पोलीस स्टेशन तक्रार अर्ज कसा करायचा | police station takrar arj in marathi 

police station takrar arj in marathi 

police station takrar arj in marathi 

मा. पोलीस निरीक्षक साहेब,

शहर पोलीस स्टेशन राजगुरुनगर खेड,

तालुका. खेड जिल्हा. पुणे

फिर्यादी : (संपूर्ण नाव) जो तक्रार देणार आहे

वय : वर्ष : व्यवसाय

पत्ता :

आरोपी : (संपूर्ण नाव) ज्यावर तक्रार द्यायची आहे

वय : वर्ष : व्यवसाय

पत्ता :

महोदय

मी फिर्यादी/तक्रार अर्ज दाखल करतो की मी वरील ठिकाणाचा रहिवासी असून  मी या भागात शेती हा व्यवसाय करतो माझे घर हे मुख्य गावामध्ये आहे, तर नेहमीप्रमाणे मी दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी मी माझ्या शेतामध्ये काम करत असताना, दुपारच्या वेळी एक वाजल्याच्या सुमारास मी काम करत असलेल्या ठिकाणी वरील आरोपी आला व तो आरोपी मला दारूच्या नशेत उलटेसुलटे बोलू लागला व तो आरोपी गावामधलाच होता व त्याचे नाव (आरोपीचे संपूर्ण नाव ) असे होते, तर या आरोपीने मला खूप शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी ही दिली आहे, तर मला जीवाची खूप काळजी वाटत आहे त्यामुळे मी या आरोपीवर कायदेशीर जीवे मारण्याची धमकी दिल्या बाबत तक्रार दाखल करत आहे

फिर्यादी

संपूर्ण नाव

संपूर्ण पत्ता 

पोलीस तक्रार नोंदवतानी कोणती काळजी घ्यावी

  • सर्वात महत्त्वाचे आपण तक्रार ही कोणत्याही पोलीस चौकीमध्ये नोंदवू शकतो म्हणजेच ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणच्या जवळच्या पोलीस चौकीमध्ये आपण तक्रार ही नोंदवू शकतो
  •  पोलीस तक्रार नोंदवल्यानंतर नोंदविलेल्या तक्रारीची एक प्रत आपल्याजवळ ठेवावी व त्यावर तक्रार नोंदवून घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची सही घ्यावी
  • जर गुन्हेगाराकडून आपल्याला मारहाण झाली असेल तर त्वरित जवळच्या पोलीस चौकीत तक्रार नोंदवून तेथून सरकारी दवाखान्याचे पत्र घेऊन सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करावी, त्याचबरोबर सरकारी दवाखान्यात देखील प्रमाणपत्र मिळते ते तिथून घेऊन पोलीस चौकीत आणून द्यावे व एक प्रत तुमच्याजवळ ठेवावी
  • त्यानंतर स्वतः केलेली तक्रार संपूर्ण स्वतः वाचून किंवा एखाद्याकडून वाचून घेऊन तरच त्यावरती सही किंवा अंगठा करावा अन्यथा आपल्याला फसवले देखील जाऊ शकते
  •  आपण ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार करणार आहोत म्हणजेच आपली तक्रार जी पोलीस अधिकारी नोंदवून घेणार आहेत त्यांचे नाव व बिल्ला क्रमांक काय आहे याची नोंद आपण आपल्याकडे ठेवायला पाहिजे जेणेकरून पुढे आपल्याला सांगता येईल की मी यांच्याकडे तक्रार नोंदवली होती
  • महत्त्वाची बाब म्हणजे स्त्रियांना किंवा पंधरा वर्षाखालील मुलांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवता येत नाही असा कायदा आहे
  • पोलीस किंवा संबंधित अधिकारी जर तुमची तक्रार नोंदवून घेत नसतील तर तुम्ही थेट न्यायालयामध्ये देखील जाऊन तक्रार करू शकता
टॉप 05 शैक्षणिक अर्जयेथे क्लिक करा 

Leave a Comment