मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकार अंतर्गत राबवली जाणारी एक योजना आहे व या योजनेचा लाभ 21 वर्षाच्या आतील मुलींनाच घेता येतो. ही योजना खास करून गरजू लोकांच्या मुलींच्या शिक्षणासाठी लग्नासाठी व आरोग्याच्या भविष्यासाठी बनलेली एक योजना आहे व या योजनेचा लाभ हा प्रत्येक गरजू पाल्याच्या मुलीला देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे या योजने संबंधित अधिक माहितीसाठी खालील दिलेला लेख संपूर्ण व्यवस्थित वाचा.
सुकन्या समृद्धी योजना काय आहे
- मित्रांनो थोडक्यात सांगायचे झाले तर सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारने मुलींसाठी राबवलेली एक योजना आहे. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाव या अभियाना अंतर्गत ही योजना महाराष्ट्रामध्ये 22 जानेवारी 2015 पासून सुरू केली आहे.
- मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही एक कमी गुंतवणुकीची बचत योजना आहे प्रत्येक पाल्याला मुलींच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी किंवा पुढील भविष्यातील लग्नासाठी पैशाची बचत ही करावी लागते त्यामुळे त्यालाच अनुसरून केंद्र सरकारने गरजू व्यक्तींच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना ही आणली आहे
- मित्रांनो सुकन्या समृद्धी कमी गुंतवणूक बचत योजनेचा लाभ हा आई वडील महाराष्ट्रा मधील कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिस मार्फत त्यांच्या मुलींसाठी लाभ घेऊ शकतात. त्यासाठी फक्त आई-वडिलांना त्या बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये एक खाते खोलावे लागेल व त्यानंतरच तुम्ही कमी बचत करुण सुद्धा एक गुंतवणूक करू शकता
- मित्रांनो सुकन्या समृद्धी कमी गुंतवणूक बचत योजनेअंतर्गत तुम्ही ज्यापण बँकेत किंवा पोस्टामध्ये खाते उघडाल. त्या खात्यामध्ये तुम्ही प्रति वर्ष कमीत कमी 250 रुपये इतकी गुंतवणूक करू शकता व जास्तीत जास्त 1.5 लाख गुंतवणूक करू शकता
- मित्रांनो तुम्ही केलेल्या गुंतवणुकी वरती तुम्हाला या योजनेअंतर्गत पोस्टाकडून व बँकेकडून व्याजदर देखील मिळणार आहे
सुकन्या समृद्धी योजना महत्त्वाच्या बाबी
- मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊन तुम्ही मुलीच्या नावावर गुंतवणूक ही फक्त मुलीच्या वयाच्या 21 वर्षापर्यंतच करू शकता
- यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेतला आणि लाभ घेतल्यानंतर जर तुम्ही मुलीचे लग्न हे 21 वय पूर्ण होण्याच्या आधी केले तर तुमचे सुकन्या समृद्धी खाते है बँकेमार्फत व पोस्टमार्फत बंद करण्यात येईल
- यानंतर मित्रांनो मुलीचे वय जर 21 वर्षे पूर्ण झाले आणि त्यानंतर जर तुम्ही मुलीचे लग्न हे केले आणि त्यानंतर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बँकेत व पोस्टात बंद नाही केले तर तुम्हाला खात्यावरती असलेल्या शिल्लक रकमेवरती बँक व पोस्टाच्या चालू व्याज दारावरती तुम्हाला व्याज दिले जाईल
- यानंतर मित्रांनो या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रति वर्ष सुकन्या समृद्धी बँकेच्या किंवा पोस्टाच्या खात्यामध्ये कमीत कमी 250 रुपये इतके टाकावे लागतील आणि जर तुम्ही ते पैसे टाकले नाही तर तुमचे खाते बंद करण्यात येईल आणि पुन्हा खाते चालू करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये इतका दंड भरावा लागेल त्यानंतरच तुमचे ते खाते चालू होईल
- यानंतर मित्रांनो या योजनेचा लाभ घेऊन जर खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्या पालकास व्याजासहित पैसे परत करण्यात येतील
- मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची एक सुरक्षित योजना आहे याचा लाभ तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी नक्कीच घेऊ शकता
- मुलीचे वय 21 झाल्यानंतर सुकन्या समृद्धी खात्यामध्ये जी रक्कम असते ती संपूर्ण रक्कम व त्याचे व्याज हे मुलीच्या पालकाच्या स्वाधीन केले जाते
सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात
- मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक ऑफलाईन पद्धतीचा अर्ज लागतो त्या अर्जाची पीडीएफ आपण इथे क्लिक करून डाऊनलोड करू शकता
- यानंतर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्माचा दाखला देखील लागणार आहे
- त्यानंतर मुलीचे व पालकांचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड किंवा पॅनकार्ड हे लागणार आहे
- यानंतर रेशन कार्ड व वीज बिल देखील लागणार आहे
- अशी काही ठराविक कागदपत्रे ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीकडे व तिच्या पालकांकडे असणे गरजेचे आहे.
सुकन्या समृद्धी योजना निवड पात्रता
- मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना सन 2021 अंतर्गत केंद्र सरकारच्या नियमानुसार या योजनेचा लाभ हा फक्त 10 वर्षातीलच मुलींना मिळू शकतो किंवा घेता येणार आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या मुलीचे वय हे 10 वर्षा आतील असावे
- यानंतर मित्रांनो एका पालकाला जर दोन मुली असतील तर तो पालक दोघींसाठी देखील बचत खाते सुरू करू शकतो
- एवढीच या योजनेसाठी पात्रता आहे या पात्रतेमध्ये जर तुम्ही पात्र होत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज नक्कीच करू शकता
सुकन्या समृद्धी योजना गुंतवणूक व्याजदर
मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत लाभार्थ्याच्या गुंतवणुकीच्या रकमेवर व्याजदर हा केंद्र सरकारच्या नियमानुसार 7.6% इतका दिला जातो
सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करायचा
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रा मधील तुमच्याजवळ असणाऱ्या ठिकाणच्या पोस्टामध्ये किंवा बँकेमध्ये जाऊन या योजनेसंबंधीत माहिती देऊन संबंधित अधिकाऱ्याकडून या योजनेसाठी अर्ज करून तुम्ही घेऊ शकता व या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
FAQ
सुकन्या समृद्धी योजना गुंतवणूक व्याजदर किती आहे
मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या गुंतवणुकी वरती व्याजदर हे 7.5% इतके दिले जाते
सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते कोणाच्या नावावर खोलावे
मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे खाते हे मुलीच्या नावाचे असावे
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय किती पाहिजे
मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय हे दहा वर्षातील असावे तरच या योजनेचा तिला लाभ घेता येतो