार्टफोन पूर्ण दिवसभर चालू शकतो
Poco c65 sim card
पोको या स्मार्टफोन मध्ये 4g चेच सिम कार्ड चालेल फोन हा दहा हजार रुपया आतील किमतीचा असल्यामुळे तुमच्या स्मार्टफोनला 5g सिम कार्ड चालणार नाही, पण तसे पहिले तर जर तुमचे कमी पैशातील बजेट असेल तर तुमच्यासाठी हा स्मार्टफोन एक उत्तम स्मार्टफोन ठरणार आहे