पाकिस्तानमधून ते संपूर्ण जगभरात सर्वात फास्ट बॉलर म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब अख्तर त्याच्या एका मुलाखतीत माहिती देतो की भारताचा सचिन तेंडुलकर जेव्हा मैदानामध्ये बॅटिंगसाठी येतो तेव्हा माझ्या मनात नेहमीच भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण तयार होते जर सचिन तेंडुलकरला लवकरात लवकर आउट नाही केले तर आपण मॅच हरलोच म्हणून समजा अशी भीती पाकिस्तानच्या खेळाडूंच्या मनात नेहमी येत होती. त्यामुळे आज आपण याच बद्दल माहिती पाहणार आहोत की सचिन तेंडुलकर एक मोठा क्रिकेटर कसा बनला. की जो आजच्या काळात असंख्य क्रिकेटरांच एक प्रेरणास्थान आहे.
सचिन तेंडुलकर माहिती
- महाराष्ट्रातील मराठी कुटुंबामध्ये मुंबई येथील बाद्रा शहरातमध्ये 24 एप्रिल 1973 रोजी सचिन तेंडुलकरचा जन्म झाला आणि हाच मुंबईच सचिन पुढे जाऊन अवघ्या भारताचा झाला.पहिल्यापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड जिद्दी असल्यामुळे सचिनने लहानपणीच क्रिकेट क्षेत्रात जाण्याचे ठरवले होते. आणि या स्वप्नाला साखर करण्याचे काम सचिन व सचिनच्या घरच्यांनी ठरवले म्हणजेच एकंदरीत सचिनला सुरुवातीच्या काळापासूनच घरच्यांचा सपोर्ट होता कारण की घरच्यांनी पाहिलं होतं की सचिनचं क्रिकेटप्रति किती प्रेम होतं व त्यासाठी तो किती मेहनत करत होता ते पाहून सचिनला सुरुवातीपासूनच त्याच्या आई व वडील हे सपोर्ट करत होते. मध्यमवर्गीय कुटुंबातला असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याला चांगली कोचिंग आणि प्रशिक्षण सुविधा मिळण्यासाठी घरच्यांना पैशांची खूप अडचण येत होती. त्यामुळे सचिनला कधी कधी रस्त्यावर किंवा तात्पुरत्या मैदानात क्रिकेट खेळावे लागत असे व सराव करावा लागत असे. परंतु त्याच्या मनामध्ये ध्येय व स्वप्न साकार करण्याची इच्छा होती त्यामुळे तो जिथे मिळेल तिथेच क्रिकेटचा सराव करु लागला. आणि त्या काळात मुंबईमध्ये शारदाश्रम विद्यामंदिर शाळा ही उत्तम क्रिकेटपटू घडवण्यात प्रसिद्ध होती त्यामुळे त्याने त्या शाळेत शिक्षण हे घेतले, परंतु तिथे देखील सचिनचा सराव हा चांगला होत नसेल त्यामुळे सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर याने क्रिकेट शिकवणाऱ्या आचरेकर सरांकडे नेलं व तिथून सचिनची क्रिकेट मध्ये एक प्रकारची ट्रेनिंग सुरू झाली. आचरेकर सरांच्या डोळ्यासमोर सचिन चार चार प्रकारच्या नेट मध्ये सराव करायचा. सचिन सांगतो की जेव्हा तो चौथ्या नेटमध्ये सराव करण्यासाठी येत असे तेव्हा आचरेकर सर हे स्टंपच्या वरती एक रुपये ठेवत असे आणि जर एखाद्या बॉलरने सचिनला आऊट केले तर त्याला एक रुपया मिळत असे परंतु एखाद्या बॉलर ने जर सचिनला आऊट केले नाही तर तो एक रुपया सचिनचा होत असे एकूण सचिन ने तेरा रुपय चौथ्या नेट मध्ये बॅटिंग करून कमवले होते असंच खेळत खेळत पुढे वयाच्या 15 व्या वर्षी भारत देशात राबवण्यात येणाऱ्या प्रथम श्रेणी रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याची निवड करण्यात आली आणि त्या स्पर्धेमध्ये त्याच्या खेळीने व त्याच्या कौशल्याने लोकांमध्ये व खेळाडूंमध्ये त्याच्या प्रती एक प्रतिमा तयार झाली परंतु लहान उंचीमुळे काही लोकांकडून किंवा खेळाडूंकडून देखील त्यांच्यावर टीका करण्यात आल्या अशा सर्व गोष्टींचा सुरुवातीच्या काळात सचिनला सामना करावा लागला. तसेच पाठीच्या दुखापतीचा त्रास असल्यामुळे खूप सारे सामने त्याला गमवावे लागले व अनेक साऱ्या लोकांच्या अपेक्षांना देखील सामोरे हे जावे लागले.
