नोकारी : 13 हजार पदांसाठी पोलिस भरती होणार, कशाप्रकारे पदे भरली जाणार जाणून घ्या..

Police recruitment for 13 thousand posts in Maharashtra

पोलिस भरती 2024 : महाराष्ट्र राज्य गृह विभागांतर्गत महाराष्ट्र मध्ये एकूण 13 हजार पोलीस  पदांसाठी भरती होणार आहे, ज्यामुळे असंख्य दिवसापासून रखडलेला मुद्दा म्हणजे पोलीस भरती कधी होणार याची चिंता आता मिटली आहे ही पोलीस भरती गृह खात्याद्वारे केली जाणार आहे व महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये या भरतीतून रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दोन लाख कॉन्स्टेबल आहेत त्यामध्ये दरवर्षी दोन ते तीन टक्के पोलीस हे निवृत्त होतात व हजार पोलिसांची पदोन्नती प्रमोशन होते तसेच बाकी काही पोलिसांचा अपघाती किंवा आजाराने मृत्यू होतो त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्र गृह खात्यात पोलीस पदासाठी 6000 पदे रिक्त होतात त्याचाच आराखडा बनवून गृह खात्याने यावर्षी तेरा हजार पोलीस पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे

जसे की मार्च महिन्याच्या आत महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे त्याचाच विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आत पोलीस भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आपण जर एक सरकारी नोकरी साठी संधी शोधत असाल तर आपल्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे

गृहखात्या द्वारे सांगण्यात आले की महाराष्ट्र मध्ये लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे परंतु पोलीस खात्यात अजूनही वाढ झाली नाही त्यामुळे पोलीस खात्यात वाढ वाढ होण्यासाठी ही 13000 पदे भरली जाणार आहेत, त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्यात व ग्रामीण भागात पोलीस खाते दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे ज्या निर्णयातून येत्या लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या आधी पोलीस भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Leave a Comment