मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक पगार हा जिल्हा परिषद सातव्या वेतन आयोगानुसार 25,500 कमित कमी व जास्तीत जास्त 81,100 इतका आहे.
स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक म्हणजे काय
मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक म्हणजेच याला इंग्रजी मधून (सिव्हिल इंजिनियर) असे देखील म्हणतात. आणि मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिक एक अशी शाखा आहे जी बांधकामाच्या वेळी बांधकामाचा आराखडा तयार करण्यास मदत करते व प्रत्यक्ष बांधकाम करून घेते व या शाखेतून जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांनाच स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक म्हणतात.
स्थापत्य अभियांत्रिक कोर्स कसा करावा
मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिक कोर्स म्हणजेच सिव्हिल इंजीनियरिंग आपल्याला दहावी पास चा निकालावरती देखील करता येतो संपूर्ण कोर्सचा कालावधी हा एक वर्षाचा असतो व कोर्स हा मराठी व इंग्लिश या भाषेत शिकवला जातो त्यामुळे जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या इंजीनियरिंग कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स करू शकता.
स्थापत्य अभियांत्रिक सहायक कोर्स करून कोणती नोकरी मिळवता येते
मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक कोर्स करून तुम्हाला अनेक प्रकारच्या सरकारी नोकरी साठी संधी मिळते जसे की पंचायत समिती कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय,नगर परिषद कार्यालय,नगरपालिका, महानगरपालिका,जलसंपदा नगर रचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु,पाटबंधारे रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा विभाग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, गोदावरी विकास महामंडळ, कृष्णा खोरे महामंडळ, तापी विकास महामंडळ, माढा, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, जनरल रिझर्व इंजीनियरिंग फोर्स अशा असंख्य सरकारी नोकरीसाठी तुम्हाला संधी स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक हा कोर्स करून मिळते
स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक पद पात्रता काय असते
मित्रांनो कोणत्याही सरकारी स्थापत्य अभियांत्रिक पदाच्या नोकरीसाठी लाभार्थ्याची पात्रताही अशी असते की लाभार्थ्याजवळ स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी त्याचे स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक म्हणून एक वर्षाचे शिक्षण म्हणजेच (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) होणे गरजेचे आहे
स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यकचे प्रमोशन कोणते आहेत
मित्रांनो जर तुम्ही स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक गट क या पदातून भरती झाला असाल तर तुमचे पुढील प्रमोशन हे उप विभागीय अधिकाऱ्यापर्यंत होऊ शकते.