Tata sumo देणार महिंद्रा स्कॉर्पिओ ला टक्कर, 9 लाखात बाजारामध्ये उपलब्ध होणार

tata sumo gold 2024

Tata Sumo : टाटा कंपनीची टाटा सुमो गोल्ड ही गाडी लवकरच बाजारामध्ये विकण्यासाठी दाखल होणार आहे व टाटा कंपनीच्या माहितीनुसार ही गाडी महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीला टक्कर देईल असे देखील सांगण्यात आले आहे

टाटा सुमो ही गाडी बाजारामध्ये विकण्यास येण्यासाठी असंख्य लोक वाट पाहत आहेत कारण म्हणजे ही गाडी 7 सीटर ची मोठी गाडी असणार आहे आणि जसे की तुम्हाला माहित आहे की टाटा कंपनी ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी जगातील सर्वात श्रेष्ठ कंपनी म्हणून ओळखली जाते

या गाडीमध्ये आधुनिक आर्किटेक्चर पाहायला मिळेल जे Omega Arc platform असणार आहे जे तुम्ही टाटा हॅरियर आणि टाटा एक्स यु व्ही या गाड्यांमध्ये पाहिले असेल तसाच लुक तुम्हाला टाटा सुमो गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे

टाटा सुमो गाडीचे फिचर

टाटा सुमो ही गाडी कशी आहे याबद्दल आपण जर थोडक्यात माहिती पाहिली तर या गाडीची पुढील बाजू ही खूप नवीन पहायला मिळणार आहे ज्यामध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलाईनएलईडी डी.आर.एल, फोग lamps अशी लाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे, याचबरोबर मध्यभागी टाटा कंपनीचा एक नवीन लोगो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे

टाटा सुमो ही गाडी एक गावाकडील भागांमध्ये वापरली जाणारी एक प्रसिद्ध गाडी म्हणून ओळखली जाते त्यामुळे या गाडीला जमिनीपासून वरती उंची ही जास्त दिली जाणार आहे याच बरोबर असंख्य असे फीचर तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे

टाटा सुमो इंजन

टाटा सुमो गाडीमध्ये तुम्हाला 1.5 लिटर टरबो पेट्रोल आणि 2 लिटर 4 सिलेंडर इंजन मिळणार आहे या गाडीची पावर आउट पुट ही 148 PHP आउटपुट पाहायला मिळणार आहे या गाडी बद्दल अधिक माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा कंपनीचे शोरूम मध्ये जाऊन घेऊ शकता
टाटा सुमो गोल्ड ही गाडी लवकरच बाजारामध्ये आपल्याला विक्रीसाठी पाहायला मिळणार आहे आणि काही माहितीच्या सूत्रानुसार या गाडीची किंमत 9 लाख रुपये असणार आहे असे समजले आहे परंतु या किमतीत जास्त वाढ देखील होऊ शकते त्यामुळे जेव्हा प्रत्यक्षात बाजारात ही गाडी येईल तेव्हाच आपण किंमत ठरवू शकतो

Leave a Comment