Goat farming : संगमनेरी शेळी शेतकऱ्याला कमवून देणार पैसा,कसा व्यवसाय असेल..

Sangamneri goat will earn money for the farmer

शेळीपालन व्यवसाय : महाराष्ट्र मध्ये असंख्य व्यवसायामध्ये केला जाणारा एक प्रमुख शेती पूरक व्यवसाय म्हणजे शेळी पालन व्यवसाय व त्याच शेळी पालन व्यवसायाला भविष्यात खूप मागणी येण्याचे पशुवर्धन विभागाने माहिती दिली आहे असे का तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे या अंतर्गत नुकताच संगणनेरी सुधार प्रकल्प पार पडला, ज्यामध्ये संपूर्ण संगमनेरी शेळीपालन कसे केले जाते याबद्दल माहिती दिली ज्यामुळे या व्यवसायातून शेतकऱ्याची आर्थिक प्रगती कशी होईल याची माहिती खालील प्रमाणे दिली

आपण पाहतो की बाजारामध्ये संगमनेरी ही शेळी खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते याचे कारण असे की योग्य पद्धतीने संगोपन होत नसल्याने संगमनेरी शेळीचे बाजारामध्ये प्रमाण हे खूप कमी पाहायला मिळत आहे त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून संगमनेरी शेळीचे संगोपन कसे केले जाते यावर एक प्रकल्प घेतला.ज्यामध्ये  संगमनेरी शेळीचे शेतकऱ्यांनी संगोपन कसे केले पाहिजे कशी ती शेळी आपल्यासाठी एक फायदेशीर  ठरू शकते याबद्दल सविस्तर खालील प्रमाणे माहिती दिली

संगमनेरी शेळी ची वाढ ही खूप मोठी असते ज्यामुळे त्याचे संगोपन करणे हे खूप अवघड असते परंतु जर आपण योग्य प्रमाणे संगमनेरी शेळीचे संगोपन केले तर संगमनेरी शेळी ही दीड ते दोन लिटरचे दूध आपल्याला प्रति दिवस देते ज्याचे बाजारामध्ये भाव खूप जास्त आहेत तसेच संगमनेरी शेळीच्या दुधापासून पावडरचे दूध देखील बनवले जाते तसेच संगमनेरीच्या शेळ्याच्या दुधापासून साबण देखील बनवले जाता

संगमनेरी शेळी ही वर्षभरात साधारणपणे 26 किलो पर्यंत वाढते तसेच संगमनेरी शेळीचा बोकड हा 30 ते 65 किलो पर्यंत वाढतो त्याचा बाजारामध्ये शेतकऱ्याला खूप मोठा भाव देखील मिळतो तसेच संगमनेरी शेळीला पाच पर्यंत कराडांची संख्या आहे, त्यामुळे जर आपण शेळीपालन व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर संगमनेरी शेळी ही आपल्यासाठी एक सर्वात जास्त नफा कमवून देणारी शेळी असणार आहे

Leave a Comment