शार्दुल ठाकूर पुन्हा 4 कोटी ला चेन्नई सुपर किंग संघामध्ये दाखल.. महेंद्रसिंग धोनी काय म्हणला.

shardul thakur sold in chennai super kings team

Ipl 2024 auction : शार्दुल ठाकूर मागच्या वर्षी कोलकत्ता नाईट रायडर या संघाकडून खेळत होता परंतु पाहिजे तशी त्याच्याकडून कामगिरी पाहायला मिळाली नाही त्यामुळे यावर्षी आयपीएल 2024 च्या लिलावामध्ये कोलकात्याच्या संघाने शार्दुल ठाकूर विकण्यास काढला होता व तो विकला देखील गेला आणि तो चेन्नई सुपर किंग या संघाने अवघ्या चार कोटी रुपयाला घेतला 

जसे की तुम्हाला माहित असेल की याआधी सुद्धा चेन्नई सुपर किंग या संघाने शार्दुल ठाकूरला चेन्नई या संघात घेतले होते त्यावेळी चेन्नई सुपर किंग ने 2.6 करोडला शार्दुल ठाकूरला चेन्नई सुपर किंग या संघात घेतले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा शार्दुल ठाकूरला लीलावत विकले व त्या लिलावामध्ये दिल्ली कॅपिटल्स या आयपीएल संघाने शार्दुल ठाकूरला 10.75 करोडला घेतले आणि त्यावेळेस देखील शार्दुल ठाकूर ची खेळी दिल्ली संघाकडून पाहायला मिळाली नाही व दिल्लीने पुन्हा त्याला आयपीएल 2023 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स या संघाला 10.75 करोडला विकले व त्यानंतर यावर्षी आयपीएल 2024 लिलावामध्ये चेन्नई सुपर किंग या संघाने पुन्हा शार्दुल ठाकूरला त्यांच्या संघामध्ये घेतले आहे

 सर्व चेन्नई सुपर किंग च्या व महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांच्या मनामध्ये आता एकच प्रश्न उठला आहे की पुन्हा एकदा शार्दुल ठाकूर चेन्नई सुपर किंग संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो की नाही तसेच खूप सारे चेन्नई सुपर किंग संघाचे चाहते सोशल मीडियावर शार्दुल ठाकूरला शुभेच्छा देखील देत आहेत व त्याच शुभेच्छांचा मान ठेवून शार्दुल ठाकूर येथे आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग संघासाठी चांगली कामगिरी करेल असे देखील वक्तव्य खूप लोकांकडून येत आहे

Leave a Comment