कृषी अधिकारी वेतन | taluka krushi adhikari salary

कृषी अधिकाऱ्यांमध्ये जर आपण तालुका कृषी अधिकारी याचं जर वेतन पाहिलं तर तालुका कृषी अधिकाऱ्याचा पगार हा किमान ४१ हजार ५०० ते जास्तीत जास्त १,३२,००० हजार इतका असतो. आणि याच बरोबर या वेतनामध्ये महागाई प्रमाणे दरवर्षी शासनाच्या आयोगा नुसार थोडी थोडी वाढ ही होत असते त्यामुळे पगारामध्ये देखील दर वर्षी वाढ ही होत असते.

तालुका कृषी अधिकारी पद माहिती

मित्रांनो तालुका कृषी अधिकारी हे पद तालुक्याच्या ठिकाणी कृषी विभागाचं एक प्रशासकीय प्रमुख पद म्हणून त्या ठिकाणी ते कार्यरत व कामकाज करत असतात आज आपण त्यांच्या कामकाजाविषयी व तालुका कृषी अधिकारी या पदा विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो प्रत्येक तालुक्याला तालुका कृषी अधिकारी हे कार्यरत असतात त्यांना डी ए ओ म्हणजेच तालुका एग्रीकल्चर ऑफिसर या पद नावाने सुद्धा ओळखलं जाते.मित्रांनो कृषी सहाय्यक हा आठशे ते हजार अशा कुटुंबांना मिळून एक कृषी सहाय्यक हा नेमण्यात येतो म्हणजेच मित्रांनो चार ते पाच गावांसाठी त्या ठिकाणी एक कृषी सहाय्यक शासनाकडून नियुक्त करण्यात येत असतो आणि त्या कृषी सहाय्यकाच वेतन हे किमान २५,००० हजार ते जास्तीत जास्त ८१,००० हजार इतक असत आणि  हे सहा कृषी सहाय्यक मिळून त्यांचं एक पर्यवेक्षकीय क्षेत्र तयार होतं आणि या सहा कृषी सहाय्यकांवर पर्यवेक्षण करण्यासाठी एक कृषी पर्यवेक्षक नेमण्यात येतो आणि तो पर्यवेक्षक हा जे कृषी सहाय्यक असतात त्यांचंच प्रमोशन हे कृषी पर्यवेक्षक म्हणून केलं जात असत आणि दोन कृषी पर्यवेक्षक हे एकूण बारा कृषी सहाय्यकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे मंडळ कृषी अधिकारी हे नेमण्यात येतात. हे मंडळ कृषी अधिकारी पद एमपीएससी मार्फत भरले जाते. तर मित्रांनो हे मंडळ कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांचे जे तालुका स्तरावर कंट्रोलिंग असतात म्हणजेच यांचे जे साहेब असतात त्यांनाच तालुका कृषी अधिकारी असे म्हणतात.

तालुका कृषी अधिकाऱ्याची काम 

तालुका कृषी अधिकारी याच जर आपण काम पाहिलं तर यांचं काम हे शेतकऱ्यांना विविध अशा योजनेची माहिती देणे त्याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये कृषी विस्तार किंवा कृषी संसाधने असतील याबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती पुरवणे तसेच शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन करणे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे विविध ठिकाणी मिळावे देखील आयोजित करणे हे काम तालुका कृषी अधिकाऱ्याच असत त्याचबरोबर तालुका कृषी अधिकाऱ्याचं सर्वात महत्त्वाचं काम जर आपण पाहिलं तर जेव्हा अतिवृष्टी होते किंवा गावागावांमध्ये अतिवृष्टीचा किंवा कोरडा जेव्हा दुष्काळ पडतो तर त्यावेळेस जे अतिवृष्टीचे पंचनामे असतात तर हे सर्व पंचनामे तयार करण्याचे काम महसूल विभागातील तलाठी आणि कृषी विभागातील कृषी सहाय्यक हे करत असतात.अशी कामे तालुका कृषी अधिकारी करत असतो.

