सोने तारण कर्ज | gold loan information in marathi

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की सोने तारण कर्जा बद्द्ल संपूर्ण माहिती. दैनंदिन जीवनात अनेक लोकांना आर्थिक परिस्थितीची गरज भासवण्यासाठी पैशाची गरज असते. त्यामुळे खूप सारी लोक कर्ज काढत असतात आणि हे कर्ज ते त्यांच्याजवळ असणाऱ्या सोन्यावर काढतात. त्यामुळे आज आपण माहिती पाहणार आहोत की सोन्यावर कर्ज कसे काढले जाते आणि कोणत्या बँक सोन्यावर कर्ज दिल्यावर कमी व्याजदर आकारतात. आणि तसेच कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती दिवसांसाठी आपल्याला हे कर्ज मिळते. आणि जर एखाद्या व्यक्तीने ते कर्ज भरले नाही तर बँक किती दिवसांनी आपले सोने विकते या संबंधित संपूर्ण माहिती यामध्ये आपण पाहणार आहोत.

सोने तारण कर्ज कसे घ्यायचे

मित्रांनो सोनेतारण कर्ज हे आपल्याला दोन प्रकारांमध्ये दिले जाते एक म्हणजे कृषी आणि दुसरं म्हणजे बिगर कृषी अशा दोन प्रकारांमध्ये कर्ज हे दिले जाते कृषी म्हणजे ज्यामध्ये शेतकरी व जी लोक शेती करतात अशी लोक येतात.आणि दुसरं म्हणजे बिगर कृषी यामध्ये अशी लोक येतात जी शेती नाही करत एखादा व्यवसाय,नोकरी किंवा इतर धंदा करतात अशी लोक येतात.

  • आपण जर शेतकरी असाल आणि आपल्याला जर सोने तारण वरती कर्ज घ्यायचे असेल. तर तुम्हाला बँकेच्या सरासरी व्याजापेक्षा थोडं कमी व्याज बँक तुम्हाला देते. त्यासाठी तुम्हाला जमिनीचे कागदपत्रे हे बँकेत दाखवावे लागतात.
  • यानंतर आपण जर नोकरदार असाल किंवा व्यवसायिक असाल आणि तुम्हाला जर सोने ठेवून कर्ज हवे असेल तर बँकेच्या चालू व्याजदराप्रमाणे तुम्हाला सोने ठेवून कर्ज दिले जाईल.

सोने तारण कर्ज किती मिळते

  • कोणतीही बँक आपल्याला सोने तारण ठेवीवर 75% टक्के इतके कर्ज देते. म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही बँकेमध्ये 1 लाख रुपयाचे सोने ठेवले तर बँक तुम्हाला त्याच्या बदल्यात 75 हजार रुपयांचे कर्ज देईल. बँक कमीत कमी 10 हजार रुपयाचे कर्ज आपल्याला देते आणि जास्तीत जास्त 1 करोड पर्यंत कर्ज देते
  • कर्ज आपल्याला सोन्याच्या चालू भावावरती मिळेल म्हणजेच जेव्हा तुम्ही सोन घेऊन बँकेमध्ये जाल तेव्हा ती बँक सर्वप्रथम सोनाराला बोलवेल आणि तुमचं सोना असली आहे काही पहिले चेक करण्यात येईल त्यानंतर त्या सोन्याचा चालु भाव काय आहे तो पाहण्यात येईल आणि त्यानंतर मग त्या सोन्याच्या चालु भाव वरती तुम्हाला 75 टक्के कर्ज दिले जाईल. आणि हे तुमचं सोन बँक एका पिशवीत ठेवून बँकेचे लॉकर मध्ये ठेवेल. आणि त्याची तुम्हाला एक पावती देखील दिली जाईल ती पावती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही तुमचे सोने तारण सोडवायला जाल तेव्हाही पावती तुम्हाला लागेल. आणि जर तुमच्याकडे पावती नसेल तर बँक तुमच्याकडून 500 रुपयांचा अधिक दंड घेते.

सोने तारण कर्ज किती दिवसासाठी मिळते

सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला जर सोनेतारण कर्ज हवे असेल तर कोणतीही बँक हे कर्ज फक्त कमीत कमी तीन महिन्यासाठी आणि जास्तीत जास्त एक वर्षासाठी आपल्याला देते.

सोने तारण कर्ज व्याजदर

मित्रांनो सोनेतारण कर्ज व्याजदर हे 7 ते 7.5% टक्के प्रत्येक सरकारी बँकेकडून आकारले जाते यामध्ये जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला थोडीफार सवलत देखील दिली जाते. आणि सोने कारण कर्ज हे आपण सरकारी बँकेकडूनच घेतले पाहिजे खाजगी बँकेचे व्याजदर हे खूप जास्त असते त्यामुळे खालील सरकारी बँकेकडून आपण सोन्यावरती कर्ज घेतले पाहिजे.

  • ग्रामीण बँक महाराष्ट्र (6%टक्के )
  • बँक ऑफ महाराष्ट्र (7.70%टक्के )
  • कॅनरा बँक (7.60% टक्के )
  • आयडीबीआय बँक (7.02% टक्के)
  • पंजाब अँड सिंध बँक (7.60% टक्के)
  •  स्टेट बँक ऑफ इंडिया (7.50%टक्के )
खाजगी बँक सोने कर्ज व्याजदर
  • कोटक महिंद्रा बँक (10% टक्के )
  • एचडीएफसी बँक (12% टक्के)
  • ॲक्सिस बँक (12% टक्के )
  • आय सी आय सी बँक (12% टक्के )

वरील काही खाजगी बँकांचे सोनेतारण वरती व्याजदर आहे असे की आपण पाहू शकता त्यामुळे आपण सरकारी बँकेकडूनच कर्ज घेतलेले बरे.

कर्ज भरले नाही तर बँक आपले सोने तारण किती दिवसात विकते

  • मित्रांनो जर समजा तुम्ही एक वर्षासाठी सोन ठेवून कर्ज घेतले आणि कर्जाची एक वर्षाची मुदत संपल्यावर जर तुमच्याकडे  घेतलेले कर्ज व त्यावर झालेले व्याजदर भरण्यासाठी पैसे नसतील तर तुम्हाला अजून दहा दिवसाचा कालावधी हा वाढवून देण्यात येतो आणि तरीसुद्धा तुम्ही कर्ज भरले नाही तर तुम्हाला बँकेकडून एक दहा दिवसांची अजून नोटीस देण्यात येते आणि तेव्हा देखील जर तुम्ही ते कर्ज व व्याज भरले नाही तर त्यानंतर बँक कोणत्याही क्षणी तुमचं सोन जे आहे  ते लिलावामध्ये विकू शकते व बँकेचे नुकसान भरून काढू शकते. आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला 185 दिवसाची अजून वेळ वाढवून दिली जाते.
  • आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील तर यावर अजून एक बँक मार्ग तुम्हाला देते तो म्हणजे जर तुम्ही एक लाख रुपयाचे सोन्यावरती 75000 चे कर्ज घेतले असेल आणि कर्जाची मुदत संपल्यानंतर तुमच्याकडे भरण्यासाठी 75 हजार रुपये नसतील तर तुम्ही ते रिन्यू करू शकता म्हणजेच की त्या संपूर्ण वर्षाचा तुम्ही जर व्याज बँकेला भरला तर तुमचं कर्ज हे पुन्हा पहिल्यापासून रिन्यू होतं त्यामुळे तसं तुम्ही करू शकता व अजून काही वर्ष या कर्जाचा वापर तुम्ही करू शकता

Leave a Comment