संभाजीनगरच्या तरुणाची यशोगाथा! दहा बाय दहा च्या खोलीत केली ‘मशरूमची शेती’, कमवतोय बक्कळ नफा

Sambhajinagar farmer succes story doing mushroom farming and earning huge profit every month

Succes Story : शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रा मधील संभाजीनगर जिल्ह्यातील एका दिनेश निक्कम तरुणाने स्वतःच्या घरी 10×10 च्या खोलीत मशरूम शेती हा  प्रकल्प बनवला व त्यामधून त्याने सगळ्यांना दाखवून दिले की राहत असलेल्या खोलीतून आपण व्यवसाय कसा करू शकतो. हा व्यवसाय करताना दिनेशला कोणत्या अडचणी आल्या व त्यावर अडचणीवर त्याने कसा मात केला व तुम्ही देखिल हा व्यवसाय कसा करू शकता या संबंधित आपण आज माहिती पाहणार आहोत.

आज महाराष्ट्रा मध्ये असे अनेक तरुण आहेत की ज्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे परंतु नोकरीच्या शोधात अजूनही फिरत आहेत. अर्थातच बेरोजगार आहेत. परंतु काही तरुण असे देखील आहेत की ज्यांनी उच्च शिक्षण घेतले नाही परंतु स्वतःचा एक घर बसल्या व्यवसाय करून त्यातून चांगले पैसे कमवतात. त्यामधील आज आपण एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत जो आहे संभाजीनगर मध्ये राहणार एक ग्रामीण भागातील दिनेश निक्कम नावाचा तरुण याला सुरुवातीपासून व्यवसायामध्ये ओढ होती परंतु त्याला असा व्यवसाय हवा होता जो कमी भांडवलात करता येईल त्यामुळे त्यांनी कमी भांडवलात करता येणाऱ्या व्यवसायाचा शोध घेतला तेव्हा त्याला मशरूम शेती हा व्यवसाय सापडला.

अर्थातच मशरूम शेती म्हटलं की आपल्या डोक्यात पहिले येते की आपल्या जवळ शेड किंवा जागा असणे खुप गरजेचे आहे. परंतु दिनेश निकम या युवकाने राहत असलेल्या खोलीतच हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये मशरूम शेती करण्यासाठी टाकाऊ वस्तु पासून बेड तयार करावे लागतात यासाठी खर्च हा अगदी कमी येतो दिनेश निकम यांनी या व्यवसायाची सुरुवात अगदी 3 हजार रुपया पासून केल होती व आत्ताच्या घडीला तो 800 रुपये प्रति किलो मशरूम विक्री करत आहे व अवघ्या दोन महिन्यातच त्याने या व्यवसायातून बक्कळ पैसा कमावला

तुम्हाला जर मशरूम शेती विषयी अधिक माहिती हवी असेल किंवा हा व्यवसाय जर करायचा असेल तुम्ही या दिनेश निकम यांच्या या (8180832564) क्रमांकावर संपर्क साधु शकता 

Leave a Comment