सरपंच व उपसरपंच पगार वाढ झाली | sarpanch salary in maharashtra

मित्रांनो जर तुम्ही सरपंच किंवा उपसरपंच असाल किंवा तुम्हाला तुमच्या गावांमध्ये सरपंच किंवा उपसरपंच बनायचे असेल तर या पदासाठी सरकार मार्फत किती वेतन पगार दिला जातो ते आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत

arpanch salary in maharashtra

सरपंच पगार किती असतो

मित्रांनो गावचा सरपंच या पदासाठी जो शासनाकडून पगार दिला जातो तो पगार हा गावातील लोकसंख्येला आधारित पगार दिला जातो

लोकसंख्या वेतन
0 ते 2000 लोकसंख्या ग्रामपंचायतीलादरमहा 3000 रुपये
2000 ते 8000 लोकसंख्या ग्रामपंचायतीलादरमहा 4,000 रुपये
8,000 पेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामपंचायतीलादरमहा 5,000 रुपये

वरील पगारवाढ शासन निर्णय हा 20 जुलै 2021 चा आहे त्या शासन निर्णयास अनुसार वरील पगार हा गावातील सरपंच पदासाठी दिला जातो

उपसरपंच पगार किती आहे

लोकसंख्या वेतन
0 ते 2000 लोकसंख्या ग्रामपंचायतीलादरमहा 1,000 रुपये
2000 ते 8000 लोकसंख्या ग्रामपंचायतीलादरमहा 1,500 रुपये
8,000 पेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामपंचायतीलादरमहा 2,000 रुपये

ग्रामपंचायत सदस्य पगार किती असतो

मित्रांनो शासनाकडून ग्रामपंचायत मध्ये असलेल्या सदस्यांना दर महिना पगार दिला जात नाही परंतु दर महिन्याच्या ज्या मासिक मीटिंग असतात त्या मिटींगला जर सदस्यांची उपस्थिती राहिली तर त्यांना मासिक भत्ता म्हणून 200 रुपये दिले जातात

ग्रामपंचायत ची स्थापना कशी होती

  मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना ही गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते

  • ज्या गावात 1,500  पर्यंत लोकसंख्या आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत चे सात सदस्य नेमले जातात
  • ज्या गावात 3,000 पर्यंत लोकसंख्या असते त्या गावांमध्ये नऊ ग्रामपंचायत सदस्य नेमण्यात येतात
  • ज्या गावात 4,500 लोकसंख्या असते त्या गावांमध्ये एकूण 11 ग्रामपंचायत सदस्य नेमले जातात
  • ज्या गावा मध्ये 6,000 लोकसंख्या असते त्या गावांमध्ये एकूण 13 सदस्य नेमण्यात येतात
  • ज्या गावांमध्ये एकूण 7,500 लोकसंख्या असते त्या गावांमध्ये 15 सदस्य ग्रामपंचायत मार्फत नेमण्यात येतात

अश्या वरील पद्धतीने लोकसंख्येवर आधारित ग्रामपंचायत ची स्थापना किंवा एक आराखडा तयार केला आहे ज्या मार्फत सदस्यांची निवड केली जाते

Leave a Comment