- इ.स. 1998 मध्ये सेंट झेवियर च्या विरोधात सचिन व त्याचा मित्र विनोद कांबळे यांने 664 रणांची एक नावलौकिक विक्रमी भागीदारी केली आणि पुढच्याच रणजीच्या सामन्यात शतक ठोकून त्याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधून घेण्यास भाग पाडल. सुरवातीला भारताच्या अंडर नाईन्टी संघामध्ये जेव्हा त्याची निवड झाली नाही तेव्हा सुनील गावस्करांनी त्याला पत्र लिहून त्याचा उत्साह वाढवला. परंतु सचिनची मेहनत पाहून त्याला अखेर 15 नोव्हेंबर 1989 ला पाकिस्तान दौऱ्यासाठी निवडण्यात आले यावेळी सचिनचं वय हे फक्त 16 वर्षीय होत. आणि आणि त्या मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यांमध्ये सचिन बैटिंग करत असताना पाकिस्तानचा बॉलर वकार युनिसचा बोल येऊन नाकावर लागला,व मैदानावरतीच नाकातून रक्त वाहण्यास सुरुवात झाली परंतु तो या परिस्थितीत सुद्धा मैदानावरती टिकून राहिला व त्याने त्या मैदानावरती 57 रन बनवले. सचिनची खेळी व क्रिकेट प्रतिप्रेम कौशल्य हे सर्व पाहून त्याच नाव हे पुढे जायला लागल त्यामुळे पुढे त्याला चाहते,मीडिया व भारतातील क्रिकेट संस्थांकडून वाढत्या दबावाचा आणि अपेक्षांचा सामना त्याला करावा लागला. यानंतर 1990 मध्ये सचिनची कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली, आणि याच कसोटी सामन्यात सचिन ने त्याचं कसोटी मधील पहिलं 113 रनांचे शतक केल. त्यानंतर 1992 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कसोटीच्या सामन्यात दोन कसोटी शतके केली एक 148 राणांचं व दुसर 114 राणांचं अशी दोन कसोटी शतके केली. यानंतर 1994 मध्ये एक दिवसीय न्युझीलँड विरोधातील सामन्यात सचिनने 49 चेंडूत 84 रन बनवून एक विक्रमी खेळी खेळला. आणि त्याच वर्षी सचिनने असंख्य देशांविरुद्धच्या सामन्यात एक दिवसीय शतके केली. त्यानंतर सचिन 1994 साली डॉ अंजली मेहता बरोबर लग्नाच्या जाळ्यात अडकला. आणि त्याच साली सचिनला राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर 1992 च्या सचिनच्या पहिल्या विश्वकपानंतर 1996 साली दुसऱ्या विश्वकपाच्या सामन्यात सचिनने चांगली खेळी करून संघाला क्वालिफाय करून सेमी फायनल पर्यंत नेल. यामुळे सचिनची प्रसिद्धी वाढू लागली यामुळे भारतामध्ये पुढील कोणताही जर सामना असेल तर सचिन जर आउट झाला तर लोक सामना पाहणे बंद करायचे. यानंतर सचिनसाठी 1998 हा काळ खूप महत्वपूर्ण काळ होता व ठरला देखील. यासाली सचिनने एक दिवसीय सामन्यात एकूण 9 शतके व कसोटी सामन्यात 3 शतके मारली व तिथून त्याचे नाव वाऱ्यासारखे पसरू लागले व आजच्या काळात सचिन तेंडुलकर एक क्रिकेटचा देवता म्हणून देखील ओळखला जात आहे
सचिनला क्रिकेटमध्ये एवढ मोठ कुणी केल
सचिन तेंडुलकरला सर्व क्रिकेट सामन्यांमधील एक उत्कृष्ट व कौशल्य प्राप्त महान खेळाडू म्हणून ओळखले जाते आणि सचिन सांगतो की त्याला महान बनवण्याच्या मागे काही ठराविक गोष्टींचा हात आहे.
- सराव करताना एक समोर ध्येय ठेवून सराव करावा एखादा उद्देश आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून जर आपण सराव केला तर त्यामध्ये आपलं लक्ष केंद्रित व्हायला मदत होते आणि त्यासाठी आपण मेहनत घेणं हे गरजेचे आहे.
- त्यानंतर आपल्या खेळासाठी आपण शिस्तबद्ध राहणे हे खूप गरजेचे आहे म्हणजेच की आपल्या सरावाचे व लक्ष्याचे फोकस करून आपल्याला एक वेळापत्रक कराव्यात करावे लागेल आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे सराव हा शिस्तबद्ध पद्धतीने करावा लागेल ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्की मिळेल.
- यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपयशातून प्रत्येक खेळाडूने शिकायला पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात अपयश असतात पण आपण त्यावर कसे मात करू हे आपल्या हातात असते त्यामुळे युवा खेळाडूंनी निराश होण्याऐवजी एखादी संधी न मिळाल्यामुळे त्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे.
- यानंतर आपण कोणताही खेळ खेळत असो त्या खेळाचा आपण आदर केला पाहिजे जसा आपण आपल्या आई-वडिलांचा आदर करतो त्याचप्रमाणे खेळाचा देखील आपण आदर केला पाहिजे खेळाबद्दल एक चांगली भावना मनामध्ये ठेवण्यासाठी प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येक खेळाचा आदर हा केला पाहिजे.
एकंदरीत सांगायचे झाले तर सचिनचा सर्व युवा खेळाडूंसाठी असा एकच सल्ला आहे की प्रत्येकाने कठोर परिश्रम शिस्त आदर आणि प्रवासाचा आनंद हा घेतला पाहिजे आणि या सर्वांवर एक लक्ष केंद्रित करून सर्वात भारी बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर सचिन बद्दल सांगायचे तेवढे कमी आहे वरील सर्व माहितीही थोडक्यात आहे अधिक माहितीसाठी आपण इतर संकेतस्थळांचा देखील वापर करून माहिती प्राप्त करू शकतो.