सेंद्रिय शेती माहिती | sendriya sheti project in marathi

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये दरवर्षी अनेक पिकाची लागवड करत असतो तर त्या पिकाच्या लागवडीसाठी व वाढीसाठी अनेक प्रकारची आपण खते किंवा रासायनिक औषधे वापरत असतो, तर सेंद्रिय शेतीमध्ये अशा सर्व खतांचा किंवा रासायनिक औषधांचा वापर केला जात नाही त्यामुळे आपल्या पिकासाठी आपल्याला नैसर्गिक रित्या प्राप्त खते किंवा औषधे किंवा घरगुती निर्माण खते किंवा औषधे ही आपल्या लागवडीसाठी किंवा पिकासाठी वापरावी लागतात किंवा याचा वापर काही लोक करतात त्याला सेंद्रिय शेती असे म्हणतात.

sendriya sheti

सेंद्रिय शेतीचे फायदे

  • शेतकरी मित्रांनो आपल्या पूर्वजनांच्या काळापासून जर आपण पाहिलं तर तेव्हापासून सेंद्रिय शेतीनेच पीक घेतलं जात होतं. परंतु आधुनिक काळामध्ये खूप सार्‍या रासायनिक घटकांचा व औषधांचा वापर खुप सारे शेतकरी हे करत आहेत. त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी मनुष्याच्या शरीरावर होत आहे  तर तो पूर्णपणे टाळण्यास सेंद्रिय शेती मदत करत आहे, तर प्रत्येक शेतकऱ्याने जर सेंद्रिय शेती केली तर त्याचा फायदा संपूर्ण लोकांना होईल.
  • यानंतर जर आपण ही सेंद्रिय शेती केली तर याने आपला खर्च हा कमी होणार आहे म्हणजेच की ज्या आपल्याला रासायनिक खतांची किंवा औषधांची पीक घेण्यासाठी गरज भासते त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च हा वाढतो. तर तो खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती केली पाहिजे.
  • त्याचबरोबर या सेंद्रिय शेतीमुळे आपले व आपल्या शेतीचे आरोग्य हे चांगले राहणार आहे, असं कसं तर जे आपण रासायनिक खतांचा किंवा औषधांचा वापर आपल्याला पिकावरती करतो त्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम हा आपल्या जमिनीमध्ये त्याच बरोबर आपल्या शरीरावर होत असतो तो टाळण्यासाठी आपण ही शेती केली पाहिजे.
  • यानंतर या सेंद्रिय शेतीमुळे जे आपण उत्पादन घेणार ते संपूर्णपणे ऑरगॅनिक उत्पादन असणार आहे त्यामुळे आपल्याला त्या उत्पादनाच्या मार्केटला भाव देखील जास्त मिळणार आहे.

सेंद्रिय शेती कशी केली जाते

  • शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेती ही नैसर्गिक खतांचा वापर करून केली जाते म्हणजेच की या शेतीमध्ये आपण शेणखत,गांडूळखत,लेंडी खत, अशा असंख्य प्रकारच्या नैसर्गिक खतांचा वापर आपण करणार आहोत, परंतु हे खत आपल्याला आपल्या शेतामध्ये प्रति एकर तीन टनच्या आसपास तसेच चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत किंवा लेंडी खत अशा प्रकारची खते आपल्याला वापरायची आहेत.
  • तसेच यानंतर आपण आपल्या शेतामध्ये हिरवळीचे खते टाकतो म्हणजेच की आपण वेगवेगळे हिरवळीची पिके तर पाहिलीच असतील म्हणजे ताग,चवळी या प्रकारची हिरवळीची पिके आपल्याला आपल्या शेतात घ्यायची आहेत, आणि अशा हिरवळीच्या पिकांना फुल येईपर्यंत आपल्याला वाढवायचे आहे आणि फुल आल्यानंतर ती पिके आपल्या शेतामध्ये आपल्याला गाडून टाकायची आहेत. यामुळे आपल्या शेताला चांगल्या प्रकारचे हिरवळीचे खत म्हणजे सेंद्रिय खत प्राप्त होते त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता वाढते.( हे तुम्ही मे आणि 20 जून महिन्याच्या कालावधीत करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये गाडू शकता आणि जर तुमच्याकडे पाण्याचा साठा चांगला असेल तर तुम्ही हे करू शकता)
  • यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडे कोंबडी खत असेल तर ते आपण पाचशे किलोच्या आसपास आपल्या शेतामध्ये टाकू शकतो परंतु टाकण्याआधी आपल्याला ते खत एक दोन वेळा वर खाली करून मिसळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामधील उष्णता ही बाहेर पडेल आणि त्यानंतरच आपल्याला ते खत आपल्या शेतामध्ये टाकायचा आहे.
  • शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची सेंद्रिय खते जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकली तर नक्कीच तुमच्या पिकाला चांगलं उत्पादन प्राप्त होईल आणि उत्पादन वाढीस देखील मदत होईल आणि त्याचबरोबर एक व्यवस्थित खत व्यवस्थापन तुमच्या पिकाला होईल.
  • याचबरोबर शेतकरी मित्रांनो वेगवेगळे कृषी अधिकारी किंवा कृषी शास्त्रज्ञ सांगतात की सेंद्रिय शेती करताना आपण वेगवेगळे जिवाणू देखील आपल्या शेतामध्ये सोडू शकतो, ज्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू, स्फुरद विरघळणारे जिवाणू, किंवा पालाश वहन करणारे जिवाणू असतील अशा प्रकारच्या जिवाणूंचा सेंद्रिय शेतीमध्ये आपण वापर करू शकतो.

