सरकारी योजना : रोजगार संगम योजना 2024 | अर्ज कसा करायचा

rojgar sangam yojana 2024 maharashtra

सरकारी योजना : आपण पाहतो की महाराष्ट्रा मध्ये  नोकरीची संधी उपलब्ध नसल्यामुळे असंख्य तरुण हे बेरोजगार आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकार आता आर्थिक रित्या दुर्बळ कुटुंबातील मुलांना छोटीशी मदत म्हणून रोजगार संगम योजना सुरू करणार आहे ज्यामध्ये पात्र लाभार्थ्याला 5 हजार रुपये अनुदान मिळणार आहे या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे व अर्ज कसा करायचा या संबंधित माहिती खालील प्रमाणे दिली आहे

महाराष्ट्रा मध्ये रोजगार संगम योजनेचा फायदा असा असणार आहे की असंख्य बेरोजगारांना आर्थिक सहाय्य प्राप्त होणार आहे ज्यामध्ये सरकारचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत प्राप्त करून देणे तसेच महिलांना व कुटुंबातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. असे काही ठराविक उद्देश या योजनेचे आहेत

रोजगार संगम योजना पात्रता

  • अर्ज करणाऱ्या उमेदवार हा महाराष्ट्र मध्ये राहणारा कायमचा रहिवासी असावा
  • अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 वय वर्षे ते 40 वय वर्ष इतके असावे
  • योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे पाचवी पास इतके असावे

रोजगार संगम योजना कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
  • रहिवासी दाखला
  • EWS प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ई-मेल आयडी

रोजगार संगम योजना अर्ज कसा करायचा

  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर गुगल क्रोम वरती (rojgar.mahasangam. gov.in) असे टाकायचे आहे, व यानंतर जे अधिकृत संकेत स्थळ येईल त्यावर क्लिक करून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे
  • अर्ज करताना तुम्हाला तुमची स्वतःची माहिती व्यवस्थित भरून दिलेली सर्व कागदपत्रे अपलोड करून भरायची आहेत
  • अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला तुमची नोंद करावी लागेल व्यवस्थित रजिस्ट्रेशन करून तुमचे नोंद करून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून त्यावर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकावा लागेल
  • संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या भरून सबमिट या बटना वरती तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर काही दिवसात तुमच्या सर्व कागदपत्रांचे पूर्तता केली जाईल व तुम्ही या योजनेसाठी पात्र असल्यास तुमच्या मोबाईल क्रमांक वर मेसेज येईल व त्यानंतर या योजनेअंतर्गत 5 हजार तुमच्या खात्यात जमा होतील

Leave a Comment