मित्रांनो पोलीस पाटील भरती साठी खालील प्रकारची पात्रताही आहे व या पात्रतेनुसार उमेदवाराची निवड केली जाते
पोलीस पाटील भरती पात्रता
- पोलीस पाटील या पदासाठी अर्ज करणारा अर्जदार हा दहावी पास असायला पाहिजे
- यानंतर उमेदवाराचे वय हे कमीत कमी 25 वर्ष ते जास्तीत जास्त 45 वर्षापेक्षा जास्त नसावे
- अर्जदार हा महाराष्ट्रातील स्थानिक कायमचा रहिवासी असावा त्याच्याजवळ (रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, स्वयंघोषणापत्र, स्थानिक कायमचा रहिवासी असल्याचा रहिवासी दाखला अश्या पुरव्यांची प्रत त्याला अर्जासोबत जोडावी लागणार आहे त्यामुळे ही सर्व कागदपत्रे त्याच्याकडे असायला हवीत
- यानंतर अर्जदाराकडे स्वतःचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी असणे गरजेचे आहे
- त्यानंतर अर्जदार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा
- अर्जदाराला दोन पेक्षा जास्त मुले नसावीत
- यानंतर अर्जदाराकडे कॅटेगिरी नुसार नॉन क्रिमिनल असल्याचा पुरावा असणे गरजेचे आहे
- अशी वरील काही पोलीस पाटील पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता आहे परंतु पोलीस पाटील पदाविषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लेख संपूर्ण वाचू शकता.
पोलीस पाटील परीक्षा अभ्यासक्रम कसा असतो
- मित्रांनो पोलीस पाटील परीक्षा अभ्यासक्रमामध्ये पोलीस पाटील या पदासाठी एकूण 80 गुणांची परीक्षा घेण्यात येते व प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जातो
- परीक्षा ही संपूर्णपणे एम सी क्यू या प्रश्नपत्रिका स्वरूपात घेतली जाते
- यानंतर घेतली जाणारी परीक्षा ही संपूर्णपणे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमा वरती आधारित असते यामध्ये सामान्य ज्ञान,गणित पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तुत्व बुद्धिमत्ता स्थानिक परिस्थितीतील चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश घेतला जातो
- यानंतर जर उमेदवारास लेखी परीक्षा मध्ये 45 टक्के मिळाले तर त्याला पुढे तोंडी परीक्षेसाठी पात्र केले जाते
- घेतली जाणारी तोंडी परीक्षा ही 20 गुणांची असते, त्यामध्ये जर उमेदवार प्राप्त झाला तर त्याची पोलीस पाटील या पदासाठी निवड केली जाते
पोलिस पाटीलचे काम काय असते
मित्रांनो पोलीस पाटील हा गाव पातळीवरती काम करणार एक पोलीस विभागाचा घटक असतो. व त्याचे काम हे असते की जेव्हा गावामध्ये एखादा गुन्हा घडतो जसेकी चोरी खून किंवा भांडणे तर त्या गुन्ह्याची संपूर्ण माहिती पोलीस पाटील द्वारे पोलीस स्टेशनला कळविण्याचे काम पोलीस पाटीलचे असते
पोलीस पाटील पगार किती असतो
पोलीस पाटील या पदासाठी पगार हा दर महिना 5000 रुपये इतका दिला जातो
सरकारी योजना | |
महाराष्ट्र लेक लाडकी योजना | येथे क्लिक करा |
मोफत शिलाई मशीन योजना | येथे क्लिक करा |