सेंद्रिय शेती का केली पाहिजे

शेतकरी मित्रांनो आजच्या घडीला तुम्ही पाहतच असाल की खूप सार्‍या शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस कुठे ना कुठेतरी एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे म्हणजेच की आपण पाहतच असाल की जर एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात एखादं दोन गोणी खत टाकलं, तर दुसरा शेतकरी ते पाहून त्याच्या शेतामध्ये चार गोणी खत टाकतो त्याला असे वाटते की त्याच्यापेक्षा जास्त खत जर मी माझ्या शेताला टाकले किंवा पिकाला टाकते तर माझं उत्पादन हे त्याच्यापेक्षा जास्त होईल, परंतु अशा गैरसमजामुळे शेतकरी हा त्याच्या उत्पादनाचं नुकसान करतच आहे परंतु त्यामध्ये त्याच्या शेतीच देखील नुकसान करत आहे असं कस काय तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण रासायनिक खतांचा व औषधांचा वापर गरजेपेक्षा जास्त आपल्या शेतामध्ये करतो तेव्हा कुठे ना कुठेतरी त्याचा परिणाम हा आपल्या जमिनीला होत असतो काही शेतकरी तर असे पाहायला मिळतात की जमिनीतील मातीची व पाण्याचे कृषी लॅब मध्ये तपासणी न करता दुसऱ्याचे पाहून आपल्या जमिनीला देखील खत देण्यास खूप प्रमाणात सुरुवात करतात ज्यामुळे कुठे ना कुठे भविष्यात त्यांना त्या खतासाठी जास्त पैसे मोजावे लागतात आणि त्यांना उत्पादन देखील कमी स्वरूपाच होत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने खतांचा वापर करण्याआधी आपल्या जमिनीमधील मातीची व पाण्याची टेस्ट ही कृषी लॅब मध्ये करून घ्यावी आणि त्यानंतरच आपल्या जमिनीत जे अवशेष कमी असतील त्यानुसार खतांच व्यवस्थापन कृषी अधिकाऱ्याच्या मदतीने करावे.

रासायनिक खते का वापरली नाही पाहिजे

शेतकरी मित्रांनो आपण जे बाजारामधील रासायनिक खते आपल्या शेतीमध्ये वापरतो तर त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी आपल्या शेतावर पिकावर आणि उत्पादनात होत असतो जर आपण त्या खतांची माहिती जर व्यवस्थितपणे वाचली तर आपल्याला हे आढळून येईल की, 50 किलोच्या खताच्या गोणीमध्ये 3.4% नत्र असतं,5.6% स्फुरद,8.7% पालश या तीनही घटकांची जर आपण एकूण बेरीज केली तर 20 टक्के च्या अधिक बेरीज होत नाही. म्हणजेच की या 50 किलोच्या पोत्यामध्ये जे जमिनीला आवश्यक घटक भासतात ते 20% च्या अधिक नाहीत. त्यामुळे त्याचा फायदा कंपन्यांना होत आहे व यामध्ये आपल्यासारख्या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कारण की 50 किलोच्या पोत्यात जर जमिनीला लागणारे घटक 20 टक्केच असतील तर त्याचा फायदा आपल्याला होणार नाही. त्यामुळे अशा खतांपासून दूर राहण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती केली पाहिजे ज्यामध्ये आपलं कोणतेही प्रकारचे नुकसान नाही नुसता फायदाच फायदा आहे.

सेंद्रिय शेतीवर विश्वास नसेल तर हा प्रयोग करून पहा

प्रयोग करण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला शेळ्यांच्या लेंड्या घ्यायच्या आहेत. आणि त्या शेळ्यांच्या लेंड्यांची पावडर आपल्याला तयार करायची आहे आणि तयार केलेली पावडर आपल्याला कृषी लॅब मध्ये घेऊन जायची आहे. आणि जेव्हा आपण ती पावडर लॅब मध्ये टेस्ट करू तर त्यामध्ये आपल्याला नत्र,पालश,स्फुरद आणि फॉस्फेटिक ऍसिड यांचं 100% प्रमाण तुम्हाला आढळून येईल. म्हणजेच सांगायचं झालं तर शेळ्यांच लेंडी खत हे शेतीसाठी एक उत्तम व उपयुक्त खत आहे, त्याचबरोबर गाई म्हशींच शेणखत हे देखील शेतीसाठी उत्तम खत आहे आणि यानंतर सर्व शेतकऱ्याकडे असणारे कोंबड खत हे देखील शेतीसाठी एक उत्तम खत आहे आणि या तिन्ही खतांचा संगम करून जर आपण आपल्या पिकासाठी खत व्यवस्थापन केलं किंवा शेतीसाठी केल तर ते नेहमीच आपल्यासाठी फायदेशीर आहे. कारण की प्रत्येकाच्या जमिनीमध्ये काही सूक्ष्मजीवाणू असतात ते त्या जमिनीची सुपीकता वाढवत असतात परंतु आत्ताच्या नवीन तंत्रज्ञानामुळे किंवा रासायनिक खतामुळे जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीव नष्ट होत चालले आहे त्यामुळे जमीन हे पुढील काळात खूप धोक्यात येणार आहे यामुळे आपण सर्वांनी सेंद्रिय शेतीकडे आत्ताच वळले पाहिजे व आपले भविष्य एक चांगले बनवले पाहिजे.

Leave a Comment