कृषी अधिकारी पदे व वेतन | Krushi Adhikari Salary

खालील तक्त्यामध्ये तुम्हाल सर्व कृषी अधिकारी पदे व त्यांचे वेतन पहायला भेटेल.

कृषी अधिकारी पद वेतन सुरवातीचे वेतन 
कृषी अधिकारी वेतन (पगार)Rs.३८,३०० ते १,१२,०००  ३८,३००
तालुका कृषी अधिकारी वेतन (पगार)Rs. ४१,००० ते १,३२,०००  ४१,०००
कृषी सहाय्यक वेतन (पगार) Rs. २५,००० ते ८१,००० २५,०००
मंडळ कृषी अधिकारी वेतन (पगार)Rs. ३६,२०० -१,१४,८०० ३६,२००

FAQ

कृषी अधिकारी कसे बनायचे

कृषी अधिकारी बनण्यासाठी तुम्ही अकरावी व बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर एका कृषी महाविद्यालयात बीएससी ऍग्री किंवा एग्रीकल्चर इंजीनियरिंग अशा विभागात तीन वर्षाची पदवी घेतल्यानंतर तुम्ही वय 21 ते 31 या वयामध्ये कृषी अधिकारी होण्यासाठी अर्ज भरू शकता आणि अर्ज भरल्यानंतर आपण लेखी परीक्षेसाठी पात्र होतो.केव्हा केव्हा कृषी सहाय्यक पदे ही सरळसेवेने सुद्धा भरली जातात कृषी सहाय्यक पदाची निवड ही संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने मराठी या भाषेतून परीक्षा घेऊन उत्तीर्ण उमेदवारांची निवड करण्यात येते आणि लेखी परीक्षेमध्ये जर आपण उत्तीर्ण झालो तर त्यानंतर आपल्याला मुलाखतीसाठी बोलवले जाते त्या मुलाखतीत आपली जर चांगली कामगिरी पाहायला भेटली तर आपली कृषी अधिकारी पदासाठी निवड केली जाते.

कृषी अधिकारी पात्रता

कृषी अधिकारी बनण्यासाठी वय 21 ते 31 असावे व बीएससी ऍग्री किंवा एग्रीकल्चर इंजीनियरिंग असणे गरजेचे आहे. अर्जदाराला कृषी संबंधित शेती विषयी माहिती असणे गरजेचे आहे त्याचबरोबर अर्जदार हा कृषी क्षेत्रातील शिक्षणातून पदवीधर असावा.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय

आपण जर शेतकरी असाल आणि आपल्याला जर तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुठे आहे हे माहीत नसेल तर आपण मोबाईल मध्ये असणाऱ्या गुगल मॅप च्या साह्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालय अवघ्या दोन मिनिटात शोधू शकता सर्वप्रथम आपल्याला मोबाईल मध्ये गुगल मॅप या ॲप वरती जायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपलं लोकेशन कुठे आहे ते जाणून घ्यायचे आहे आणि त्यानंतर वरती सर्च या आयकॉन वरती क्लिक करून आपल्याला तिथे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय असे टाकून सर्च करायचे आहे आणि सर्च केल्यानंतर आपल्याला गुगल मॅप वरती आपल्या जवळपास असलेले तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे पाहायला भेटेल.

तालुका कृषी संपर्क | taluka krushi adhikari contact number

आपण जर शेतकरी असाल आणि आपल्याला जर तालुका कृषी अधिकारी यांचा नंबर हवा असेल तर आपण गुगल वरती जाऊन आपण ज्या तालुक्यात राहतो त्या तालुक्याचे नाव टाकून आपण जर तालुका कृषी अधिकारी कार्यालय कॉन्टॅक्ट नंबर असं टाकलं तर आपल्याला गुगलवर अवघ्या एक ते दोन मिनिटात आपण ज्या तालुक्यात राहतो त्या तालुक्याच्या कृषी कार्यालयाचा संपर्क क्रमांक भेटून जाईल जिथे आपण संपर्क करू शकता.

Leave a Comment