कमी खर्चातील उन्हाळी सोयाबीन लागवड | soybean lagwad

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांमधील सर्वात महत्त्वाच पीक म्हणजे सोयाबीन परंतु प्रत्येक शेतकऱ्याला सोयाबीन लागवडीसाठी खूप खर्च हा येत असतो त्यामुळे आज आपण कमी खर्चात सोयाबीन लागवड कशी करता येईल याबद्दल माहिती पाहणार आहोत तर खालील संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थितपणे वाचा.

soybean lagwad

लागवडीसाठी कोणती जमीन पाहिजे

शेतकरी मित्रांनो उन्हाळी सोयाबीन पिकासाठी आपल्याला जमीन ही काळ्या स्वरूपाची खोलवर असणारी त्याचबरोबर कचदार स्वरूपाची जमीन पाहिजे आणि त्या जमिनीचा सामु 6/7 असायला पाहिजे. तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.5 ते 0.6 असा असला पाहिजे. त्याचबरोबर जमीन ही पाणी धरून ठेवणारे असायला पाहिजे तसेच जमिनीमध्ये पाण्याचा निचरा हा चांगल्या प्रकारचा झाला पाहिजे.

उन्हाळी सोयाबीन बियाणे

खालील नऊ ते दहा उन्हाळी सोयाबीन बाणे सांगितले आहेत त्यामध्ये आपण कोणतेही बाण हे लागवडीसाठी वापरू शकतो आपल्या घरचे बाण असले तरी आपण लागवडीसाठी ते वापरू शकतो असं नाही की यामधीलच तुम्ही बाण वापरा जे बाण तुम्हाला योग्य उत्पादन देईल त्याची माहिती घेऊन तुम्ही ते बाण वापरू शकता आपल्या जवळपासचे शेतकरी कोणते बाण वापरता हे ठरवून आपण बाण घेऊ शकता.जेएस 20-116,जेएस 20-29,जेएस 20-69,जेएस 93-05,जेएस 335, केडीएस -753,केडीएस726, एमएयुएस 612,एमएयुएस 158, पीडीकेव्ही अंबा (एएमएस 100 -39), सुवर्ण सोया (एएमएस-एमबी 5-18)

पेरनी कधी करयची

  • शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरणी करायच्या आधी आपल्याला शेतामध्ये बीज प्रक्रिया करायचे आहे त्यामुळे बीज प्रक्रिया मध्ये आपण ट्रायकोडर्मा व्हीरीडी 10 मिली किलो प्रति किलो बियान टाकयच आहे.
  • उन्हाळी सोयाबीनची पेरणी ही 30 डिसेंबर ते 15 जानेवारीच्या दरम्यान करायची आहे पेरणी झाल्यानंतर वातावरण उष्ण होते म्हणजेच ऊन वाढण्यास सुरुवात होते आणि हे ऊन वाढल्यानंतर फुले गळणे व त्यामुळे शेंगा कमी येणे आणि त्याचे नुकसान आपल्याला उत्पादनात होते आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे या पंधरा दिवसात जर तुम्ही पेरणी केली तर त्यानंतर जो वळवाचा पाऊस होतो त्यामुळे आपले सोयाबीनचे पीक चांगले राहते व भुसा देखील चांगला राहतात आणि जर तुम्ही उशिरा पेरणी केली तर वाढत्या तापमानामुळे सोयाबीन गळणे सुरू होतं म्हणजेच रोपे वाळण्यास सुरू होतात ज्याच नुकसान आपल्याला होते.
  • शेतकरी मित्रांनो उन्हाळी लागवड करत असताना लागवड ही आपल्याला दीड फूट अंतरावर करायची आहे किंवा आपण दोन रोपांतील अंतर 10 सेंटीमीटर आणि रुंदी 45 सेंटीमीटर अशी ठेवू शकता आणि तसेच खोली ही चार सेंटीमीटर इतकी घ्यायची आहे जर खोली कमी घेतली तर झाड मोठे वाढण्याची शक्यता कमी होते व त्यामध्ये आपल्याला नुकसान होते आणि प्रति एकर 22 ते 25 किलो बियाण हे उन्हाळी सोयाबीन लागवड करताना आपल्याला टाकायच आहे.
  • शेतकरी मित्रांनो पेरणी करायच्या आधी आपल्याला आपल्या बियाणाला तीन ग्रॅम प्रति किलो थायरम आणि पाच ऍम एल गावची लावायच आहे, जेणेकरून कोणतेही माशीचा किंवा किडीचा प्रादुर्भाव सोयाबीन वर होणार नाही.
  • उन्हाळी पेरणी केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये सोयाबीनची वाढ ही कमी होत असते त्यामुळे त्याला शेंगांचे प्रमाण देखील कमी लागते.

