शेतकरी मित्रांनो आत्ता महाराष्ट्र कृषी विभाग सर्व शेतकऱ्यांसाठी पी व्ही सी पाईप अनुदान योजना ही राबवत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाईप हा खूप गरजेचा असतो परंतु पाईप खरेदीसाठी त्याला खूप जास्त प्रमाणात खर्च देखील करावा लागतो ज्याचं नुकसान त्याला त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा उत्पादनात होत असतो. त्यामुळेच महाराष्ट्र कृषी विभाग पीव्हीसी पाईप अनुदान योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला पाईप खरेदी वरती 50% इतके अनुदान हे देण्यात येणार आहे व याचा लाभ प्रत्येक शेतकरी देखील घेऊ शकतो तर या योजनेचा लाभ कसा घेता येईल याची पात्रता व अर्ज कसा करायचा याबाबत खालील संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थितपणे वाचा.
पीव्हीसी पाईप योजना अनुदान
शेतकरी मित्रांनो या पाईप योजनेसाठी कृषी विभाग आपल्याला पाईप खरेदी वरती 50% इतके अनुदान देते जे जवळपास 15 हजाराच्या आसपास आहे.
- यामध्ये जर तुम्ही एचडीपी पाईप साठी अर्ज केला असेल तर तुम्हाला 50 रुपये प्रति मीटर व जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंतच्या पाईप साठी अनुदान हे दिले जाते
- आणि जर तुम्ही पीव्हीसी पाईप साठी अर्ज केला असेल तर तुम्हाला 35 रुपये प्रति मीटर प्रमाणे जास्तीत जास्त 500 मीटर पाईप साठी अनुदान हे दिले जाईल.
- जर तुम्ही या योजनेसाठी पात्र झाला तर तुम्हाला त्यानंतर तुमच्या जमिनीचा सातबारा ८अ उतारा हा व ज्या दुकानातून तुम्ही पीव्हीसी पाईप खरेदी करणार त्या दुकानाचं कोटेशन बिल व तुमच बँक पासबुक देखील तुम्हाला (Mahadbt.in) या पोर्टल वरती अपलोड करावे लागते त्यानंतर याची संपूर्णपणे छाननी झाल्यानंतर तुम्हाला अनुदान हे डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यात दिले जाते.
पीव्हीसी पाईप योजना पात्रता
शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी पात्रता ही खालील प्रमाणे असेल आणि या योजनेसाठी पात्र होण्यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही त्या व्यवस्थितपणे वाचा व तुम्ही पात्र होत असाल तरच या योजनेसाठी अर्ज करा.
- सर्वप्रथम या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जमीन ही तुमच्या मालकीची हवी व तुमच्याकडे सातबारा ८अ हा असणे गरजेचे आहे तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता
- शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्या शेतामध्ये बोरवेल विहीर किंवा शेततळे असे पाण्याचे ठिकाण किंवा साधन असणे गरजेचे आहे व त्याची नोंद तुमच्या जमिनीच्या सातबारा वरती असणे देखील गरजेचे आहे जर तुमच्या सातबारावरती नोंद नसेल तर तुम्ही तलाठ्या कडे जाऊन त्याची नोंद देखील करू शकता तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
- यानंतर या योजनेसाठी जो शेतकरी अर्ज करणार आहे त्याच्याकडे एक हेक्टर किंवा एक एकर च्या आसपास जमीन असणे गरजेचे आहे
पीव्हीसी पाईप योजना अर्ज कागदपत्रे
या योजनेसाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची गरज किंवा आवश्यकता भासणार आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमचे ओळखपत्र लागणार आहे ज्यामध्ये आधार कार्ड,पॅन कार्ड हे तुम्हाला लागणार आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक व तुमची ईमेल आयडी तुम्हाला लागणार आहे.
- यानंतर ज्या उमेदवाराचा अर्ज तुम्ही करणार आहात त्याच्या जमिनीचा सातबारा आठ अ उतारा देखील तुम्हाला लागणार आहे
- यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत कडून दिला जाणारा रहिवासी दाखला देखील लागणार आहे
- अधिक कागदपत्रांच्या माहितीसाठी तुम्ही कृषी विभाग कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करू शकता
पीव्हीसी पाईप अनुदान योजना अर्ज
शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी अर्ज हा तुम्हाला दोन पद्धतीने करता येईल एक म्हणजे पीव्हीसी पाईप साठी व दुसरा म्हणजे एचडीपी पाईप साठी तर या दोन प्रकारच्या पाईप साठी तुम्हाला अर्ज हा करता येऊ शकतो.
- शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र कृषी विभागाच संकेतस्थळ (Mahadbt.in) या पोर्टल वरती जाऊन तुम्ही तिथे सर्वप्रथम तुमची प्रोफाइल बनवून या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा केला जातो या संबंधित तुम्ही youtube वरती व्हिडिओ पाहू शकता व त्याप्रमाणे अर्ज देखील करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयामध्ये जाऊन कृषी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन या योजने संबंधित अधिक माहिती घेऊन तिथे देखील अर्ज करू शकता.
- अर्ज केल्यानंतर कृषी विभाग या योजनेसाठी उमेदवारांची निवड ही लॉटरी पद्धतीने करत असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला लॉटरी लागेल त्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मिळेल किंवा तुमच्या महाडीबीटी या पोर्टल वरती तुम्हाला मिळेल