खत व्यवस्थापन

  • सोयाबीन लागवड करत असताना आपल्याला खत व्यवस्थापन हे लागवडीतपूर्वी प्रति एकर दीड बॅग 10.26.26. टाकायचं आहे आणि त्यानंतर दहा किलो गंधक म्हणजेच सल्फर टाकायचा आहे.
  • पेरणी झाल्यानंतर 21 दिवसांनी शेताला पाणी देऊन आपल्याला आपल्या सोयाबीन वरती तणनाशक हे मारायच आहे.
  • यानंतर सोयाबीन उत्पादनात वाढ होण्यासाठी व सोयाबीन वाढीसाठी आपण काही विद्राव्य खतांचा देखील वापर करणार ज्यामध्ये आपण 10.26.26 आणि 19.19.19 अश्या खतांचा वापर आपण करणार.
  • आणि यानंतर जेव्हा आपल्या झाडाला शेंगा किंवा फुले येतील तेव्हा आपल्याला 0.52.34  हे खत वापर मारायचे आहे. हे मारल्याने आपल्या झाडाची फुले गळणार नाहीत व शेंगा देखील गळणार नाहीत.
  • पेरणीनंतर 25 ते 27 दिवसांनी आपल्याला पिका वरती फवारणी घ्यायची आहे त्यावेळेस आपल्याला 13 40 13 पाच ग्रॅम अधिक चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट एक ग्राम  प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्यालाही फवारणी करायची आहे.
  • यानंतर आपल्याला दुसरी फवारणी जी घ्यायची आहे ती जेव्हा शेंगांमध्ये सोयाबीनचा दाणा हा भरत असतो तेव्हा घ्यायची आहे यामध्ये आपण 0.0.50 5ग्रॅम अधिक 1 ते दीड ग्रॅम सिवीड एक्सट्रॅक्ट हे मिश्रण प्रति लीटर पाण्यामध्ये आपल्याला आपल्या सोयाबीन पिकावरती फवारणी करायची आहे.
  • शेतकरी मित्रांनो वरील सर्व खत व्यवस्थापन जर तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकासाठी केल तरी तुमचं उत्पादन हे खूप चांगल्या प्रकारचे होईल.

पाणी व्यवस्थापण

सोयाबीन पिकासाठी पाणी व्यवस्थापन हे आपल्याला लागवडीच्या आधी संपूर्ण शेतात पाणी द्यायचं आहे, आणि त्यानंतर लागवडीनंतर चार ते पाच दिवसांनी पुन्हा आपल्याला आपलं रान भिजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इतर दहा ते बारा दिवसांमध्ये पाणी हे पिकाला द्यायच आहे आणि यानंतर जेव्हा आपल्या पिकाला फुले किंवा शेंगा येतील तेव्हा आपल्याला पाण्याचा वापर कमी करयचा आहे.

FAQ
प्रति एकर किती सोयाबीन पेरावे

उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी प्रति एकर तुम्हाला वीस ते पंचवीस किलो सोयाबीन चे बियाणे हे भरायचे आहे.

सोयाबीनसाठी चांगल्या प्रकारचे कोणते खत आहे

लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत लागणाऱ्या खतांमधील प्रमुख खत म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्तकरून लोक हे वापरतात.

Leave a Comment